विकिमित्र मध्ये स्वागत वाचकहो कुठलेही अवघड कार्य समोर आले की आपल्या जिभेवर आपोआपच एक शब्द येतो आणि तो म्हणजे संगणक अर्थात computer कठीणात कठीण काम अगदी चुटकीसरशी व सुबकतेने करण्याससाठी संगणक ओळखले जातात.
आजच्या संगणकाचे उपयोग (uses of computer in daily life) या लेखामध्ये आपण संगणकाचे दैनंदिन जीवणामध्ये मानवाला होणाऱ्या उपयोगांबद्दल माहिती बघणार आहोत.
संगणकाचे उपयोग (uses of computer in daily life)
१.व्यावसायिक वापर (commercial uses of computer in marathi)
आज काल सर्वत्र व्यवसाय ऑनलाइन होऊ पाहत आहेत.व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या नोंदी ठेवणे ,कर्मचाऱ्यांच्या नोंदी ठेवणे आवक जावक नियंत्रित करणे तसेच व्यावसायिक ई-मेल द्वारे आदान प्रदान करणे इंटरनेट वर व्यवसाय संबंधी आकडेवारीचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात.
त्याच प्रकारे ऑनलाइन डिजिटल पद्धतीने आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे तसेच ग्राहक शोधणे विविध बाजारपेठांचा अभ्यास करणे इत्यादी कामांसाठी व्यवसायकांद्वारे संगणकाचा सर्रास वापर केला जातो
२.शिक्षण (educational uses of computer in marathi)
कोरोना कालावधीपासून शिक्षण क्षेत्रात संगणक तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे संगणकाचा वापर ऑफलाईन शिक्षणामध्ये ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून तसेच ऑनलाइन शिक्षणामध्ये व्हिडीओ कॉल किंवा ऑनलाइन कलाउड मिटिंग प्रणालीद्वारे शिक्षण देणे सोयीचे झाले आहे ऑडिओ व्हिज्युअल तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनामध्ये चांगलीच भर पडत आहे
त्याचप्रमाणे ऑनलाईन परीक्षा घेणे विद्यार्थ्यांचे प्रकल्प तयार करणे इत्यादी साठी तसेच शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांवर देखरेख करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संगणकाचा वापर केला जातो
३.आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात वापर (healthcare uses of computer in marathi)
संगणक आणि तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात देखील बरीच क्रांती झाली आहे रुग्णांच्या नोंदी औषधोपचाराचा रेकॉर्ड ठेवणे तसेच विविध चाचण्या करण्यासाठी संगणकाचा वापर होतो
त्याच प्रमाणे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तदाब, साखर, हृदयाचे ठोके यांचे रिअल टाईम नियंत्रण ठेवणे देखील संगणकाने शक्य होते.
४.किरकोळीचा व्यापार (general purpose uses of computer in marathi)
आजकाल संगणकाचा वापर ऑनलाईन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो त्याच प्रमाणे अन्नपदार्थांची ऑर्डर देखील हल्लीचा सामान्य माणूस देऊ लागला आहे
संगणकाचा वापर करून ऑनलाईन खरेदी विक्री सह जाहिरात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे.
५.विज्ञान (scientific uses of computer in marathi )
संगणकाला कामासाठी सोबती बनवणारा सर्वात पहिला वर्ग म्हणजे शास्त्रज्ञांचा वर्ग होय अंतराळा पासून भूगर्भातील प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांद्वारे संगणकाची मदत हमखास घेतली जाते
६.प्रकाशन कामे (publications uses of computer in marathi)
संगणक हा हरकाम्या म्हणला तर वावगे ठरणार नाही इतर कामात आघाडीवर असणारा संगणक विविध कलांमध्ये देखील निपुण आहे चित्रे काढणे लेख टाईप करणे व ते विविध व्यासपीठांवर प्रकाशित करणे तसेच मुद्रण करणे यांसाठी संगणक अविभाज्य घटक बनला आहे
७.करमणूक आणि मनोरंजन (entertainment uses of computer in marathi)
मनुष्य कितीही कामांमध्ये व्यस्त होत चालला असेल तरीही करमणूक आणि मनोरंजन माणसाला नेहमीच खुणावते
संगणकाचा वापर करून गाणी ऐकणे चित्रपट पाहणे तसेच विविध संगणकीय खेळ अर्थात Computer Game खेळणे इत्यादी प्रकाराने मनोरंजन केले जाऊ शकते
८. संप्रेषण (communicational uses of computer in marathi)
संगणकाचा वापर करून माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण सहज रित्या होते ईमेल फॅक्स यांसारख्या संदेश आदान-प्रदान करणाऱ्या टूलमुळे लिखित मजकूर सहज पाठवला जाऊ शकतो तसेच व्हिडीओ कॉलिंग कॉन्फरन्स इत्यादी द्वारे देखील विविध बैठका घेणे लीलया पार पाडले जाते
९. नेव्हिगेशन अर्थात दिशादर्शन (GPS uses of computer in marathi)
आज जीपीएस तंत्रज्ञान खूप पुढारलेले आहे अगदी दुर्गम भागात देखील अगदी अचूक मार्ग दाखविण्याचे काम जीपीएस प्रणाली करते मार्गदर्शनाबरोबरच प्रवासादरम्यानच्या सोयी सुविधा यावर देखील जीपीएस प्रणाली काम करते रस्त्यामधील हॉटेल्स मॉल्स इत्यादी ठिकाणांचे अगदी पद्धतशीर विश्लेषण केले जाते
१०.हवामानाचा वेध (whether forecasting uses of computer in marathi)
दिवसेंदिवस वाढत्या जागतिक तापमानामुळे हवामान झपाट्याने बदलत आहे बदलत्या हवामानामुळे शेती सह इतर अनेक क्षेत्रातील नियोजन कोलमडत चालले आहे मात्र यावर पर्याय काढण्यासाठी हवामानाचा अचूक वेध घेणे गरजेचे ठरले आज काल संगणकीकृत सेन्सर च्या आधारे हवामानाच्या विविध घटकांचा अभ्यास करून येत्या कालावधीतील अंदाज बांधणे सोयीचे ठरते चा योग्य कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे शक्य होत आहे
आशा आहे संगणकाचे उपयोग (uses of computer in daily life) सदर लेख आपल्याला नक्कीच माहितीपूर्ण ठरला असेल हा लेख आपल्या इतरही मित्रमैत्रिणींना वाचण्यासाठी शेअर करा.