Coconut Tree Information In Marathi हिंदू धर्मामध्ये नारळ खूप महत्त्वाचे फळ आहे तसेच नारळाला हजारो वर्षापासून उपयोगात आणले जात आहे. नारळ हे भाग्यवान फळ आहे म्हणून पूजा करण्यापूर्वी नारळ फोडला जातो. तसेच बऱ्याच ठिकाणी घराचे उद्घाटन करण्याच्या आधी सुद्धा नारळाची पूजा करून नारळ फोडले जाते. शुभ कार्यात नारळ देऊन एकमेकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात.
नारळाच्या झाडाची संपूर्ण माहिती Coconut Tree Information In Marathi
नारळाचे वैज्ञानिक नाव कोकोनट न्यूसीफेरा असे आहे. या झाडाचे आयुष्य 100 वर्ष जगते. या झाडाची उंची 20 ते 30 मीटर पर्यंत वाढते. काही प्रजाती लहान सुद्धा असतात, त्यांची उंची दहा ते पंधरा फूट पर्यंत असते. या झाडाचे खोड मजबूत असते आणि सरळ असते. नारळ पाणी पिणे हे खूप फायदेशीर ठरते. त्यापासून आपल्या शरीराला आणि फायदे मिळतात.
नारळाच्या झाडाला श्रीफळ वृक्ष किंवा कल्पवृक्ष असे सुद्धा म्हटले जाते. हिंदू धर्मानुसार नारळाच्या झाडाची निर्मिती ही विश्वामित्र ऋषींनी केली होती. म्हणूनच भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये नारळाचे खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. सर्व कामांमध्ये नारळ सर्वात शुभ मानले जाते. नारळ फोडण्यामागे एक रहस्य लपलेला आहे. नारळ फोडले म्हणजे माणसाचा अभिमान तुटला अशी त्याविषयीची संकल्पना आहे.
नारळावर एक कठीण कवचाचा थर असतो तो फोडला की आत मध्ये नारळ बाहेर पडतो. त्याचप्रमाणे माणसावरील कठीन थर असतो. तो फोडला की माणूस बाहेर पडतो. अशी त्यामागे संवेदनशील व्यक्तीचा अर्थ लपलेला आहे. नारळाला भगवान शिवाचे प्रतीक सुद्धा मानले जाते. कारण त्याला तीन छिद्र्य असतात, ज्याला भगवान शंकराची तीन डोळे समजले जाते आणि त्याच्या वरील फायबर त्याला शिवाचे केस असे सुद्धा संबोधले जाते.
नारळाचे झाड कसे असते :
नारळाच्या झाडाला माळ किंवा श्रीफळ असे म्हटले जाते. हे विषुववृत्तीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात तसेच समुद्रकिनारी आणि समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये वाढतात. या कुळातील आणखीन एक वृक्ष म्हणजे ताड आहे. त्याचे फळ नारळाप्रमाणेच असते आणि त्या झाडाची उंची सुद्धा तीस मीटर असते.
नारळाच्या झाडाची उंची सुद्धा तीस मीटर पर्यंत असते या वृक्षाला चार ते सहा मीटर लांबीची झावळ्याच्या स्वरूपातील पाने फुटतात. नारळाच्या झाडाला वर्षातील दर महिन्याला फुलांचा एक तुरा लागतो.
तुऱ्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यातच परिपक होतात म्हणजेच प्रत्येक महिन्यात झाडावरून एक घर काढायला मिळतो. या झाडांच्या प्रत्येक अवयवांचा काही ना काही उपयोग होत असतो. या वृक्षाला कोकणात कल्पवृक्ष असे सुद्धा म्हणतात ओल्या नारळाला शहारे असे म्हणतात आणि त्याचे पाणी पिणे शक्तिवर्धक थंड आणि खनिज संपन्न असते. आजारी अपचन आणि जुलाब झालेल्या व्यक्तींना हे पाणी पिणे खूप फायदेशीर असते.
नारळाच्या वृक्षाचा वापर :
नारळाच्या झाडापासून आपल्याला अनेक फायदे मिळतात किंवा नारळाचे झाड अनेक कामांसाठी वापरला जाऊ शकतो. या झाडांच्या लाकडापासून फर्निचर, बोटी, कागद घरे अशा विविध वस्तू बनवण्यासाठी केला जातो तसेच वनस्पतींच्या पानांचा उपयोग छप्पर झाकण्यासाठी सुद्धा केला जातो.
नारळाच्या तेलाने स्वयंपाक करणे खूपच उपयुक्त असतो. नारळाचे तेल त्वचेवर सुद्धा लावले जाते. त्यामुळे त्वचा मऊ होते आणि चमकते तसेच एखाद्याची त्वचा जळाली असेल आणि त्यामुळे जखम झाली असेल तर त्यावर सुद्धा खोबरेल तेल वापरले जाते.
केसांना खोबरेल तेल आणि जोडले जाते. डोक्याची मालिश केली जाते, त्यामुळे केस लांब काळे आणि जाड होतात तसेच केसांची मजबूत मुळे होतात. नारळाचे पाणी तुम्ही पिल्यामुळे अनेक फायदे मिळतात. शरीराला चांगल्या प्रकारे विटामिन्स मिळतात. नारळाच्या झाडाचा उपयोग विविध उत्पादने बनवण्यासाठी केला जातो जसे की मॅट, ग्रेट, झाडू, कार्पेट इत्यादी वस्तू तयार केल्या जातात. स्वादिष्ट खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार केली जाते.
