Chandol Birds Information In Marathi चांडोल हा पक्षी एक चिमणीच्या आकाराचा पक्षी असून तो गाणारा पक्षी म्हणून प्रसिद्ध आहे. या पक्षाचे नाव अतिशय सुंदर असून त्याच्या नावाप्रमाणेच पक्षी दिसायला सुंदर व गोड गाणे गातो. भारतामध्ये त्याच्या पाच ते सात जाती आढळून येतात. याचे पंख तपकिरी आणि काळ्या रंगाचा असतात तसेच पंखाच्या आतील भाग पोट, चेहरा आणि घसा हा मात्र क्रीम या रंगाच्या आपल्याला दिसतो.
चंडोल पक्ष्यांची संपूर्ण माहिती Chandol Birds Information In Marathi
त्याच्या डोक्यावर टोपी घातल्यासारखा एक छोटासा आकार असतो तसेच त्यावर तपकिरी रंगाचे व काळ्या रंगाचे पट्टे असतात. त्याची चोच छोटीशी असून पाय सुद्धा मध्यम आकाराचे आणि फिकट तपकिरी रंगाचे असतात. या पक्षांमध्ये नर आणि मादी दिसायला वेगवेगळ्या असतात. मादी ही नरापेक्षा आकाराने थोडी मोठी असते तसेच नर व मादी मिळून दोघेही अंडी उबवतात, घरटे बांधतात. अंड्याचे संरक्षण करतात तसेच अन्न गोळा करतात.
नर चांडोल पक्षी आणि मादी चंदन पक्षी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी सुंदर अशी गाणी गातात. त्यांच्या गाण्याचा आवाज गोड असतो. धनुष्यातून बाण वेगाने हवेमध्ये जातो. त्याचप्रमाणे ते वेगवान उड्डाण घेतात. चांडोल या पक्षाला इंग्लिश मध्ये क्लार्क बर्ड असे म्हणतात. चांडोल या पक्षाच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. या पक्षांच्या संख्येमधील घटीचे कारण हे वाढते शहरीकरण, वृक्षतोड व औद्योगीकरण आहे. या पक्षांनी आपले स्थलांतर पूर्वेन्यूअल कडे वाढवले आहेत.
चांडोली या पक्षाचे रचना :
चांडोल हा पक्षी दिसायला आकर्षक दिसतो. त्याच्या रंगामुळे त्याच्यावर विशेष नक्षीकाम झाल्यासारखे आपल्याला दिसते. त्याचा खालचा भाग लालसर रंगाचा असतो तर डोके मान व वरचा भाग हा हिरव्या रंगाचा असतात. त्याच्या डोळ्याभोवती एक चमकदार वलय आपल्याला दिसते तसेच त्यांच्या कडा काळ्या पट्ट्यासह असतात. त्यांची शक्ती काड्या पांढऱ्या पट्ट्या सह निळ्या हिरव्या आणि पंख हे पांढऱ्या पट्ट्यांसह काळे असतात.
या पक्षाचे डोळे मोठे आणि छोटीसी एक चोच असते. हे पक्षी त्यांच्या प्रकरणाच्या काळात खूप घुंगट करतात त्यांचे गुंघाट आपल्याला दूरवरूनच ऐकू येतो. जेव्हा त्यांना धोक्याचा इशारा मिळतो तेव्हा ते खूप गोंगाट करायला सुरुवात करतात. जोपर्यंत त्यांचा धोका टळत नाही तोपर्यंत डोके व शेपूट पसरवून ते स्थिर राहत नाही. चिमणा चांडोल हा पक्षी भारतात सर्वत्र आढळून येतो.
चांडोल पक्षी कोठे राहतात :
हे पक्षी थव्यांमध्ये राहणे पसंत करतात तसेच यांच्या काही प्रजाती भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेमध्ये सुद्धा आढळून येतात. हे पक्षी वेगवेगळ्या प्रजातीचे असून मोठ्या प्रमाणात एकत्रित राहतात. या पक्षांचा वास्तव हा ओसाळ भाग शेती किंवा माळरानामध्ये जास्त असतो.
त्याचबरोबर हे पक्षी आपले घरटे कापूस वापरून बनवतात. त्यांचे घरटे खूप सुंदर उदार व मऊ असते. काही जातीच्या पक्षींमध्ये वाढलेल्या गवतापासून सुद्धा घरटे बनवले जाते. हे घरटे एका छोट्या वाटीच्या आकाराचे असते व त्यामध्ये ते आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी अंडी देतात व त्या अंड्याची देखभाल नर व मादी दोघे मिळून करतात.
चंडोल्या पक्षाचा आहार :
चांडोल हा पक्षी सर्व पक्षी आहे. हे पक्षी विशेषता किडे, मुंग्या, अळ्या व गवत सुद्धा खातात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केळ्याचे प्रमाण कमी असते. तेव्हा हे पक्षी झाडांच्या कळ्या, फुले, फळे, बिया आणि विविध प्रकारचे धान्य सुद्धा खातात.
चांडोल पक्षाचे प्रकार :
चांडोली या पक्षाचे भारतामध्ये जवळपास प्रकार आढळून येतात.
