दाबेली ची रेसिपी | kacchi dabeli recipe marathi

दाबेली ची रेसिपी | kacchi dabeli recipe marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो आपल्याला नेहमीच काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते .अश्यावेळी काय बनवावे असा प्रश्नं आपल्याला पडतो.
तर आपण एकदम चटपटीत दाबेली ची रेसिपी पाहुयात.

दाबेली ची रेसिपी साहित्य ( kacchi dabeli recipe marathi ingredients ):

ह्या साहित्यात तुम्ही 6 लोकांसाठी दाबेली बनवू शकता.

6 दाबेली चे पाव
4 मोठे बटाटे (उकडलेले)
1 चमचा लाल तिखट
2 चमचे दाबेली मसाला
1 कांदा बारीक चिरून
2 कोथिंबीर बारीक चिरून
3 चमचे डाळींबाचे दाणे
3 चमचे मसाला शेंगदाणे
चवीनुसार मीठ
1 चमचा (दाबेली फ्राय करायला)
1 चमचा बारीक शेव
1 चमचा गोड चटणी
2 चमचे हिरवी तिखट चटणी
2 चमचे तेल

दाबेली ची रेसिपी कृती | kacchi dabeli recipe marathi :

सर्वप्रथम सगळे साहित्य एकत्र करून घ्यावे.
बटाटे कुकरला ३ शिट्या करुन उकडून घ्यावे. त्यांनतर एका कढईत तेल गरम करून घ्यावे व त्यात दाबेली मसाला, मीठ व लाल मिरची पावडर घालून हा मसाला बारीक गॅसवर परतून घ्यावा व आता त्यात उकडलेले बटाटे घालुन व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे.

तयार झालेले बटाट्याचे मिश्रण एका ताटात काढून घ्यावे व आता त्यात इतर साहित्य /जिन्नस म्हणजे कांदा,डाळींबाचे दाणे,मसाला शेंगदाणे व बारीक चिरलेली कोथिंबीर.

आता दाबेलीचा पाव एका बाजूने थोडा कापून पावात एका बाजूने गोड चटणी व दुसऱ्या बाजूला तिखट हिरवी चटणी लावावी व चटणीवर तयार केलेले बटाट्याचे मिश्रण व्यवस्थित पसरवावे. जर तुम्हाला चिझ आवडत असल्यास त्यात चिझ किसून घालावे.

वरील प्रमाणे सगळे दाबेली पाव भरुन घ्यावे व आता तवा गरम करून घ्यावा व त्यावर बटर टाकून दाबेली दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी.
दाबेली भाजून झाले की दाबेलीच्या प्रत्येक कडेने बारीक शेव दाबून घ्यावी व गरमागरम दाबली सर्व्ह करायला तयार आहे.

Leave a Comment