त्या व्यतिरिक्त खूप खोबऱ्याची चटणी ही मिठाई आणि डोसा याबरोबर खाल्ली जाते. न शिजवता नारळ खाल्ल्याने रक्तभिसरण सुरळीत राहते आणि त्वचा तजेलदार राहते. कच्चे खोबरे खाल्ल्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते. यामुळे कमी कालावधीत अशक्तपणा आणि लोहाची कमतरता सुद्धा भरून निघते.
नारळाची उत्पत्ती :
नारळ या वृक्षाची उत्पत्ती वेदांमध्ये केलेले आहे. जिथे तो कल्पवृक्ष असे त्याला म्हटले आहे. भारतातून हिंदी महासागर ओलांडून इजिप्तमध्ये येईपर्यंत सहाव्या शतकात जगाला नारळ माहित नव्हते. भारताच्या मोहिमे दरम्यान या फळाला फेराव नट असे नाव दिले होते. नारळ हा शब्द सर्वप्रथम 1955 मध्ये एकदा इंग्रजीवृत्ता छापला गेला आणि विसाव्या शतकात निकोबार बेटांवर संपूर्ण नारळाचे एक प्रकारचा पेमेंट म्हणून सुद्धा वापर केला जात होता.
नारळाच्या झाडाचे फायदे :
नारळाच्या झाडाचे आपल्याला अनेक फायदे उपलब्ध होतात. ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.
त्वचेसाठी फायदेशीर आहे : पावसाळ्याच्या दिवसात चेहरा चिकचिक होतो. ही खूप मोठी समस्या असते, त्यामुळे उपाय म्हणून तुम्ही नारळाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवू शकता. त्यामुळे त्वचा निर्माण आणि नितळ राहण्यासाठी मदत होते. ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने तेल आणि इतर काही अग्रेनिक तत्व असतात. ज्यामुळे त्वचेला खूप मोठा फायदा होतो.
निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्या नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून लावल्यामुळे आणि त्वचेची मसाज केल्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. नारळाचे पाणी आणि दूध त्वचेच्या उजळण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. चेहऱ्यावरील काळे डाग निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागलेल्या चेहऱ्याला नारळाच्या दुधाने मसाज केल्यास चेहरा सुंदर दिसतो.
गर्भधारणेमध्ये फायदेशीर असते : गर्भधारणेनंतर नारळाचे पाणी नियमित पिल्यामुळे गर्भामध्ये वाढणाऱ्या शिशुसाठी हे पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि बाळाचा रंग सुद्धा उजळतो. याशिवाय टॉनिक म्हणून सुद्धा हे पाणी उपयुक्त असते.
निरोगी हृदयासाठी फायदेशीर : शरीराचा भाग म्हणजेच हृदय हे अतिशय महत्त्वाचा आहे. आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी ठेवण्यासाठी नारळाचे पाणी खूप महत्त्वाचे आहे. नारळ पाणी खूपच पौष्टिक घटक आहे. हृदय निरोगी राहण्यासाठी मदत होते. बऱ्याच वेळा डॉक्टर सुद्धा नारळाचे पाणी पिण्याचे सांगतात.
केसांसाठी फायदेशीर आहे : बऱ्याच लोकांचे केस अतिशय गळतात किंवा नारळाचे पाणी केस धुण्याच्या आधी एक तास अगोदर केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतात तसेच केसांच्या मुलांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते आणि केसांची वाढ होते.
वजन घटण्यास मदत होते : नारळाच्या दुधामध्ये खूप प्रमाणात फॅट्स असतात. हे फॅट्स मिडीयम चिल्डसाठी ऍसिड असते. त्यामुळे शरीरातील चरबी सुद्धा कमी होते. त्याचबरोबर नारळाच्या दुधामध्ये बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहण्याची शक्ती असते.
मेंदूची क्षमता वाढण्यास मदत होते :
नारळामध्ये ब्रेन गोष्टी गुणधर्म असतात. जे पौष्टिक तत्व आणि इतर सेल्सला सक्रिय करतात. ज्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करतो आणि बुद्धी दलक होते. तसेच मेंदूची क्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते.
FAQ
नारळाचे झाड किती वर्ष जगते?
नारळाचे झाड हे शंभर वर्ष पर्यंत जगते.
नारळाच्या झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी किती वर्ष लागतात?
नारळाचे झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतात.
नारळाच्या झाडांची मुळे किती खोल जमिनीत जातात?
नारळाच्या झाडांची मुळे 30 ते 90 सेंटीमीटर जमिनीमध्ये जातात काही मुळे 90 ते 150 सेंटीमीटर खोलपर्यंत सुद्धा जातात.
नारळाच्या झाडाचे दुसरे नाव काय आहे?
माड
नारळाच्या झाडाचा काय उपयोग होतो?
नारळाच्या झाडाचा म्हणजेच लाकडाचा पूल बांधण्यासाठी, झोपड्या बांधण्यासाठी, जहाज बांधण्यासाठी, फायबर दोरी, चटई, झाडू आणि गोणी तयार करण्यासाठी वापरला जातो.