क्रेस्टेड चांडोल पक्षी : या पक्ष्यांची प्रजाती आकाराने खूप लहान असते तसेच या पक्षाचे वजन 30 ते 55 ग्रॅम पर्यंत असते. या पक्षांची उंची ही 15 ते 17 सेंटीमीटर असून या पक्षाच्या पंखाखालची लांबी 30 ते 40 सेंटीमीटर असते. या पक्षांच्या डोक्यावर तुरे असतात. याला तुरेबाज चांडोल या नावाने सुद्धा ओळखले जातात. हा एक तपकिरी रंगाचा पक्षी असतो तसेच त्याची शेपटी लहान असते. या पक्षांची पिसे फिकट तपकिरी रंगाची असतात. हे पक्षी सुद्धा किडे, अळ्या, झाडांची फुले, कळ्या व धान्य खातात.
बेंगाल बुश चांडोल पक्षी : या प्रजातीच्या पक्षाचे शेपूट हे लहान असून मजबूत असते. या पक्षांची लांबी पंधरा सेंटिमीटर असते. हे पक्षी दिसायला सुंदर असतात. या पक्षांचा वरचा भाग हा राखाडी असून त्या पक्षांच्या छातीवर व डोळ्यावर छोटे छोटे ठिपके असतात.
सिंगिंग बुश चांडोल पक्षी : या पक्षाला मराठी भाषेमध्ये गाणारा भट म्हणून सुद्धा ओळखले जाते. या पक्षाच्या छातीवर छोटे छोटे ठिपके असतात. त्याची शेपटी लांब असते तसेच त्याची चोच छोटीसी व जाड असते. हे पक्षी भारतात आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये सुद्धा आढळून येतात. सिंगिंग बुश चांडोल या पक्षाचे वजन सात ते आठ ग्रॅम असते तसेच या पक्षांचा आकार हा 3.5 ते 3.8 इंच असतो. या पक्षाचा रंग तपकिरी व पिवळ्या रंगाचा असतो आणि त्यावर काड्या पांढऱ्या रंगाचे नक्षीकाम झाल्यासारखे आपल्याला दिसते.
मलाबार क्रेस्टेट चंडोल पक्षी : या पक्षांच्या प्रजातीला मालाबार असे सुद्धा म्हणतात. या पक्षांचा आकार इतर चांडोल पक्षापेक्षा छोटा असतो. हे पक्षी भारतामध्ये सुद्धा आढळत नाही. केवळ भारतामध्ये ते थंडीच्या दिवसांमध्ये बाहेरून येतात आणि थंडीचा हंगाम संपला की, पुन्हा दुसरीकडे स्थलांतरित होतात. भारतामध्ये हे पक्षी पाहुण्यांप्रमाणे येतात.
रेडविन्गड चांडोल पक्षी : या पक्षांच्या प्रजाती पंखावर तांबूस रंगाचे डाग असतात तसेच या पक्षांना इतर प्रजातीच्या पक्षांपेक्षा ओढायला अगदी सोपे असते. नर आणि मादी दोन्ही सुद्धा दिसायला सारखेच असतात त्यामुळे दोघांना ओळखणे मात्र कठीण जाते. या पक्षांना मराठीमध्ये तांबडा भट चांडोल म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे पक्षी झाडाझुडपांच्या जंगलामध्ये किंवा रानांमध्ये खव्यामध्ये राहतात.
चांडूल पक्षांची काही वैशिष्ट्ये :
- चांडोल हे पक्षी उंच आकाशामध्ये पाच ते दहा मिनिटे एकाच ठिकाणी हवेमध्ये स्थिर राहू शकतात. भारतामध्ये एक छोटासा गाणारा पक्षी म्हणून त्याची ओळख आहे.
- चांडोल हा भारतामध्ये सर्वत्र आढळून येतो तसेच या पक्षाला छोटा चांडोल पक्षी म्हणून सुद्धा ओळखतात.
- अंडी उबवण्याचा कालावधी हा अकरा ते बारा दिवसांचा असतो.
- वसंत ऋतुमध्ये या पक्षाचे गायन आपल्याला ऐकू येते.
- चांडोल या पक्षाचे अस्तित्व पृथ्वीवर पंधरा ते वीस दशलक्ष वर्षापासून आहे.
FAQ
चांडोल पक्षी काय खातात?
चांडोल पक्षी किडे, मुंग्या, अळ्या, गवताच्या बिया इतर धान्य खातात.
चिमणा चांडोल पक्षी कसा दिसतो?
चिमणा चांडोल पक्षाचा रंग पाठीवर मातकट व तपकिरी असतो तसेच छाती व पोटावर त्याचा रंग काळा असतो. हे पक्षी ओसाड जमीन शेती व कोरड्या माळरानावर आढळून येतात.
चांदवड पक्षाच्या भारतात किती प्रजाती आढळतात?
चांडोली या पक्षाच्या भारतात पाच जाती आढळतात.
कोणत्या प्रजातीमध्ये नर व मादी सारखेच दिसतात?
रेडविन्गड चांडोल.
चांडोल पक्षी पृथ्वीवर कधीपासून अस्तित्वात आहे?
चांडोल पक्ष्यांच्या प्रजाती ही दहा ते अकरा दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात आहे .