आप्पे रेसिपी मराठी Appe Recipe in Marathi

आप्पे रेसिपी मराठी Appe Recipe in Marathi  सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम आप्पे ओल्या नारळाच्या चटणी सोबत खायला दिले तर किती आनंद वाटेल. असा मनसोक्त पोटभर नाश्ता करून संपूर्ण दिवसही फ्रेश आणि उत्साही वाटेल. आप्पे हा दाक्षिणात्य पदार्थ असून आता हा मराठमोळा पदार्थ बनला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये अप्पे हे काही नवीन पदार्थ नाही. आप्पे ही रेसिपी अतिशय सोपी आणि सरळ आहे. त्यामुळे आपण घरातील साहित्यांचा वापर करून आप्पे बनवू शकतो. तर आम्ही तुमच्याकरता घेऊन आलो आहोत आप्पे ही रेसिपी. तर चला मग जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती. तर मित्रांनो, तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा.

Appe Recipe

आप्पे रेसिपी मराठी Appe Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

आप्पे ही दक्षिण भारतातील रेसिपी असून या रेसिपी चे वेगवेगळे प्रकार आहेत. आप्पे हे रेसिपी बनवण्याकरता वेगवेगळे पदार्थ म्हणजेच जसे की रवा आप्पे, दुधीचे आप्पे, कोल्हापुरी आप्पे, तांदळाच्या पिठाचे आप्पे, पनीर अप्पे तसेच मिश्र डाळींचे आप्पे अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात.
यापैकी कोणताही प्रकार असो आप्पे हे स्वादिष्ट आणि तुम्हाला नक्कीच आवडतील असेच बनतात. सोप्या पद्धतीने सकाळचा नाश्ता लवकरात लवकर कसा करता येईल ते आपण पाहूया.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

आप्पे रेसिपीची पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

आप्पे कुकिंग करण्याकरता आपल्याला 25 मिनिटे लागतात.

टोटल टाईम :

आप्पे रेसिपीला एक 55 मिनिटे वेळ लागतो.

वाढीव :

ही रेसिपी आपण 6 जणांकरिता बनवणार
आहोत.

साहित्य  :

1) 3 वाटी तांदूळ किंवा इडलीचा रवा अडीच वाटी.
2) 1 वाटी उडदाची डाळ
3) एक पाव वाटी जाडे पोहे
4) चवीनुसार मीठ
5) बटर किंवा तेल

पाककृती :

  • सकाळी उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालावे. संध्याकाळी दोन्हीही मिक्सरमध्ये वाटून एकत्रित करून एका पातेल्यात ठेवून द्यावे.
  • जर तुम्ही इडली रवा वापरणार असाल तर सकाळी भिजत घालायची गरज नाही रात्री उडीद डाळ वाटल्यानंतर त्यामध्ये रवा मिक्स करून थोडे पाणी घातले तरी चालेल.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण आपल्याला थोडे वर आलेले दिसेल. या मिश्रणात अर्धा वाटी पोहे भिजवून मिक्सर मधून बारीक करून घ्या.
  • आप्पेचे मिश्रण इडलीच्या मिश्रणा प्रमाणे पातळ ठेवायचे असते. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला व ते चांगले एकजीव करून घ्या.
  • नंतर आप्पे पात्र गॅसवर चांगले तापवायला ठेवा. नंतर त्यामध्ये बटर किंवा तेल घालून एक एक चमचा आप्पे पात्राच्या वाट्यात हे मिश्रण टाकायचे आहे व चार ते पाच मिनिट मध्यम आचेवर शिजू द्यायचे आहे.
  • आप्पे चमच्याच्या सहाय्याने उलटेपालटे करून परत पुन्हा चार-पाच मिनिटं ठेवा. नंतर ते एका भांड्यात काढून घ्या व गरमागरम आप्पे खोबऱ्याच्या चटणीसह खायला द्या.

मिश्र डाळींचा उपयोग करून आप्प्यांची दुसरी रेसिपी आपण पाहूया.

आप्प्यांची दुसरी रेसिपी पाहूया :

बऱ्याचदा आपल्या स्वयंपाक घरातील डाळींचा उपयोग करून आपण मिश्र डाळीं पासून आप्पे बनवू शकतो. तर चला मग साहित्य व कृती पाहूया.

साहित्य :

1) एक वाटी तांदूळ
2) एक वाटी मूग डाळ
3) एक वाटी उडीद डाळ
4) दोन हिरवी मिरची
5) एक इंच अद्रक
6) दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
7) चवीनुसार मीठ
8) तेल

पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुऊन पाण्यात चार ते पाच तास भिजू घालायच्या आहे.
  • चार-पाच तासानंतर त्या मिक्सर मधून काढून त्याची पेस्ट करावी.
  • नंतर त्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर त्या मिश्रणात टाकावे आणि नंतर चवीनुसार मीठ घालावे.
  • आता आपले आप्प्याचे मिश्रण तयार आहे. आप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये चमचाच्या साहाय्याने वाट्यांमध्ये टाकावे.
  • नंतर हे दोन्ही बाजूंनी तीन ते चार मिनिट भाजून घ्यावेत. गरमागरम चविष्ट मिश्र डाळींपासून पासून आप्पे तयार आहेत. आता हे नारळाच्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

पोषक घटक :

मिश्र डाळींचे आप्पे खाने पौष्टिक आहेत त्यामधून आपल्या शरीराला लोहखनिज आणि क्षार तंतुमय पदार्थ आणि प्रथिनांचा उगम स्त्रोत आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

फायदे :

आप्पे खाणे तशे फायदेशीर आहे कारण हा एक प्रथिनांचा उत्तम स्त्रोत मानला जातो. विविध डाळींचे मिश्रण शरीरासाठी ऊर्जेचे उत्तम स्त्रोत आहे. डाळीमधील तंतुमय पदार्थ हे पचण्यासाठी अतिशय आवश्यक असतात. तसेच आप्पे मधून मिळणारे लोह खनिजे आणि क्षार हे देखील शरीरासाठी आवश्यक असतात.

तोटे :

आपल्याला माहिती आहे शरीरासाठी अन्न हे जरुरी आहे; परंतु त्याचे प्रमाण देखील आपल्याला ठरवायचे असते जसे आपण आप्पे ही रेसिपी पाहत आहोत. त्यामध्ये जर आप्पे चविष्ट आणि कुरकुरीत झाले असतील तर आपल्याला खाण्याचा मोह आवरत नाही, अशा वेळेला आपण अतिरिक्त आप्पे खाल्ले तर त्यापासून आपल्याला त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांना शेअर करा.

Leave a Comment