सर्च इंजिन म्हणजे काय आणि हे कार्य कसे करतात?

    नमस्कार मित्रांनो आपण आज सर्च इंजिन (शोध यंत्र) म्हणजे काय ? What is Search Engine In Marathi येथे बघणार आहोत. हे कसे कार्य करते आणि किती प्रकार पडतात याची पूर्ण माहिती येथे आपण मिळणार आहे. 

सर्च इंजिन म्हणजे काय? – What is Search Engine in Marathi

    सर्च इंजिन ही एक सॉफ्टवेअर सिस्टम आहे जी आपल्याला वर्ड वाईड वेब (World wide web) वर विशेष मजकूर/ माहिती साधण्यासाठी डिझाइन केलेली आहे. सर्च इंजिन द्वारे जी माहिती शोधली जाते ती वेगवेगळ्या संकेतस्थळांची पेजेस् द्वारे दर्शवली जातात. त्यामध्ये आपल्याला चित्रे, चित्रफीत यांचीही संकेतस्थळे असतात. 

उदा. Google, Bing, Yahoo!, Baidu, DuckDuckGo,Yandex etc.

    वरील उदाहरणामध्ये Google हे एक जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. Yandex हे रशिया मध्ये जास्त वापरले जाते तर Baidu हे चीन मध्ये लोकप्रिय झाले आहे.

सर्च इंजिन कार्य कसे करतात? – Working of Search Engine

खाली दिलेल्या 3 प्रक्रिया या सर्च इंजिन मधून होत असतात.

  1. Web crawling
  2. Indexing
  3. Searching

सविस्तर माहिती बघूयात..

1) Web Crawling-

    या प्रक्रियेमद्धे सर्च इंजिन वेगवेगळ्या साइट्स ला भेटी देत असते. यासाठी ते Spider ची मदत घेत असते. हे Spider आपल्या कोणत्याही संकेतस्थळाचे एक विशेष robots.txt नावाच्या फाइल्स तपासत  असतात. मग या robots.txt फाइल्स दिशादर्शकाचे काम करतात. कोणता मजकूर / पेजेस् ला भेट द्यायची आणि कोणत्या नाही द्यायची याची माहिती robots.txt फाइल्स कडून Spider ला मिळत असते.

यानंतर ही सर्व माहिती साठवून ठेवण्यासाठी (Indexed) पाठवली जाते. परंतु Spider कडून ही माहिती तपासत असताना वेगवेगळे घटक तपासले जातात. उदा. Titles, page content, JavaScript, Cascading Style Sheets (CSS), headings, or its metadata in HTML meta tags etc. 

2) Indexing-

    Indexing म्हणजे एखादे संकेतस्थळ सर्च इंजिन च्या शोध परिणाममध्ये  दर्शवले जाणे. आपण जेव्हा एखाद्या सर्च इंजिन  मध्ये माहिती शोधत असतो तेव्हा काही शब्द आणि वाक्य शोधयला टाकतो.

आपल्याला जे रिजल्ट दिसतात, ती  संकेतस्थळे त्या सर्च इंजिन मध्ये Index झाली आहेत असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच ही माहिती सर्वमान्य होण्यासाठीचे एक टोकन मिळाले असेही म्हणता येईल.

3) Searching

    यामध्ये प्रत्येक सर्च इंजिन आपापली वेगळी अल्गोरिदम वापरत असतो. त्यातीलच दोन प्रमुख अल्गोरिदम बघूयात. एक म्हणजे पूर्वनिर्धारित आणि श्रेणीबद्धपणे क्रमवारी लावलेले कीवर्ड आणि दुसरे म्हणजे डेटाबेस अनुक्रमणिका आहे जी संकेतस्थळामधून माहिती संचयित करते. 

सर्च इंजिन हे फायदा कसा करवून घेते?

    तर आपण आतापर्यंत जे पण सर्च इंजिन वापरत आहोत ती सर्व मोफत आहे परंतु, आपल्या लक्षात आले असेलच की कोणतीही माहिती जेव्हा आपण शोधतो तेव्हा आपल्याला आपल्या माहितीच्या संबंधित जाहिराती दिसत असतात. जर आपण त्यावर क्लिक केले तर त्याचा फायदा सर्च इंजिन ला होत असतो.

    अजून एक प्रश्न पडला असेलच…आपण उदहरणांमद्धे जी सर्च इंजिन बघितली आहेत ती  सर्व एक माहिती शोधण्यासाठी सारखेच रिजल्ट दाखवेल का? नाही कारण प्रत्येक सर्च इंजिन मध्ये जे अल्गोरिदम वापरले जाते ते वेगवेगळे असते. त्यामुळे हे परिणामही वेगवेगळे किंवा सारखे ही असू शकतात. 

सर्वात चांगले सर्च इंजिन कोणते आहे?

    कोणतेही सर्च इंजिन हे दुसऱ्यापेक्षा Best आहे असे आपण म्हणू नाही शकत. कारण आपणाला जी माहिती हवी आहे ती  माहिती ज्यातून पटकन मिळते तेच  आपण वापरतो. आज Google हे सर्च इंजिन खूप लोकप्रिय झाले आहे तीमुळे बहुतेक माहिती ही Google वरच शोधली जाते.

     आता Google, Yahoo! हे सर्च इंजिन आपली वयक्तिक माहिती गोळा  करत असते. त्यामुळे जी जागरूक झाली आहेत ती DuckDuckgo सारख्या सर्च इंजिन कडे वळायला लागली आहेत. यामध्ये कोणतीही वयक्तिक माहीत साठवली जात नाही.

आपण काय शिकलो?

    सर्च इंजिन म्हणजे काय What is Search Engine in Marathi? याची आपण बेसिक माहिती बघितली आहे. तसेच यांचे काम कसे चालते, इन्कम कसा मिळतो याचीही माहिती तुम्हाला मिळाली आहे. तसेच आपण कोणते सर्च इंजिन वापरले पाहिजे याचेही आकलन झाले असेलच. धन्यवाद! भेटूया परत नवीन लेखामध्ये अश्याच नवीन माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार!

Leave a Comment