मी विहीर बोलतेय मराठी निबंध | Autobiography Of A Well Essay In Marathi

नमस्कार मित्रानो. आज आपण मी विहीर बोलतेय मराठी निबंध म्हणजेच Autobiography Of A Well Essay In Marathi बद्दल जाणून घेणार आहोत . तर चला सुरू करूया essay on Autobiography Of A Well in marathi म्हणजेच Mi Ek Padki Vihir Boltey

… अरे इकडे तिकडे काय बघताय माझाच आवाज आहे आणि हा विहिरीतूनच येतोय.. भुतांच्या गोष्ट तुम्ही खूप ऐकल्यात राव पण घाबरू नका मलाही वाटत होते खूप दिवसापासून बोलावे तुमच्याशी असे मग म्हटले चला बोलू.. वर्षानुवर्षे मी तुमची तहान भागवत आहे पण आज माझी कहाणी ऐकताना घोटभर थंड पाणी प्या आणि बसा निवांत …. ऐका सांगते माझी कहाणी …

मी विहीर बोलतेय मराठी निबंध | Autobiography Of A Well Essay In Marathi

मी विहीर बोलतेय मराठी निबंध | Autobiography Of A Well Essay In Marathi

माझा जन्म झाला ते वर्षे मलाहि आठवत नाही.. पण शेतात पाणी कमी पडू लागले असे तुमच्या पूर्वजांना वाटले आणि माझी निर्मिती झाली… जितकी शेती मोठी तितके पाणी जास्त लागणार आणि उन्हाळ्यात तर विचारायलाच नको म्हणून आधी जेसिबीने आणि नंतर मजुरांनी मला खोदले .दोन तीन महिने अविरत माझ्यावर कधी यंत्राचे तर कधी मजुरांचे घाव सुरु होते वेदना खूप होत्या पण माझ्या पूर्णत्वास गेल्यांनतर मी कुणाची तरी आजन्म तहान भागवणार याचा आनंद हि वेगळा राहणार होता .

त्यामुळे जेंव्हापासुन खोदाई सुरु झाली तेव्हापासून मला देखील काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा कायम होती. आणि एक दिवस तो सुवर्णदिन आला ..सत्तर ते ऐन्शी फूट काम झाले आणि आता मालकाला वाटले कि पुरे झाले मग विधिवत पूजा करून मी सर्वांची तहान भागवण्यास सज्ज झाली,मग काय त्या दिवसापासून आजपर्यंत मालक ,मजूर,वाटसरू जो जो येईल त्याची तहान भागवत आहे. कुणीही माझ्याकडे येताना अस्वथ असतो पण तो जेव्हा माझ्यातील थंडगार मधूर असे पाणी पिऊन त्यांचा आत्मा तृप्त होतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णीय असा असतो आणि त्यापेक्षा मला अजून जास्त काही आनन्द असेल असे वाटत नाही.

केवळ मानसांना नाही तर उन्हाळ्यात जेव्हा जनावराच्या अंगाची काहीली होत असते तेव्हा ती माझ्यासमोरच्या हौदात मनसोक्त डुंबत असतात .या झाल्या सर्व सुखद आठवणी पण काही दुःखद आठवणींची पण मी साक्षीदार आहे . कधी तरी कुणी पोहण्याच्या नादात विहिरीत उतरतो आणि त्याच्या चुकिने त्याचा जीव गेला तरी त्याचे दूषन मलाच लावले जाते त्याचे मला फार वाईट वाटते पण आता करणार काय माझ्याकडे काही पर्याय नसतो आणि मी सांगणार तरी कुणाला ?

त्यात कुणी माझ्यामध्ये अनेक मूर्ती किंवा फोटो आणून टाकतो .त्यामुळॆ माझ्यातील प्रदुशन अधिक वाढते त्यावर काही काळ गावात चर्चा केली जाते पण त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरु होते … असो भरपूर वेळ झालाय आता माझी फक्त एकच विंनती आहे माझे शुद्ध आणि गोड पाणी सर्वांना अविरत मिळावे त्यात कुठेही व्यत्यय येऊ नये इतकेच .

निष्कर्ष

आज आपण मी विहीर बोलतेय मराठी निबंध म्हणजेच Autobiography Of A Well Essay In Marathi बद्दल जाणून घेतले . व ही essay on Autobiography Of A Well in marathi म्हणजेच Mi Ek Padki Vihir Boltey पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला वि

Leave a Comment