छोले भटूरे रेसिपी मराठी | chole bhature recipe in marathi

छोले भटूरे रेसिपी मराठी | chole bhature recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो आज आपण एक सुप्रसिद्ध पंजाबी रेसिपी पाहणार आहोत.ही रेसिपी सर्वत्र आवडीने खाली जाते. चला तर आज आपण छोले भटूरे पंजाबी स्टाईल मध्ये कसे बनवायचे ते पाहुयात.

छोले भटुरेसाठी लागणारे साहित्य ( chole bhature recipe ingredients ):

  • 250 ग्राम काबुली चने ( रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे ).
  • 2 चमचे चहा पावडर
  • ½ चमचा जिरे
  • 2 मोठे कांदा कापलेला
  • आल्याचे चे काप
  • 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या
  • 2 चमचे छोले मसाला
  • 2 चमचे लाल तिखट
  • 2 चमचे आमचूर पावडर (आमसूल)
  • ½ चमचा हळद पावडर
  • ½ चमचा धनिया पावडर
  • 1 चमचा जिरे पावडर
  • तेल
  • स्वादानुसार मीठ

भटूरयांसाठी साहित्य:

  • ½ वाटी मैदा
  • 2 ते 3 मोठे बटाटे
  • तेल
  • स्वादानुसार मीठ

कोशिंबीरसाठी साहित्य:

  • 1 कांदा कापून
  • 1 निंबू कापून
  • 1 टोमॅटो
  • 1 काकडी

छोले बनविण्यासाठी कृती ( chole recipe in marathi ) :

कुकर मध्ये काबुली चने आणि चहापत्ती चे पाणी उकडून घ्यावे.
कढईत तेल गरम होऊ द्यावे व त्यात जीरे, बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट घाला व 5 मिनिटे कांदा सोनेरी होई पर्यंत परतून घ्या.
त्यात आमसूल,(आमचूर पावडर), हळद, धने पावडर, जीरे पावडर, छोले मसाला, मिरची पावडर व मीठ घाला.
आत्ता 5 ते 10 मिनिटे आणखी परतून घ्या .

त्यात उकडलेले काबुली चने घाला व सोबतच 1वाटी पाणी ही घालावे. 5 ते 10 उकळी काढून घ्या व गॅस बंद करा.

भटुरे बनवण्याची कृती ( bhature recipe in marathi ) :

मैदा आणि उकडलेले बटाटे चांगले एकजीव करून घ्या. व त्यात 1 चमचा तेल घालून मिश्रण चांगले घट्ट मळून घ्या. यात पाणी घालू नये.
5 ते 10 मिनिटे हे पीठ फ्रीज मध्ये ठेवा. नंतर बाहेर काढून याचे 10 ते 15 समान गोळे बनवून घ्या.
नंतर त्यांच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या .कढईत तेल टाकून घ्या व तेल चांगले गरम करून घ्या. त्यानंतर एक एक पुरी चांगली तळून घ्या व आपले भटुरे तयार होतील.

गरमागरम छोले सोबत गरमागरम भटुरे फारच उत्तम लागतात या सोबत कोशिंबीर देखील सर्व्ह करा.

Leave a Comment