चिकन दम बिर्याणी रेसिपी मराठी | chicken dum biryani recipe in marathi

वाचकांनो नमस्कार लॉकडाऊनमुळे सर्वत्र बरेच दिवस हॉटेल बंद होते त्यामुळे प्रत्येकालाच चमचमीत पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा झालेली आहे.

आज आपण एक किलो चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) कशी बनवावी हे बघणार आहोत. ही रेसिपी योग्य रीतीने फॉलो केली तर नक्कीच हॉटेल ढाबा सारखी बिर्याणी बनेल यात शंकाच नाही. आपण एक किलो बिर्याणी बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत.ही बिर्याणी 5 ते 6 लोकांना आरामात पुरु शकेल.

चिकन दम बिर्याणी साहित्य (chicken dum biryani recipe ingredients ):

  • चिकन 1 किलो
  • बासमती तांदूळ 750 ग्रॅम
  • कांदा 500 ग्रॅम
  • तेल अर्धा कप
  • दही 250 ग्रॅम
  • काश्मिरी लाल मिरची पावडर-दीड चमचा
  • हळद
  • लिंबू
  • हिरव्या मिरच्या 2 ते 3
  • कोथिंबीर
  • पुदिना पाने
  • मीठ चवीनुसार
  • गरम मसाला पावडर- 2 चमचे
  • दूध अर्ध कप
  • आले लसूण पेस्ट-4 चमचे
  • विलायची 3 ते 4
  • लवंगा 4 ते 5
  • जिरे एक चमचा
  • दालचिनी
  • चक्राफुल
  • तमालपत्र

चिकन दम बिर्याणी कृती ( chicken dum biryani recipe step by step ):

सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेणार आहोत. कांदा कुरकुरीत होण्यासाठी उभा व पातळ असा चिरून घायचा आहे. नंतर कढई मध्ये तेल घेऊन चांगलं कडकडीत उकळून घ्याच. नंतर उकळत्या तेलामध्ये कांदा टाकून तळून घायचा आहे. कांदा तळताना गॅस हा हायफ्लेम वरच ठेवायचा आहे. गॅस कमी केला तर कांदा तेल शोषयला लागतो. परिणामी कांदा कुरकुरीत न होता मऊसूत पडतो व बिर्याणी मध्ये चव देत नाही.
कांदा हलका ब्राऊन रंगाचा होईपर्यंत टाळून घायचा आहे. कांदा जास्त तळला गेला तर करपट लागतो व बिर्याणीची चव बिघडते. कांदा टाळून झाल्यावर एका भांड्यात काढून घ्यावा व तेल चांगले निथळून घ्या. बिर्याणी बनवायच्या आधल्या रात्री कांदा तळून हवाबंद डब्यात ठेवला तर चांगला कुरकुरीत होतो.

आत्ता आपण चिकन ला मॅरीनेट करून घेणार आहोत त्यासाठी एक पातेलं घायचं आहे. शक्यतो कुकर घेतलेला चांगलं मात्र जे भांडे घेणार आहात त्याचा तळ जाड असावा. आत्ता चिकन चांगलं धुवून स्वच्छ करून पातेलं किंवा कुकर मध्ये काढून घायचा आहे त्यावर 250 मिली आंबट नसलेलं दही घालायचं आहे. त्यांनतर छोटा पोहे खाण्याचा दीड चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर टाकायची आहे.

मटार पनीर रेसिपी मराठी | matar paneer recipe in marathi येथे वाचा

नंतर अर्धा चमचा हळद,लिंबाचा रस (अर्धे लिंबू) मीठ चवीनुसार, 2 ते 3 हिरव्या मिरच्या (उभे काप करून) दालचिनी 2 ते 3 तुकडे, लवंग 4 ते 5, ईलायची 5 ते 6 व एक चमचा जिरे,आवडीनुसार कोथिंबीर व पुदिना पाने व आले लसूण पेस्ट 3 ते 4 चमचे,गरम मसाला पावडर 2 चमचे, कोमट दूध अर्धा कप व तळलेल्या कांद्यापैकी थोडासा कांदा व अर्धी वाटी तेल टाकून चिकन ला व्यवस्थित लावून घायचं आहे.

सर्व चिकन ला मसाले व साहित्य व्यवस्थित लावल्यानंतर झाकण लावून मेरिनेशन अर्थात मुरण्यासाठी 2 3 तास ठेऊन द्याचे आहे. फ्रिज असेल तर फ्रिज मध्ये ठेवणं अधिक चांगला. चिकन marinate होइपर्यंत आपण भात बनवून घेणार आहोत. त्यासाठी 750 ग्रॅम चांगल्या प्रतीचा जुना बासमती तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घायचा आहे व अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजू घालायचा आहे. नंतर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यात खडे मसाले घालावे.

यामध्ये जिरे एक छोटा चमचा, दालचिनी,लवंगा 6 ते 7,चक्रीफुल 1,तमालपत्र 4 ते 5, हिरवी मिरची 2 (उभे काप घेऊन) पुदिना व कोथिंबीरीची पाने मीठ नेहमीपेक्षा दुपट्ट लिंबाचा रस (अर्धा) हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्याची आहे. उकळी आल्यानंतर त्यात भिजत घातलेला तांदूळ घालायचा आहे.यावेळेस गॅस मोठा असावा. यानंतर फ्रिजमधून marinashan साठी ठेवलेलं चिकन च भांड काढून घायचं आहे.

भात 50 टक्के शिजल्यानंतर त्यातला अर्धा भात marinate केलेल्या चिकनवर थर द्यायचा आहे. अर्धा भात तसाच उकळत ठेवायचा आहे. उरलेला भात 70 टक्के शिजल्यावर पाणी गाळून निथळून घायचं आहे व त्या भाताचा देखील अलगद थर आधीच्या भातावर द्याच आहे. आता त्यात केशर भिजत घातलेलं अर्धा वाटी दूध टाकायचं आहे. केशर नसेल तर दुधात खाद्य रंग टाकून देखील वापरू शकता. त्यांनतर 3 ते 4 चमचे गावरान साजूक तूप टाकायचं आहे.

पुदिना पाने व कोथिंबीर सोबत तळलेला राहिलेला कांदा घालायचा आहे.त्यांनतर तुम्ही पातेलं वापरणार असाल तर योग्य आकाराचं झाकण ठेवून कणकेने व्यवस्तीत पॅक करायचं आहे. कुकर वापरणार असाल तर कुकरची शिटी काढून झाकण लावायचं आहे. मात्र रिंग काढायची नाही. भांड गॅसवर ठेऊन सुरवातीची 5 ते 6 मिनिटे गॅस मोठा ठेवायचा आहे. त्यांनतर बारीक गॅसवर 10 ते 12 मिनिटे शिजवायच आहे. त्यानंतर एक तवा घेऊन तो गॅसवर ठेवायचा आहे. तवा गरम झाला की गॅस मध्यम करून त्यावर बिर्याणीचे भांडे ठेवायचं आहे व 30 ते 35 मिनिटे दम देऊन घायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. चला तर म आपली हॉटेल सारखी चिकन दम बिर्याणी खण्यासाठी तयार आहे.

Leave a Comment