Autobiography Of A Parraot Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत पोपटाचे मनोगत वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही पोपटाचे आत्मवृत्त, पोपटाचे आत्मकथा आणि मी पोपट बोलतोय या विषयावर सुद्धा वापरू शकता.
पोपटाचे मनोगत मराठी निबंध Autobiography Of A Parraot Essay In Marathi
मला तुम्ही ओळखले असेलच, मला काही जण आपल्या घरी पिंजऱ्यात डांबून ठेवतात. मला बोलणे शिकवतात. मी माणसाप्रमाणे बोलायला शिकतो. मला बरेच जण मिठू मिठू या नावाने आवाज देतात. होय तुम्ही मला बरोबर ओळखलं.
मी पोपटा आहे. माझे आत्मचरित्र लिहीत आहे. त्याला माझ्या आयुष्याकडे एक नजर टाकुयात. माझे जीवन कसे आहे.हे मी आज तुम्हाला सांगणार आहे.
मी एका हिरव्यागार आणि दाट पावसाळी जंगलात जन्मलो. माझ्या व्यतिरिक्त अजूनही बरेच पोपट होते,ते गोंगाट करणारे आणि मजेदार होते. पालक भावंडे व मित्र आणि शेजारी होते. मला खात्री होती की मी मोठा होईल.
एकदा माझे आयुष्य अचानक बदलले- जंगलात अनोळखी लोक दिसले, मला पकडले, पिंजर्यात ठेवले आणि कोठेतरी घेऊन गेले.
माझं बालपण संपलं होतं. त्यामुळे दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांच्या दुकानात राहत होतो. जसे दिवस जात होते तसे मला कंटाळवाणे वाटत होते.
एक दिवस माझ्यासाठी नशीबवान होता कारण एक लहान मुलगा दुकानात आला. आणि त्याने मला विकत घेतले. त्याचे नाव अनिल होत. तो एक लहान मुलगा होता. तो माझा मित्र झाला. तेव्हापासून माझे सुखी जीवन चालू झाले. आणि माझ्याशी छान खेळतो बऱ्याच गोष्टी बोलतो ,माझी काळजी घेतो तसेच माझे कौतुकही करतो.
मला छान खोली भोवती उड्डाण करून देतो, माझ्या मित्रांशी बोलू देतो, माझे आवडते पदार्थ हिरवी मिरची, पेरू, पोळी इत्यादी खायला देत असे. पिंजऱ्यातील जेवणाची सवय झाली ,मला तिथे राहणे आवडू लागले.
मला सुमधुर बोलणे शिकविण्याचा प्रयत्न केला, माझी स्वच्छ आंघोळ करून देत असे, तसेच प्यायलाही स्वच्छ पाणी देत असे. अशाप्रकारे अनिल माझ्यावर खूप प्रेम करत असे. जेव्हा तो वाईट मनस्थितीत असतो तेव्हा तो माझ्याजवळ येऊन, त्याच्या चिंता तो मला सांगत असे.
मी कदाचित मदत करू शकत नाही ,परंतु त्याचे म्हणणे ऐकून घेऊ शकतो. तो मला खायला, द्यायला व पिंजरा साफ करायला कधीही विसरत नसे. त्याला माझे सर्व आवड-निवड माहीत झाली होती. तो मला दुध पोळी हि देत असे हिरवी मिरची ,पेरू इत्यादी देत असे.
तसेच त्याच्या कुटुंबातील सर्व लोक खूप चांगले होत.तेही माझी काळजी घेत असे. रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे ते मला घरात उडायला सोडत असे. घरातील त्या छोट्याश्या जागेत मी थोडाफार उडवून घेत असे ,परंतु मोकळ्या आकाशात उडण्याची मजा काही वेगळीच असते.
” हरवले गगन, हरवली स्वच्छंदी भरारी, नको सोन्याचा पिंजरा सोडून द्या ,मुक्त दिशा बोलाविती…”
” काय करू अशा जगण्याला? गोड फळे, हिरवी मिरची सारे खायला मिळतं. पण स्वातंत्र्याचे वारे नाही. पायात गुलामीच्या शृंखला, काय करू? सारे येतात गोड गोड बोलतात. मोहक रूप बघून आनंदी होतात.
मला माझे ते आनंदी क्षण आठवतात. सरकारच्या खुशीत मी जन्मलो ,वाढलो, खेळलो, सूर्य चंद्राच्या किरणात बागडलो. वृक्ष,वेली, चांदणे,झरे यांच्या अंगा-खांद्यावर खेळलो. त्यांच्या सहवासातील ते आनंदी क्षण का लुप्त झालेत? उंच टेकड्या, मोठे पर्वत ,दाट वनराई, निळेशार आकाश, हिरवेगार धरती अशा पार्श्वभूमीवर मला मुक्तपणे उडायलाआवडते.
माझ्या मित्रांच्या संगतीने मी आकाशाला गवसणी घालत होतो, आमचा येथे चा आस्वाद घेत होतो, ती तांबूस संध्याकाळ, तो सूर्यास्त, मंदावलेले झोके, घरट्याकडे परतणारे इतर पक्षी, त्यांचा किलबिलाट, हे सारे इथे दिसत नाही. माझं ‘मी’पण हरवलं
“31 मे तुम्ही जागतिक पोपट दिन म्हणून साजरा करतात. ब्रिटनमध्ये पोपटाचं साठी विश्वस्त संस्था स्थापन होणार आहे. त्याचे जीवनमान सुधारण्याचा हा प्रयत्न मन सुखावते, पण प्रत्येक पक्षी मुक्त हवा. बंद नको. माझ्या मित्रांच्या गगनातील सोबत मला हवी आहे.”
” मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो ज्या पद्धतीने तुम्ही कोठेही जाण्यास स्वतंत्र आहात. त्याच पद्धतीने मलाही स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायला आवडते .म्हणूनच पिंजऱ्यात बंदिस्त ना करता दुरूनच सौंदर्याचा अनुभव घ्या”.