राजमा मसाला रेसिपी | rajma masala recipe in marathi

राजमा मसाला रेसिपी | rajma masala recipe in marathi

अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तयार होणारी रेसिपी म्हणजे चटपटीत राजमा मसाला ( rajma masala recipe in marathi ) प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत म्हणून ओळखला जातो. या खमंग डिशचा आस्वाद तुम्ही भात पोळी पराठा यासोबत घेऊ शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही डिश सर्वांना आवडते. चला तर जाणून घेऊया राजमा मसाला ची झटपट तयार होणारी रेसिपी

राजमा मसाला रेसिपी साहित्य ( rajma masala recipe ingredients in marathi )

 • १ वाटी राजमा
 • १ वाटी बारीक चिरलेला कांदा
 • १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
 • २ ते ३ तमालपत्र,२ते३ लवंग,२ते३ दालचिनी
 • ३ ते ४ पाकळ्या लसूण पाकळ्या
 • थोडे आले,थोडे कोथिंबीर
 • १ चमचा भाजलेली जिऱ्याची पुड
 • ३ ते ४ चमचे तेल
 • १ चमचा धने पूड
 • १ चमचा गरम मसाला
 • १ पाव चमचा आमचूर पावडर
 • १ चमचा लाल तिखट
 • चवीनुसार मीठ

राजमा मसाला रेसिपी कृती ( rajma masala recipe in marathi ) :-

राजमा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावा.

नंतर तो स्वच्छ धुऊन कुकरमध्ये घेऊन त्यात खडे मसाला म्हणजे दोन ते तीन पाने तमालपत्र दालचिनी लवंग घालून झाकण लावून हाय हिटवर एक शिट्टी काढून घ्यावी.

नंतर गॅस बारीक करुन चार ते पाच शिट्ट्या काढून घ्याव्या. कुकर गार होई पर्यंत टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे.

खान्देशी शेवभाजी रेसिपी | khandeshi shev bhaji recipe in marathi येथे वाचा

त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो तीन ते चार लसूण पाकळ्या थोड्या आल्याचे तुकडे एक किंवा दोन हिरव्या मिरच्या हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची प्युरी करून घ्यावी.

नंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालावे. आपल्या आवडीनुसार तुम्ही तेलही वापरू शकता. नंतर तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घालावे. नंतर बारीक चिरलेला कांदा घालावा.

सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यावर त्यात टोमॅटो प्युरी टाकावी. चार ते पाच मिनिटे टोमॅटो प्युरी ला तेल सुटत आहे तो पर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात एक चमचा धने पूड, एक चमचा गरम मसाला, एक पाव चमचा आमचूर पावडर, एक चमचा लाल तिखट हे मसाले एकत्र करून शिजवून घ्यावेत.

नंतर त्यात शिजवलेला राजमा घालावा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र करावे. त्यानंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालावी.

त्यामुळे त्याला छान फ्लेवर येईल चार ते पाच मिनिटात मिडीयम हाय हिटवर राजमा शिजून घेतल्यानंतर आपला राजमा मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे.

Leave a Comment