वर्तमानपत्राविषयी निबंध | essay on newspaper in marathi

वर्तमानपत्राविषयी निबंध | essay on newspaper in marathi

आजच्या काळात जगामध्ये कोणतीही घटना घडली तरीही त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या जवळ त्याची संपूर्ण माहिती येते. आजच्या या लेखामध्ये आपण वर्तमानपत्राविषयी निबंध (essay on newspaper in marathi) जाणून घेणार आहोत. हे सर्व फक्त वर्तमानपत्रामुळे शक्य झाल आहे. आत्ताच्या काळात वर्तमान पत्राशिवाय जीवनाची कल्पना करणे खूप कठीण आहे. आता ती एक पहिली आवश्यक वस्तू बनली आहे, ज्याला आपण दररोज सकाळी पहिल्यांदा पाहतो. वर्तमानपत्र आपल्याला जगामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती देण्यास मदत करतो आणि त्यामुळे आपण वर्तमान काळात जगत आहोत याची आपल्याला कल्पना होते.

र्तमानपत्रांमध्ये व्यापार, राजकारण, सामाजिक मुद्दे, बेरोजगारी, खेळ, आंतरराष्ट्रीय बातम्या, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, सण, तंत्रज्ञान इत्यादींची माहिती मिळते. वर्तमानपत्र विज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांची जागरूकता वाढविण्यासाठी मदत करते.

प्रस्तावना (Introduction on essay on newspaper in marathi) :

आज काल वर्तमानपत्र ही एक जीवनाची गरज बनली आहे. वर्तमानपत्र सर्वांसाठी आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आपल्या दिवसाची सुरुवात ताज्या घडामोडी आणि सुचना बरोबर करणे खूप चांगले असते. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. हे बाजारामध्ये जवळ जवळ सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 
एक वर्तमानपत्र बातम्यांचे प्रकाशन असतं जे कागदावर छापले जातात, आणि लोकांच्या घरांमध्ये वितरण केले जातात. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत. वर्तमानपत्र आपल्याला देशामध्ये होणाऱ्या सर्व घटना बरोबर जगामध्ये होणाऱ्या घटनांची ही माहिती देतो. वर्तमानपत्र आपल्याला खेळ, धर्म, समाज, अर्थव्यवस्था, चित्रपट, उद्योग, आहार, नोकरी इत्यादी विषयी सुद्धा माहिती देतो. भारत देशाचा नागरिक होण्याच्या नात्याने आपण आपल्या देशामध्ये आणि दुसऱ्या देशामध्ये होणाऱ्या सर्व घटना आणि वाद यांच्या विषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 
वर्तमानपत्र आपल्याकडे दररोज सकाळी येतं आणि याला वाचल्यानंतर आपल्याला खूप सारी माहिती मिळते. वर्तमानपत्र दररोज आपल्या वाढत्या महत्त्वामुळे सर्व क्षेत्रांमध्ये प्रसिद्धीस येत आहे. मग ते क्षेत्र मागासलेल असो किंवा विकास झालेला असो. वर्तमानपत्र विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वर्तमानपत्र सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी किंवा स्पर्धा पास होण्यासाठी आपली मदत करतो. 

विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी | vidnyan shap ki vardan marathi nibandh येथे वाचा

वर्तमानपत्र काय आहे (What is newspaper)?

वर्तमानपत्र आपल्याला संस्कृती परंपरा कला पारंपारिक नृत्य आणि अनेक गोष्टींविषयी माहिती देते. आजच्या आधुनिक काळात कोणत्याही व्यक्तीला आपल क्षेत्र किंवा नोकरी शिवाय दुसरं काहीही जाणून घेण्यासाठी वेळ नाही. अशा वेळेला वर्तमान पत्र आपल्याला सण-उत्सव, जत्रा, संस्कृती, कार्यक्रम यांचा दिवस व तारीख सांगते. वर्तमान पत्र आपल्याला जगातील सर्व वस्तूंविषयी अगदी सहज आणि सोप्या भाषेत माहिती देते. 
 

