सर्वात चांगले विडिओ एडिटिंग ऍप्स – Best Video Editing Apps

    Best Video Editing Apps : सध्याच्या ऑनलाईन जमान्यात सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आज प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर करत आहे. याच सोशल मीडियावर प्रत्येक जण बरेचदा काही  व्हिडिओ अपलोड करत असतो, हे व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला काही स्मार्टफोन ॲप्लिकेशनची गरज गरज भासत असते.  चला तर मग फ्री मध्ये उपलब्ध असणारे अशीच काही दर्जेदार स्मार्टफोन व्हिडिओ एडिटिंग ॲप पाहुयात….

सर्वात चांगले विडिओ एडिटिंग ऍप्स – Best Video Editing Apps

सर्वात चांगले विडिओ एडिटिंग ऍप्स - Best Video Editing Apps

१. Adobe Premiere Rush

    Adobe Premiere Rush हे एक फ्री Best Video Editing Apps व्हिडिओ एडिटिंग स्मार्टफोन ॲप्लिकेशन आहे. या ॲपचा वापर करून कोणताही व्हिडिओ कमीत कमी वेळेत चांगल्या प्रकारे एडिट करू शकतो. Adobe Premiere Rush हे ऑनलाइन व्हिडिओ एडिटिंग करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर अँप आहे.

Features-

 • १. या ॲपमध्ये कॅमेरा वापरण्यासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहे. यामुळे आपण ॲप मध्येच व्हिडिओ रेकॉर्ड करून लगेच एडिट करू शकतो.
 • २. व्हिडिओ एडिट केल्यानंतर ॲप मधून इतर कोणत्याही सोशल मीडियावर साईट वर शेअर करण्यासाठी किंवा गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.
 • ३. यामध्ये बरेच video effects, colour, zoom effects तसेच आपण स्वतः तयार केलेली काही animation युक्त क्लिप्स, टायटल्स आणि अजुन बरेच काही व्हिडिओमध्ये जोडू शकतो.
 • ४. विडिओ एडिट केल्यावर या ॲप मध्ये कुठले प्रकारचा वॉटरमार्क येत नाही. ५. हे ऍप फ्री मध्ये उपलब्ध असले तरी देखील यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जाहिराती पाहायला मिळत नाही.

२. Kinemaster

    Kinemaster Best Video Editing Apps विडिओ एडिटिंग साठी लोकप्रिय असणाऱ्या अनेक ऍप पैकी एक आहे. हे ॲप android आणि ios या दोन्ही प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे. ज्या व्यक्तींनी या आधी कधीच विडिओ एडिट केला नाही त्यांच्यासाठी kinemaster खूप फायदेशीर ठरेल. Kinemaster वापरण्यासाठी खूप सोप्पे आहे आणि त्यासोबत यामध्ये असणारे वेगवेगळे features वापरकर्त्याला लवकर समजण्यासारखे आहेत.

Features-

 • १. Kinemaster मध्ये आपण व्हिडिओ cut आणि trim करून आपल्याला पाहिजे तो ऑडिओ व्हिडिओ मध्ये टाकता येतो.
 • २.Kinemaster मध्ये खूप सार्‍या प्रकारचे animated titles उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला video editing मध्ये खूप मदत होते.
 • ३. Kinemaster चा वापर करून आपण वेगवेगळ्या formats आणि sizes मध्ये अगदी 4k मध्ये सुद्धा व्हिडिओ edit करता येतात.
 • ४. Kinemaster छोट्या किंवा मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या व्हिडिओ edit करण्यासाठी फायदेशीर आहे. Kinemaster ॲप च्या फ्री व्हर्जनमध्ये आपल्याला खूप साऱ्या जाहिराती पहाव्या लागतात आणि त्यासोबतच एडिट केलेल्या विडिओ मध्ये kinemaster चा वॉटरमार्क देखील येतो.

३. In Shot-

    व्हिडिओ एडिट करण्यासाठी In Shotहे देखील खूप लोकप्रिय असे अँप्लिकेशन आहे. InShot वापरण्यासाठी खूप सोपे आहे.  यामध्ये आपण अगदी कमीत कमी वेळेत चांगल्या प्रकारचे व्हिडिओ एडिट करू शकतो. ज्या व्यक्तीला विडिओ editing चा कोणताही अनुभव नाही किंवा यापूर्वी त्यांनी कधीही व्हिडिओ एडिट केलेला नाही अशा लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे. InShot android आणि ios दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

Features-

 • १. वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट साठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे व्हिडिओ यामध्ये खूप सोप्या पद्धतीने तयार करता येतात.
 • २. या ॲपमध्ये आपण शॉर्ट व्हिडिओ देखील एडिट करू शकतो.
 • ३. InShot चा वापर करून एकाच व्हिडिओ मध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे ऑडिओ आणि व्हिडिओ एकत्र करता येतात.
 • 4.InShot मध्ये व्हिडिओ एडिट केल्यावर त्यामध्ये InShot चा watermark येतो. जर आपण व्हिडिओ सेव्ह  करण्यापूर्वी ॲप मध्ये एखादी जाहिरात पूर्ण पाहिली तर आपल्या एडिटेड विडिओ मध्ये watermark येत नाही.

