दाल तडका रेसिपी मराठी Dal Tadka Recipein Marathi डाळ तडका ही रेसिपी सर्वांच्याच आवडीची आहे. डाळ तडका खाण्याची आवड असेल तर आपण रेस्टॉरंट असो की, मग स्टॉल असो तिथे जाऊन आपण आपली इच्छा पूर्ण करतो; परंतु बऱ्याचदा आपल्याला जाण्याकरता वेळ नसतो म्हणून आम्ही खास तुमच्याकरता डाळ तडका ही रेसिपी घेऊन आलो आहोत. घरच्या घरी गरमागरम चविष्ट अशी डाळ तडका रेसिपी करून बघा आणि आम्हालाही नक्की कळवा.
दाल तडका रेसिपी मराठी Dal Tadka Recipein Marathi
रेसिपी प्रकार :
बऱ्याच लोकांना वरण-भात खूप आवडतो. परंतु भातावर जर तुम्हाला दाल तडका मिळाला तर जेवणाची मजाच वेगळी राहते. डाळ ही सर्वांच्याच घरी असते, त्यामुळे डाळ शिजवण्याचा आपला प्रश्नच नाही परंतु हीच डाळ वेगवेगळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या चवीने तयार करून जेवणामध्ये आपण वापरू शकतो. कुणाला कोल्हापुरी तडका आवडतो तर कोणाला गुजराती तडका आवडतो. कश्मीरी तडका, पंजाबी तडका, बंगाली तडका हे प्रकार आहेत. प्रत्येकाची तडका देण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. तर दाल तडक्यामध्ये वापरण्यात येणारे घटक म्हणजे जिरे, मोहरी, लसुन, कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो, लाल मिरची इ. तर चला मग आज आपण पाहूया दाल तडका रेसिपी कशी बनवायची.
ही रेसिपी किती जण करिता आहे?
दाल तडका ही रेसिपी आपण 5 व्यक्तींकरता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करताना लागणारा वेळ :
दाल तडका बनवण्यासाठी आपल्याला जी पूर्वतयारी करावी लागते ती पूर्वतयारी करताना आपल्याला केवळ 5 मिनिटे एवढाच वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
दाल तडका देण्याअगोदर आपल्याला ती दाल व्यवस्थित शिजवून घ्यावी लागते, त्यामुळे ती शिजवून घेण्यासाठी आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
दाल तडका रेसिपी बनवण्यासाठी ऐकून वेळ आपल्याला 25 मिनिटे लागतील.
डाल तडका रेसिपीसाठी लागणारी सामग्री
1) अर्धा कप तूर डाळ
2) अर्धा कप चना डाळ
3) एक लाल मिरची
4) पाव चमचा हिंग
5) अर्धा चमचा जिरे
6) एक बारीक चिरलेला कांदा
7) एक बारीक चिरलेला टोमॅटो
8) एक बारीक चिरलेली हिरवी मिरची
9) एक चमचा लाल तिखट
10) पाव चमचा हळद
11) दोन चमचे धनिया पावडर
12) अर्धा चमचा गरम मसाला
13) अर्धा चमचा कस्तुरी मेथी
14) दोन चमचे आले-लसूण पेस्ट
15) दोन चमचे तेल
16) बारीक चिरलेला कोथिंबीर दोन चमचे
17) चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी
पाककृती :
- गॅसवर कुकर ठेवा, त्यामध्ये थोडे पाणी गरम होण्यासाठी ठेवा व सर्व डाळी स्वच्छ धुऊन त्यामध्ये टाका व सर्व डाळी एकत्र शिजवून घ्यायच्या आहेत.
- तोपर्यंत आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये तडका करण्यासाठी तेल गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.
- तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी, हिंग, कस्तुरी मेथी, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे.
- आता बारीक चिरलेला कांदा टाकून त्यामध्ये तांबूस रंग होईपर्यंत तो परतून घ्या.
- त्यामध्ये नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाका.
- या मिश्रणामध्ये आता हळद आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचे आहे. सर्व मिश्रण परतून घ्यायचे आहे.
- शिजवलेली डाळ एकत्र चांगली घोटून घ्यायची आहे.
- नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून थोडे पाणी व मीठ टाकून मध्यम आचेवर ती डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये असलेले पाणी थोडे कमी झाले पाहिजे.
- आता सर्वात शेवटी आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यामुळे एक कढईत थोडे तेल गरम करा आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायचे आहे. तसेच जिरे आणि दोन सुक्या लाल मिरच्या फोडणी द्या आणि डाळीचे सर्व घट्ट मिश्रण यामध्ये टाका.
- तर अशाप्रकारे डाळ तडका रेसिपी तयार आहे. तुम्हीही आपल्या घरी ही रेसिपी तयार करून पहा व आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. डाळ तडका हा जास्तीत जास्त लोक भातासोबत खातात. सर्वात जास्त ही रेसिपी लोकप्रिय आहे.
पोषक घटक :
आपण डाळ तडका रेसिपीतील पोषक घटकांविषयी बोललो तर त्यामध्ये प्रथिने आणि चरबीचे प्रमाण खूपच कमी असते म्हणून ती कोणत्याही डिशमध्ये घालण्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असे आहे. फायबर, कॉम्प्लेक्स, जीवनसत्वे, कार्बोहाइड्रस, खनिजे, ग्लुटेन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस व तांबं इत्यादी घटक आढळतात.
फायदे :
डाळ फायबरचा उत्तम स्त्रोत मानला जातो त्यामुळे फायबर आपल्या शरीरातील अन्नपचनासाठी तसेच पचन संस्था सुधारण्यासाठी अतिशय आवश्यक असते.
दाल तडकाचा उपयोग आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील करू शकतो, कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक असे घटक नसतात.
डाळ तडका खाण्यात आल्यास आपले वजन देखील वाढत नाही, त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर त्यांनी अधिकाधिक डाळ तडका खाल्ला तरी चालेल. तसेच चवीला देखील खूप छान असते व पोषक तत्त्वांनी भरपूर असते.
डाळ तडक्यामध्ये देखील वेगवेगळे मसाले वापरले जातात, ते आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदात महत्त्वाचे सांगितलेले आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला निश्चितच त्याचा देखील फायदा होतो.
तोटे :
डाळ तडका खाण्याचे कोणतेही तोटे नाही परंतु शरीरामध्ये एखाद्या घटकाचे प्रमाण जास्त झाले तर त्याचा निश्चितच परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणून शक्यतो प्रमाणातच कोणतीही गोष्ट खायला पाहिजे.
तर मित्रांनो, डाळ तडका रेसिपी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.