वर्तमानपत्राचा इतिहास (History of Newspaper):

आपल्या भारत देशामध्ये इंग्रज येण्याअगोदर वर्तमानपत्र नव्हते. इंग्रजांनी भारतामध्ये वर्तमानपत्राचा विकास केला आहे. सन 1780 मध्ये भारतातील सर्वात पहिले वर्तमानपत्र कोलकत्ता येथे प्रकाशित केलं गेलं होतं. ज्याचं नाव बंगाल दी बंगाल गॅजेट असं होतं आणि याच संपादन जेम्स हिक्की यांनी केलं होतं. तो हाच काळ होता जेव्हा भारतामध्ये वर्तमानपत्राचा विकास झाला होता. आज भारतामध्ये अनेक भाषांमधील वर्तमानपत्र प्रकाशित केले जातात. 

वर्तमानपत्राचे उपयोग (Uses of Newspaper):

 पहिल्या काळामध्ये वर्तमानपत्रांमध्ये फक्त बातम्या प्रकाशित केल्या जात होत्या. परंतु आता यामध्ये अनेक गोष्टींविषयी माहिती दिली जाते. तसं पाहायला गेलं तर सर्व विषयांची माहिती आता वर्तमानपत्रांमध्ये पाहायला मिळते. अनेक वर्तमानपत्रांची किंमत आजारांमध्ये त्यांच्या बातम्या आणि त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्धी यामुळे वेगवेगळी आहे. 
वर्तमानपत्र लोकांची आवश्यकता आणि गरज यानुसार एकापेक्षा जास्त उद्देशांची पूर्ती करते. वर्तमानपत्र आपल्याला आपल्या चारही बाजूला होणाऱ्या घटनांविषयी सूचित करते.


वर्तमानपत्राचे महत्त्व (Importance of Newspaper):

 वर्तमानपत्र वाचन हा एक आवडीचा भाग आहे. जर कोणी याला नियमित रूपाने वाचू लागला तर वर्तमानपत्र वाचायला कधीच विसरू शकणार नाही. वर्तमानपत्र विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते, कारण वर्तमानपत्र विद्यार्थ्यांसाठी योग्य रीतीने इंग्रजी बोलायला शिकवते. आता कोणतीही भाषा बोलणारा व्यक्ती वर्तमानपत्र सहज वाचू शकतो, कारण आता हिंदी, इंग्रजी उर्दू अशा अनेक भाषांमध्ये वर्तमानपत्र प्रकाशित केले जातात. वर्तमानपत्र आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण ते आपल्यासाठी जगभरातील कानाकोपऱ्यातून शेकडो बातम्या घेऊन येते. 

वर्तमानपत्राचे फायदे (advantages of Newspaper):

वर्तमानपत्र वाचल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात. वर्तमानपत्रामुळे आपल्याला देश विदेशामध्ये घडणाऱ्या घटनांची नवीन माहिती मिळते. नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध आणि नवीन बातम्या यांची माहिती आपल्याला वर्तमानपत्रातूनच भेटते. वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या सरकारी सूचना, नियम आणि जाहिराती आपल्याला आवश्यक आणि महत्त्वपूर्ण माहिती देतात. याबरोबरच वर्तमानपत्र आता एक व्यवसाय बनला आहे, ज्यामुळे हजारो संपादक, लेखक, रिपोर्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचा रोजगार यामुळे चालतो. 

वर्तमानपत्राचे तोटे (Disadvantages of newspaper):

वर्तमानपत्राचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा आहेत. कधी कधी काही वर्तमानपत्रे खोट्या बातम्या छापून जनतेला वेड्यात काढतात. कधीकधी काही वर्तमानपत्रे जातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात. 

निष्कर्ष (conclusion for essay on newspaper in marathi):

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण वर्तमानपत्राविषयी निबंध (Newspaper essay in Marathi) पहिला. तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment