नमस्कार मित्रांनो WikiMitra मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत विविध मोबाइल कंपन्यांची माहिती Mobile Company Information in Marathi. आजच्या घडीला प्रत्येकाकडे कोणत्या न कोणत्या कंपनीचा मोबाईल फोन आहे, परंतु कित्येकांना आपण वापरत असलेल्या मोबाइल च्या कंपनीबद्दल नक्कीच माहिती नसणार. ती सर्व माहिती आज आपण येथे बघणार आहोत.
मोबाईल कंपन्यांची माहिती मराठी – Mobile Company Information in Marathi
मोबाइल कंपनीची यादी :
- Apple (US)
- Google (US)
- Samsung (South Korea)
- LG (South Korea)
- Nokia (Finland)
- Jio (India)
- Lava (India)
- XoloHuawei (China)
- Xiaomi (China)
- Lenovo (China)
- BBK Electronics (China)
- Oppo (2004)
- Vivo (2009)
- Oneplus (2013)
- Realme (2018)
- iOOQ (2019)
सविस्तर माहिती बघूयात :
Apple (US) Mobile Company Information in Marathi
Apple च्या मोबाइल बद्दल सर्वांनी ऐकलेले असेलच. ही एक US बेस कंपनी आहे. Steve Jobs, Steve Wozniak आणि Ronald Wayne या तिघांनी मिळून 1976 मध्ये Cupertino, California US मध्ये Apple ही कंपनी सुरु केली. तेव्हापासून आत्ता पर्यंत म्हणजे 2021 पर्यंत Consumer Electronics, Computer Software आणि Online Services या सर्व क्षेत्रांमध्ये नावलौकिक केला आहे. आज म्हणजे 2021 मध्ये टेक्नोलॉजी मध्ये जगातील पहिल्या क्रमांकावर याच कंपनीचे नाव आहे.
Google (US) Mobile Company Information in Marathi
Google म्हणजे आपण जे आता काही जे पण वाचतो आहोत ते यांच्या टेक्नोलॉजी मुळेच. यामागे Larry Page आणि Sergey Brian या दोघांचा खूप मोठा वाट आहे. तसे बघायला गेल तर या कंपनीची सुरुवात 1998 मधेच झाली होती, परंतु तब्बल 12 वर्षानंतर म्हणजे 2010 मध्ये या कंपनीने मोबाइल क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. Google Nexus One हा Google चा पहिला Smartphone. यानंतर 2016 मध्ये याचे उत्पादन बंद केले. त्यापूर्वी म्हणजे 2013 मध्ये Google Pixel नावाचा नवीन brand बाजारामध्ये आणला गेला, आणि आता तोच सध्या उपलब्ध आहे.
Samsung (South Korea) Mobile Company Information in Marathi
Samsung ही एक Korian कंपनी म्हणून ओळखली जाते. Lee Byung-chul यांनी 1938 मध्ये Seocho, Seoul – South Koria येथे या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला यांनी food processing, textiles, insurance, securities आणि retail या क्षेत्रामध्ये काम केले. त्यानंतर 1990 मध्ये मोबाइल क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. 1992 मध्ये तर Samsung मेमरी कार्ड बनवणारी जगात 1 नंबर म्हणून ओळखली जात होती.
1995 मध्ये Samsung ने आपला पहिला LCD बनवला आणि 2005 मध्ये तर ती जगातील विक्रमी LCD बनवणारी कंपनी बनली. त्यांची ही प्रगती बघून 2006 मध्ये Soni या कंपनीने देखील Samsung बरोबर काम करण्यासाठी हात मिळवणी केली. Samsung हा एवढा मोठा ग्रुप आहे की ज्यामध्ये तब्बल 80 कंपनी समाविष्ट आहेत. यामध्ये बहुतेक कंपन्या Korea Exchange stock-exchange मध्ये लिस्टेड आहेत.
LG (South Korea) Mobile Company Information in Marathi
1947 साली LG कंपनी जेव्हा सुरु झाली तेव्हा Lak Hui Chemical Industrial Corp. या नावाने झाली होती. त्यावेळी “Lucky” या नावानेही ओळखले जात होते. निर्माता Koo In-hwoi यांनी प्रथम plastic क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले होते. नंतर 1958 याच व्यवसायामध्ये वाढ करून Goldstar Co Ltd नावाची दुसरी कंपनी स्थापन केली गेली. आणि अखेर 1983 मध्ये या Lak Hui Chemical Industrial Corp. आणि Goldstar Co Ltd दोन्ही कंपन्या मिळून Lucky-Goldstar स्थापन झाली.
2000 मध्ये LG ने radios, wires, TVs, home appliances, semiconductors या क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावली. 1970 मध्ये जेव्हा कंपनीचे निर्माता जेव्हा आपल्या कामातून निवृत्त झाले तेव्हा त्यांचा मुलगा कंपनीचा कारभार सांभाळू लागला. नंतर 1995 मध्ये Lucky-Goldstar हे नाव बदलून LG हे नाव देण्यात आले आणि कंपनीची Tagline – “Life’s Good” ठेवण्यात आली. खरे बघायला गेल तर मोबाइल या क्षेत्रामध्ये काही विशेष अशी कामगिरी LG ने केली नाही आणि मोबाइल हे कंपनी चे प्रोडक्ट बंद करण्याच्या मार्गावर सध्या LG दिसत आहे.
Nokia (Finland) Mobile Company Information in Marathi
आज 2021 मध्ये तब्बल 156 वर्षांपूर्वी म्हणजेच 1865 मध्ये Grand Duchy of Finland याने Espoo, Finland मध्ये Nokia कंपनीची स्थापना केली होती. त्या काळी finland वर त्याचीच सत्ता होती. आत्तापर्यंत Rubber, Cable, telecommunication infrastructure, development of GSM, 3G, LTE अशा विविध क्षेत्रामध्ये या कंपनीने काम केले आहे. Nokia ने आपले “Connecting People” हे जाहिरात घोषणा ओव्ह स्ट्रँडबर्ग यांनी 1992 मध्ये सादर केले.
मोबाइल उत्पादनामध्ये 2000 मध्ये जगात Samsung च्या पाठोपाठ दुसर्या क्रमांकावर असलेली Nokia मात्र touchscreen Mobile न बनवल्यामुळे मागे पडली होती, नंतर 2014 मध्ये Microsoft बरोबर मिळून काम करून पुन्हा नव्याने बाजारामध्ये आली. 2018 मध्ये नोकिया जगातील तिसर्या क्रमांकाचे नेटवर्क उपकरणे निर्माता बनली आहे. सध्या Nokia ही the Nasdaq Nordic/Helsinki आणि New York stock exchanges वरती लिस्टेड आहे आणि फिनलंडच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठी भूमिका बजावत आहे.
Jio (India) Mobile Company Information in Marathi
अत्यंत कमी वेळेमध्ये नावा रूपाला आलेली कंपनी म्हणून Jio या कंपनीकडे बघितले जाते. 2007 मध्ये Nariman Point, Mumbai येथे Mukesh Ambani यांनी या कंपनीची स्थापना केली. 2015 मध्ये Jio ने LYF या उपकंपनी मार्फत आपला पहिला मोबाइल बाजारात आणला. यानंतर 2017 मध्ये अतिशय कमी किमतीच्या JioPhone ची निर्मिती केली. सध्या Jio Fiber मध्ये प्रगती सुरू आहे. लवकरच आपल्याला Jio ची 5जी (5G) सेवा बघायला मिळेल.
Lava (India) Mobile Company Information in Marathi
अगदीच अलीकडे म्हणजे 2009 मध्ये Hari Om Rai, Sunil Bhalla, Vishal Sehgal यांनी Noida, Uttar Pradesh मध्ये या कंपनीची सुरुवात केली. या कंपनीचे R&D केंद्र हे चायना मध्ये आहे तर डिझाईन आणि डेव्हलपमेंट हे भारतामध्ये होते. 2012 मध्ये Xolo या ब्रान्ड मार्फत स्मार्टफोन बाजारामध्ये आणले गेले. यांनी मोबाइल च्या Online विक्रीस प्राधान्य दिले. Flipkart, Amazon सारख्या platform वर जबरदस्त ऑफर देऊन ग्राहक बनविले.