४. VideoShow

VideoShow app हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या खूप सार्‍या फ्री व्हिडिओ एडिटिंग अँप पैकी चांगल्या प्रतीचे, दर्जेदार असे  व्हिडिओ एडिटिंग ॲप आहे. VideoShow वापरण्यासाठी सोपे आहे, त्याच बरोबर याचा इंटरफेस देखील खूप सुटसुटीत आणि वापरकर्त्याला सहज समजेल असा आहे.

Features-

 • १. VideoShow अँप मध्ये 50 पेक्षा जास्त video themes फ्री मध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहे.
 • २. VideoShow ॲप्स वापर करून व्हिडिओ मध्ये आपल्याला हवे ते text ऍड करता करता येतात.
 • ३. एकाच व्हिडिओ मध्ये खूप सार्‍या प्रकारचे ऑडिओ ऍड करता येतात, त्याच बरोबर ऑडिओ ची क्वालिटी वाढवता येते.
 • ४. VideoShow मध्ये व्हिडिओ चे बॅकग्राउंड देखील ब्लर करता येते.

५. Vivavideo

VivaVideo हे देखील एक फ्रीमध्ये उपलब्ध असणारे  व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशन आहे. या अप्लिकेशन शाखा प्रमुख उद्देश म्हणजे अँड्रॉईड स्मार्ट फोनचा वापर करून व्यावसायिक दृष्ट्या लागणारे व्हिडिओ एडिट करणे.

Features-

 • १. Vivavideo मध्ये 100 हून अधिक प्रकारचे वेगवेगळे stickers, emoji, ॲनिमेशन युक्त क्लिप ,इत्यादी. अगदी फ्री मध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.
 • २. या ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग चे basic features जसे की video cut करणे, merge करणे, splitकरणे, इत्यादी. खूप चांगल्या पद्धतीने काम करतात.
 • ३. एडीट केलेले व्हिडिओ डायरेक्ट कुठल्याही सोशल मिडिया साईट्सवर शेअर करण्यासाठी किंवा गॅलरीमध्ये सेव करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.
 • ४. Vivavideo मध्ये स्लो मोशन व्हिडिओ एडिटर पर्याय उपलब्ध आहे.

६. VN Video Editor

फ्री व्हिडिओ एडिटिंग ॲप च्या यादीमध्ये VN Video Editor ला एक महत्त्वाचे स्थान आहे. या व्हिडिओ editor मध्ये फ्री मध्ये आपल्याला हव्या त्या प्रकारचे व्हिडिओ एडिट करू शकतो.

Features-

 • १. VN Video editorमध्ये कित्येक प्रकारचे video filters, effects, transitions, इत्यादी फ्री मध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.
 • २. या ॲपमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये आपण एक सेकंदाचा व्हिडिओ देखील एडिट करू शकतो.VN Video editor app फ्रीमध्ये उपलब्ध असल्यामुळे आपल्याला यामध्ये खूप साऱ्या जाहिराती पहाव्या लागतात.

७. Quik

Quik हे देखील खूप लोकप्रिय असे स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिट करण्यासाठी वापरले जाणारे अँप आहे. हे अँप फ्रीमध्ये उपलब्ध आहे.

Features-

 • १. Qick अँप मध्ये ऑटोमॅटिक व्हिडिओ तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
 • २. या ॲपमध्ये video crop करणे, वेगवेगळे video effects आणि texts व्हिडिओ मध्ये ॲड करता येतात.
 • ३. व्हिडिओ तयार केल्यानंतर सेव्ह करते वेळी आपण व्हिडिओ 1080p किंवा 720p मध्ये सेव्ह करू शकतो.
 • ४. एडीट केलेले व्हिडिओ आपण ग्रुप draft मध्ये सेव्ह करू शकतो.Quik app वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे ॲप फ्रीमधे उपलब्ध असून देखील कुठल्याही प्रकारच्या जाहिराती दाखवत नाही.

८. FilmoraGo

FilmoraGo मोबाईल अँप फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असणारे व्हिडिओ एडिटिंग ॲप आहे.  या ॲपचे फ्री version मध्ये बरेचसे featues वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. 

Features-

 • १. FilmoraGo मध्ये आपण १:१, १६:९, ३:४ इत्यादी प्रकारच्या वेगवेगळ्या आकारांमध्ये इंस्टाग्राम, युट्यूब यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म साठी व्हिडिओ तयार करू शकतो.
 • २. यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात themes आणि effects वापरण्यासाठी उपलब्ध आसतात.
 • ३. FilmoraGo अँप मध्ये डायरेक्ट फेसबुक, इन्स्टाग्राम, इत्यादी. सोशल मिडिया वरून फोटो किंवा विडिओ एडिट करण्यासाठी घेता येतात.
 • ४. एडिट केलेला विडिओचा preview आपल्याला लगेच पाहता येतो.

Leave a Comment