सुपर कॉम्प्युटर काय आहे | supercomputer information in marathi

सुपर कॉम्प्युटर काय आहे supercomputer information in Marathi

सुपर कॉम्प्युटर काय आहे आणि तो कसं काम करतो

मित्रांनो आज आपण जाणून घेऊ या सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय ( supercomputer information in Marathi ), सुपर कॉम्प्युटर काय काम करतो याविषयी. कॉम्प्युटर विषयी तर आपण सर्वजण जाणतोच. परंतु आज आपण सुपर कॉम्प्युटर बद्दल जाणून घेऊ या.

सुपर कॉम्प्युटर ऐकायला कॉम्प्युटर च Super Version वाटतो, आणि हे बरोबर सुद्धा आहे. सुपर कॉम्प्युटर हे असे device आहे जे Existing Computer पेक्षा फास्ट Processing करतात.

जर आपण पहिल्या जमान्याचा विचार केला तर कॉम्प्युटर मध्ये Vacuum Tube आणि Transistor चा वापर केला जात होता. आणि कॉम्प्युटर सुद्धा खूप मोठ्या रूम च्या आकाराचा होते.

परंतु Integrated Circuit आणि Microchips आल्यानंतर कॉम्प्युटरचा आकार काही प्रमाणात कमी झाला. चला तर मग जाणून घेऊ या सुपर कॉम्प्युटर बद्दल.

सुपर कॉम्प्युटर काय आहे (What is Supercomputer in Marathi):

सुपर कॉम्प्युटर एक सामान्य कॉम्प्युटर च्या तुलनेत एक उच्च स्तरीय परिणाम देणारा कॉम्प्युटर आहे. सुपरकंप्युटर सामान्य वापराच्या कॉम्प्युटर च्या तुलनेने High level calculation आणि Computing वर Perform करतो.

हा कॉम्प्युटर सामान्य कॉम्प्युटर च्या तुलनेने जास्त वेगवान असतो. यामुळेच याला सुपर कॉम्प्युटर असे म्हणतात. हा कोणत्याही वेळी उपलब्ध कॉम्प्युटर सिस्टीम च्या तुलनेने वेगवान आणि powerful असतो. या कॉम्प्युटर सिस्टीम ला अश्या ठिकाणी वापरले जाते जेथे खूप जास्त Power आणि Fast Processing बरोबरच Real Time Task Operation ची गरज असते.

सुपर कॉम्प्युटर ची ऑपरेटिंग सिस्टिम (Operating System of Super Computer in Marathi):

सुपर कॉम्प्युटर चा परफॉर्मन्स FLOPS मध्ये मोजला जातो. ज्याचा अर्थ FLOATING POINT OPERATIONS PER SECOND असा होतो. त्यामुळे ज्या कॉम्प्युटर मध्ये सर्वात जास्त Flops असतात तितका तो जास्त Powerful असतो.

एक सुपर कॉम्प्युटर असा कॉम्प्युटर असतो जो सर्वात जास्त Highest Operational Rate वर Perform करतो. याचा सर्वात जास्त वापर Scientific आणि Engineering Application साठी केला जातो.

सुपर कॉम्प्युटर काम कसं करतो (How to work Supercomputer In Marathi):

सुपर कॉम्प्युटर ची गरज वैज्ञानिक आणि इंजिनिअरिंग प्रयोगासाठी ज्यामधे सर्वात जास्त Database आणि High Level Calculation यासाठी पडते.

सुपर कॉम्प्युटर खूप तेज, शक्तिशाली आणि महाग असतात. त्यामुळे याचा वापर त्याच ठिकाणी केला जातो जेथे खूप मोठं आणि जलद calculation हवं असतं. याशिवाय काही स्पेशल ऑपरेशन मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. कारण स्पेशल ऑपरेशन चा वेळ खूप कमी असतो आणि त्यांना कमी वेळात जास्त काम करावं लागतं.

