QR Code म्हणजे काय ?| What is qr code in marathi

What is qr code in marathi : मित्रांनो तंत्रज्ञानाच्या या लेखमालिकेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.या लेखात आपण भन्नाट आणि रोजच्या वापरातल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत.

QR Code म्हणजे काय ? (What is qr code in marathi)

जर तुम्ही स्मार्ट फोन आणि पैशांचा व्यवहार करण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करत असाल, तर तुम्हाला या तंत्रज्ञानाची ओळख असेलच. बहुतांश वेळा आपण खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी तिथे चिटकवलेले एक कोड स्कॅन करतो आणि पैशांचा व्यवहार करतो त्याच कोड विषय आज आपण माहिती करून घेणार आहोत.

QR CODE चा अर्थ ( qr code meaning in marathi)

या कोडला QR कोड म्हणजेच Quick Response Code असे म्हणतात. हा एका काळा आणि पांढरा रंगाचा बॉक्स मध्ये तयार केलेला असतो. हा एक प्रकारचा बार कोड चअसतो, परंतु त्याची मेमरी क्षमता ही बारकोड पेक्षा अधिक असते. म्हणूनच जगभरात QR कोडचा वापर केला जातो. बारकोड पेक्षा हा जलद आणि वेगवान आहे.

QR कोड मध्ये माहिती टाकण्यासाठी अंक ( 1,2,3..) तसेच इंग्रजी अक्षर ( a,b,c..) आणि मानद तत्वे जसे की #, @, $ यांचा उपयोग केला जातो त्यानुसार आपल्याला हवा तसा किंवा QR कोड हव्या त्या उपयोगासाठी बनवला जातो.

QR कोड चा इतिहास (history of qr code in marathi)

जपान मध्ये एक Denso wave नावाची कंपनी आहे. वाहन उद्योगातील अग्रगण्य अशी प्रमुख कंपनी म्हणून तिचा उल्लेख आहे या कंपनीत वाहन ट्रॅकिंग करण्यासाठी बारकोड चा उपयोग केला जात असे. परंतु बारकोड चा मर्यादा लक्षात घेता त्यांनी त्यांना अडचणी येऊ लागल्या तेव्हा १९९४ मध्ये या कंपनीने QR कोड ची निर्मिती केली व पुढे फक्त उद्योगासाठी सीमित न ठेवता 2002 मध्ये जपान मधील सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिले. आता QR कोड चा उपयोग सर्व स्तरात केला जातो आहे.

QR Code चे प्रकार (Types of qr code in marathi)

क्यूआर कोडची मुख्यतः दोन प्रकार आहेत
१. Static QR code
२. Dynamic QR code

Static QR code

या QR कोड चा उपयोग सर्वसामान्य कार्य करण्यासाठी केला जातो. जेव्हा एखादी सूचना माहिती ही सार्वजनिक करायची असते. तेव्हा या कोड चा उपयोग केला जातो असतो. हा कोड सार्वजनिक रीत्या प्रसारित केला जात असतो. TV, पोस्टर वर्तमानपत्रे यांच्याद्वारे तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवला जातो. सध्या याचे उदाहरण द्यायचं झालं तर भारत सरकारने COVID साठी जारी केलेल्या नियमावली साठी तयार केला केलेला QR कोड. परंतु ह्या कोड व्हा उपयोगाने मर्यादित माहितीच उपलब्ध होते जसे कि,
हा कोड किती वेळा स्कॅन केला गेला आहे.

हा कोड कोणत्या डिव्हाइस वरून स्कॅन केला गेला आहे.

Dynamic QR code

हा कोड एक आधुनिक प्रकारचा कोड आहे. याचा कोड चा उपयोगाने static कोड पेक्षा जास्त माहिती मिळू शकते. हा एक प्रकारचा Live QR कोड असतो. तसेच त्याला Unique QR कोड असेसुद्धा म्हटले जाते. या कोडच्या उपयोगाने आपल्याला खालील माहिती उपलब्ध होऊ शकते.
१. स्कॅन करणाऱ्याचे नाव

२. त्याचे ईमेल आयडी

३. किती वेळा स्कॅन केलेला असू शकतो.

४. Conversation rate इत्यादी.

QR code चा उपयोग (Uses of qr code)

क्यूआर कोडची सुरुवात जरी उद्योगासाठी झाली असली तरी क्यू आर कोड आता रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे किंवा आर कोड चे उपयोग पुढील प्रमाणे

१.तुमच्या उद्योगांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच उद्योगाचा विकास करण्यासाठी.

२. ह्या कोडच्या मार्फत तुमच्या वेबसाईट लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

३. कोड चा उपयोग पैशांचा व्यवहार करण्यासाठी केला जातो. याचा सर्वात प्रथम उपयोग २०११ मध्ये royal Dutch mint कडून केला गेला.

४. QR कोड च्या मदतीने तुम्ही तुमचे व्हाट्सअप तुमच्या कॉम्प्युटर च्या डेस्कटॉप वर वापरू शकतात.

५. विविध बँक अकाउंटची माहिती तसेच phone pay, paytm इत्यादींचा उपयोग करून व्यवहार केले जातात.

६. या कोडच्या मदतीने फोन नंबर न देता सुद्धा तुम्ही SMS करू शकतात.

७.आपल्या घरचा अथवा ऑफिसचा किंवा एखाद्या ठराविक ठिकाणाचा पत्ता देण्यासाठी देखील तुम्ही कोड चा उपयोग करू शकतात.

८.महाराष्ट्रा मध्ये असणारे जिल्हा परिषद शिक्षक डिसले गुरुजींनी क्यू आर कोड चा उपयोग करून शिक्षण अतिशय सोप्या पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवले व त्यांना त्यासाठी पुरस्कार देखील प्राप्त झाला.

९. महाराष्ट्र पोलिसांनी देखील किंवा कोड चा उपयोग करून गुन्हेगारीचं प्रमाण कमी केला आहे.

QR कोड स्कॅन कसा कराल ?


क्यू आर कोड स्कॅन करायचे पद्धत अतिशय सोपी आहे. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही यशस्वीरित्या कोड स्कॅन करू शकतात.

Step 1 = तुमचा मोबाईल मध्ये आधीपासूनच scanner नावाचे application इन्स्टॉल असते जर ते नसेल तर ते प्ले स्टोअर वरून जास्त रेटिंग असणारी QR code Scanner application डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.

Step 2= स्कॅनर ओपन करून जो कोड स्कॅन करायचे आहे त्यावर मोबाईलचा कॅमेरा धरावा.

Step 3= स्कॅन करतानाच कोड मध्ये असलेली माहिती तुमच्या ब्राउजर वर दिसू लागेल.

निष्कर्ष :

या लेखात आपण किंवा QR कोड म्हणजे काय what is qr code in marathi, त्याचा अर्थ, त्याचा इतिहास, उपयोग आणि त्याचे प्रकार इत्यादी संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहिली आहे. तंत्रज्ञानाचा बदल कोणत्या दिशेने जात आहे हे सुद्धा यातून समजते. बारकोड ते QR कोड फक्त बदलच नाही तर तंत्रज्ञानाच्या प्रगतिशील वेगाचा हे उदाहरण आहे.


मला आशा आहे की तुम्ही सुद्धा क्यूआर कोड चा उपयोग अतिशय योग्य रित्या कराल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्कीच तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment