Independence Day Information In Marathi 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा देश स्वतंत्र झाला आणि दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 च्या तरतुदी लागू झाल्या आणि भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त सुद्धा झाले. भारत देशाला प्रजासत्ताक देश होईपर्यंत राज्याचे प्रमुख हे किंग जॉर्ज सहावे कायम होते.
स्वातंत्र्य दिवसची संपूर्ण माहिती Independence Day Information In Marathi
26 जानेवारी 1950 या दिवशी भारताने राज्यघटना स्वीकारली आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेले भारतीय संविधान लागू केले व भारत हा देश प्रजासत्ताक देश बनला मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेलेच भारतीय स्वातंत्र्य चळवळी नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी सुद्धा करण्यात आली. त्यामध्ये ब्रिटिश भारत हा भारत आणि पाकिस्तान मध्ये विभागला गेला.
या फाळणी नंतर हिंसक दंगल झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सुद्धा झाली. धार्मिक हिंसाचारामुळे जवळपास दीड कोटी लोकांनी स्थलांतर केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय ध्वज फडकवला आणि राष्ट्राला संबोधित केले.
हा संपूर्ण कार्यक्रम भारताचा राष्ट्रीय प्रसार असलेल्या दूरदर्शन द्वारे प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सनई संगीत आणि सुरू होतो.
स्वातंत्र्य दिनाचा इतिहास :
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आपण पाहिला तर 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि 19 व्या शतकापासून सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर त्यांच्या ताब्यात घेतले होते. 1857 चा स्वातंत्र्य समरणानंतर ब्रिटिशांनी त्यांची अवस्था अजूनच शिस्तीची केली होती आणि 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सुद्धा झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आणि दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर हा दिवसेंदिवस वाढत होता.
ही गोष्ट सुद्धा त्यांना कळली आणि ब्रिटनच्या प्रंतप्रधान यांनी जीवन 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वातंत्र्य करण्याची सुद्धा हमी दिली होती. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु त्यावेळी भारताच्या पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे सुद्धा झाले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब यांना त्यांचे घरदार पैसा सोडून इकडे भारतात यावे लागले. अनेक लोक यामध्ये मारले गेले. पुढे या विभाजनामुळे कश्मीरचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला.
स्वातंत्र्य दिन साजरा का करतो :
भारत देशाला अथक परिश्रमानंतर आणि अनेक वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले. तो दिवस 15 ऑगस्ट 1947 होता. या दिवशी ब्रिटिशांपासून भारत स्वतंत्र झाला. त्याला स्वायत्तता मिळाली, परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांच्या हृदयामध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
15 ऑगस्ट 2023 रोजी भारताने स्वातंत्र्याला 76 वर्ष पूर्ण केली. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या केलेल्या संघर्षाची आठवण करून देतो आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेल्या प्राणाची आठवण करून देतो. भारतीय क्रांतिवीरांनी या यातना सहन केल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले याची आठवण आपल्याला होते.
आज आपण जे स्वातंत्र्य अगदी सहजतेने उपभोगत आहे. यासाठी भारतीय क्रांतिकारकांनी आपले स्वतःचे रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवले आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना हा दिवस जागृत करतो. त्यामुळे आजच्या पिढीला सुद्धा त्या वेळच्या लोकांचे व त्यांनी केलेल्या संघर्षाची जाणीव होते.
भारताच्या स्वातंत्र्य सैनिकाची ओळख करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तो क्षण पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि स्वातंत्र्य विषयी भावना संपूर्ण जनतेच्या मनामध्ये पुन्हा जागृत करण्यासाठी आणि 15 ऑगस्ट 1947 पासून भारत दहा दिवस स्वतंत्र झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपली बलिदान दिले तसेच त्यांनी कष्ट केले, संघर्ष केला याची आठवण आपल्याला या दिवशी नक्कीच होते.
स्वतंत्र दिवशी असणारे कार्यक्रम :
15 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असली तरी देशातील लोक मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. हा दिवस शाळा, कार्यालय, सोसायटी, महाविद्यालय आणि विविध छोटे-मोठे कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. दरवर्षी लाल किल्ल्यावर भारताचे पंतप्रधान राष्ट्रध्वजाचे आयोजन करतात. हा कार्यक्रम नंतर सैन्याची परेड होते.
शाळा आणि महाविद्यालय तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा राष्ट्रवादीचे झाल्यानंतर घेतले जातात. विविध स्पर्धा भाषण, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा येथे आयोजित केली जाते.
स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व काय आहे?
स्वतंत्र दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 या दिवसाचे महत्त्व काय आहे तसेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागले याची जाणीव इतर लोकांना व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा दिवस सर्व संपूर्ण लोकांना एकत्रित आणतो आणि अनेक धर्म, अनेक भाषा अनेक संस्कृती मूल्य जपलेले सर्वच लोक एक राष्ट्र आहोत. याची या दिवशी आपल्याला जाणीव करून देतात.
विविधतेमध्ये एकता हे भारताचे मुख्य सार आणि सामर्थ्य आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा भाग असलेला भारत अभिमानास्पद वाटतो. भारतीय स्वातंत्र्याबद्दल प्रत्येक भारतीयाचा विचार हा वेगवेगळा असू शकतो परंतु देशाच्या तरुणांसाठी तर हे गौरव आणि सन्मानाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशभरात देशभक्तीची भावना जागृत होते.
FAQ
2023 मध्ये भारताला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले?
2023 मध्ये भारताच्या देशाला स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष पूर्ण झाली आहेत.
15 ऑगस्ट हा दिवस आपण का साजरा करतो?
15 ऑगस्ट ,1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेआणि प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी हा दिवस अभिमानास्पद किंवा गौरवास्पद आहे, म्हणून देशभरात मोठ्या उत्साहाने 15 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो.
15 ऑगस्ट या दिवसाचे काय महत्त्व आहे?
15 ऑगस्ट या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि तो दिवस स्वातंत्र दिवस म्हणून साजरा करण्यात आला. भारताला दोनशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले होते आणि ही भावना इतर भारतीयांच्या मनामध्ये नेहमीच जागृत राहावे. या उद्देशाने 15 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते?
जेव्हा भारताला स्वतंत्र मिळाले, तेव्हा क्लेमेंट अँटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते.
भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय संघात किती राज्य होती?
1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी भारतीय संघामध्ये एकूण 12 राज्य होते.