Huawei (China) Mobile Company Information in Marathi
Huawei या कंपनीचा उगमही चायना मध्येच झाला आहे. 1987 मध्ये Ren Zhengfei यांनी Shenzhen, China मध्ये phone switches बनवणारी कंपनी सुरू केली. त्यानंतर 2004 मध्ये मोबाइल क्षेत्रामध्ये पाऊल टाकले. Huawei ने 2018 मध्ये 200 लाख स्मार्ट फोन ची विक्री केली तर 2020 च्या दुसर्या सत्रामध्ये Samsung ला मागे टाकत जगातील सर्वांत जास्त स्मार्टफोन विक्री करणारी दुसरी कंपनी बनली. आज Huawei चे 12 R&D केंद्र विविध देशामध्ये कार्य करत आहेत.
Xiaomi (China) Mobile Company Information in Marathi
Xiaomi या कंपनीची सुरुवातही चायना मध्ये Haidian, Beijing येथे झाली. 2010 मध्ये Lei Jun यांनी smartphones, mobile apps, laptops, home appliances, bags, shoes, consumer electronic या उत्पादनांसह आपल्या कंपनीला सुरुवात केली. 2011 मध्ये कंपनीचा पहिला स्मार्ट फोन बाजारात आला. 2014 मध्ये तर Apple, Samsung आणि Huawei नंतर जगात चौथ्या क्रमांकाची स्मार्ट फोन बनवणारी कंपनी बनली. सामान्य नागरीकाला परवडतील असे मध्यम किमतीचे फोन काढण्यावर या कंपनीचा जास्त जोर होता. त्यामुळे लवकरच प्रगती करत अनेकांची मन जिंकता आली.
Lenovo (China) Mobile Company Information in Marathi
Liu Chuanzhi यांनी 1984 मध्ये Hong Kong, Beijing China मध्ये आपल्या कंपनीला सुरुवात केली. Lenovo सध्या 80 देशांमध्ये आपले उत्पादन जसे की personal computers, tablet computers, smartphones, workstations, servers, supercomputers, electronic storage devices, IT management software, and smart televisions बनवत आहे आणि 180 देशांमध्ये त्यांची विक्री होत आहे. 2021 मध्ये तर जगातील सर्वात मोठा personal computers विक्रेता म्हणून Lenovo ने नाव नोंदणी केली आहे.
BBK Electronics (China) Mobile Company Information in Marathi
BBK Electronics हे नाव तर आपण पहिल्यांदाच ऐकले असेल. या कंपनीच्या ब्रान्ड असलेले नाव आपल्याला माहिती आहे परंतु मुख्य कंपनी आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हती ती म्हणजे BBK Electronics. या कंपनीची सुरुवातदेखील चायना मधेच Guangdong येथे झाली. Duan Yongping यांनी 1995 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे आज म्हणजे 2021 च्या पहिल्या सत्रामध्ये सर्व मोबाइल कंपन्यांना मागे टाकत BBK Electronics हि जगातील मोबाइल उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या कंपनीच्या मध्ये खाली दिलेली Sub-brand येतात.
- Oppo – 2004 (Tony Chen)
- Vivo – 2009 (Shen Wei)
- Oneplus – 2013 (Carl Pei & Pete Lau)
- Realme – 2018 (Sky Li)
- iOOQ – 2019 (Gagan Arora)
खाली दिलेल्या चार्ट वरून वरील सर्व माहिती पटकन समजेल :
अ.नं. |
कंपनी |
देश |
वर्षे |
1 |
Apple |
US |
1976 |
2 |
|
US |
1998 |
3 |
Samsung |
South Koria |
1938 |
4 |
LG |
South Koria |
1947 |
5 |
Nokia |
Finland |
1865 |
6 |
Jio |
India |
2007 |
7 |
Lava |
India |
2009 |
8 |
Huawei |
China |
1987 |
9 |
Xiaomi |
China |
2010 |
10 |
Lenovo |
China |
1984 |
11 |
BBK Electronics |
China |
1995 |
A |
Oppo |
China |
2004 |
B |
Vivo |
China |
2009 |
C |
Oneplus |
China |
2013 |
D |
Realme |
China |
2018 |
E |
iOOQ |
China |
2019 |
आपण काय शिकलो?
आज आपण मोबाइल बनवणाऱ्या कंपन्यांबद्दल सविस्तर माहिती Mobile Company Information in Marathi बघितली. या मध्ये आज सर्वात जास्त वापरात असलेले सर्व मोबाइल समाविष्ट आहेत, तरीही अजून काही माहिती हवी असल्यास खाली अभिप्राय द्यायला विसरू नका. भेटूया परत अश्याच नवीन माहिती सोबत.धन्यवाद!