वाचा : iOS काय आहे (Information about iOS in Marathi)

सुपर कॉम्प्युटर काय काय काम करतो (Working of super computer in Marathi):

चला आपण आता जाणून घेऊ या सुपर कॉम्प्युटर च्या कार्याबद्दल.
1) वातावरण संशोधन (Climate Research)
2) हवामान अंदाज ( Weather forecasting)
3) शारीरिक सिमुलेशन (Physical Simulations)
4) कोड ब्रेकिंग (Code Breaking)
5) जेनेटिक एनालिसिस (Genetic Analysis)
6) एनिमेटेड ग्राफिक्स (Animated Graphics)
7) क्वांटम यांत्रिकी (Quantum Mechanics)
8), आणविक मॉडलिंग (Molecular Modelling)
9) तेल आणि खनिज तेलाचा शोध (Oil and Gas Exploration)
10) परमाणु ऊर्जा संशोधन (Nuclear Energy Research)

सुपर कॉम्प्युटर ची किंमत किती असते (Price of supercomputer in Marathi):

सुपर कॉम्प्युटर ची किंमत या गोष्टीवर ठरते की तो किती Floating Point Per Second वर Speed मोजतो. सुपर कॉम्प्युटर जितका तेज असेल तितकी च त्याची किंमत जास्त असते.

यामुळे सुपर कॉम्प्युटर बनवणे आणि त्याचा वापर करणे इतकं सोप नाही. सामान्यपणे सुपर कॉम्प्युटर ची किंमत $20,000 असते परंतु खूप मोठ्या सुपर कॉम्प्युटर ची किंमत 300 मिलियन अमेरिकी डॉलर पर्यंत असते.

जगातील वेगवान कॉम्प्युटर (High speed computer in Marathi):

जानेवारी 2018 च्या हिशोबाने Cray XC 40 हा भारताचा सर्वात वेगवान कॉम्प्युटर आहे. याची मेमोरी 1.5 terabyte आहे. याच उद्घाटन 8 जानेवारी 2018 ला केंद्रीय विज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं होत.

हा कॉम्प्युटर भारतातील IITM मध्ये स्टिथ आहे. भारताच्या सुपर कॉम्प्युटर ची स्पीड 42.56 TFLOPS per second आहे.

भारताचे टॉप 5 सुपर कॉम्प्युटर (India’s top 5 supercomputer in Marathi):

भारतातील 5 सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ची नावे पुढील प्रमाणे:
1) प्रत्यूष – Cray XC40
2) मिहिर – Cray XC40
3) InC1 – Lenovo C1040
4) SERC – Cray XC40
5) iDataPlex DX360M4

सुपर कॉम्प्युटर चा शोध:

जर आपण कॉम्प्युटर च्या इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की कॉम्प्युटर हा कोण एकाच्या योगदानाने बनला नाही तर यासाठी खूप लोकांनी योगदान दिलं आहे. कॉम्प्युटर बनवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी वेळोवेळी योगदान दिलं आहे. त्यानंतरच हा कॉम्प्युटर बनला आहे.

परंतु जर आपण एका व्यक्ती चा विचार केला तर सुपर कॉम्प्युटर बनवण्यासाठी सर्वात जास्त योगदान Seymour Cray (1925-1996) यांनी दिलं आहे.

सुपर कॉम्प्युटर चे फायदे (Advantages of Super Computer in Marathi):

IBM, PayPal सारख्या मोठं मोठ्या कंपन्या सुपर कॉम्प्युटर चा वापर करतात. हा कॉम्प्युटर फक्त नॉर्मल कॉम्प्युटर पेक्षा जास्त स्पीड देत नाही तर ऑनलाईन होणाऱ्या धोक्यापासून सुद्धा वाचवतो.

हा सामान्य कॉम्प्युटर पेक्षा वेगाने काम करतो त्यामुळे कमी वेळेत जास्त काम होते.

सर्व मिळून सुपर कॉम्प्युटर आज च्या धावपळीच्या जगात खूप गरजेचा बनला आहे. काही क्षेत्र तर असे आहेत जे सुपर कॉम्प्युटर शिवाय चालूच शकत नाहीत.

निष्कर्ष:
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय हे जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Comment