Dr. Patangrao Kadam Information In Marathi डॉक्टर पतंगराव कदम हे एक राजकारणी होते तसेच ते महाराष्ट्रातील वन, भूकंप पुनर्वसन मंत्री सुद्धा होते. त्यांनी कष्टातून शिक्षण घेऊन स्वतःचे करिअर घडवले व इतरांचा सुद्धा शैक्षणिक विकास घडवून आणला.
डॉ. पतंगराव कदम यांची संपूर्ण माहिती Dr. Patangrao Kadam Information In Marathi
पतंगराव कदम यांचा जन्म व बालपण :
पतंगराव कदम यांचा जन्म 8 जानेवारी 1944 मध्ये सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. पतंगरावांचा जन्म ज्या गावांमध्ये झाला ते गाव 800 लोकांचे असून दुष्काळग्रस्त असे होते. हे गाव एक छोटेसे गाव होते तसेच या गावांमध्ये छोट्या शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नव्हती तसेच शाळेत जाण्यासाठी सुद्धा त्यांना दररोज पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत असे.
पतंगराव कदम यांचे शिक्षण :
पतंगराव कदम यांचे गाव खेडेगाव असल्यामुळे तेथे गावामध्ये कोणत्याही प्रकारची शाळेची व्यवस्था नव्हती. त्यांना जर शिक्षण घ्यायचे असेल तर पाच किलोमीटर पायपीट करत शाळेत जावे लागत असे. त्यांनी प्राथमिक शिक्षण आपले पूर्ण केले तसेच त्यानंतर वस्तीगृहामध्ये मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. हे शिक्षण त्यांनी कुंडल या गावांमध्ये घेतले.
त्यांच्या गावातील पहिले व्यक्ती मॅट्रिक पास होते. नंतर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्रवेश घेतला आणि कमवा व शिका या योजनेअंतर्गत एकीकडे कष्ट करत होते. तर दुसरीकडे शिक्षण घेत असत अशी दुहेरी कसरत ते करत होते.
1961 मध्ये जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून टीचर्स हा डिप्लोमा त्यांनी घेतला आणि रयत याच हडपसर पुणे येथील साधना विद्यालयात अर्धवेळ शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली व पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी सुद्धा घेतली आहे. नंतर त्यांनी 1980 च्या दशकात शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या या विषयांवर मॅनेजमेंट गुरु डॉक्टर प्र.चि. शेजवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पदवी संपादन केली.
पतंगराव कदम यांचे शैक्षणिक कार्य :
डॉक्टर पतंगराव कदम यांनी एकीकडे शिक्षण घेतले तर दुसरीकडे स्पष्ट केले अशा परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व खूप होते. हे आपल्याला समजते असे असताना त्यांनी 1964 मध्ये पुण्यातल्या सदाशिव पेटीतील एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली.
त्यांनी 1968 मध्ये एरंडवणे पुणे येथे शंकरराव मोरे विद्यालयाची स्थापना सुद्धा केली. एरंडवणे पुणे येथे यशवंतराव मोहिते महाविद्यालय लॉ कॉलेज व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची सुद्धा स्थापना केली. त्यांनी भारती विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण देण्यासाठी या कॉलेजची स्थापना केली होती.
1983 मध्ये डॉक्टर वसंतराव दादा पाटील यांच्या प्रेरणेने त्यांनी धनकवडी पुणे येथे इंजीनियरिंग कॉलेजची स्थापना केली.
आपले विद्यापीठ स्थापन व्हावे ही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. काही काळानंतर अभिमात विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षात सुद्धा आणली. भारती विद्यापीठ यूनिवर्सिटीचे नुकतेच संस्थापक नसून कुलगुरू सुद्धा ते होते.
स्थापनेनंतरच्या 53 वर्षात संस्थेची प्राथमिक ते पदवी तर तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांमध्ये अभ्यासक्रम शिकविणारे 180 शाळा कॉलेजेस आहेत. त्यात दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून 20,000 कर्मचारी नोकरीला होते.
त्यामध्ये नवी दिल्ली आणि दुबई मध्ये त्यांनी अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान या विषयांची महाविद्यालय स्थापन केले आहेत. भारती विद्यापीठ ही भारतातल्या नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे तर इतर देशाच्या विविध भागात शिक्षणाचे मोठे साम्राज्य निर्माण केले आहे.
त्यांना कोणत्याही प्रकारचा सहारा नव्हता किंवा घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आधार नव्हता तरीसुद्धा त्यांनी राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपले अनेक वर्ष आपली एक छाप सोडली.
डॉ. पतंगराव कदम राजकीय वाटचाल :
डॉक्टर पतंगराव कदम हे एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेब यांची जन्मभूमी असलेल्या भिलवाडी येथून वांगी मतदारसंघातून 1985 साली आमदार म्हणून त्यांची निवड झाली. 1990 साली भिलवडी वांगी मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली होती.
तर 1990 मध्ये प्रथम राज्याचे शिक्षण मंत्री पतंगराव कदम बनले. 1992 साली शिक्षण व पाटबंधारे खात्याचे मंत्री झाले. नंतर पुढे सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे पतंगराव हे एक अविभाज्य घटक होते.
1999 ते 2004 या काळामध्ये त्यांनी उद्योग वाणिज्य संसदीय कामकाज मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. 2004 च्या नोव्हेंबर मध्ये ते सहकार मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री बनले. मार्च 2009 मध्ये अशोक चव्हाण मंत्री मंडळात ते वनमंत्री झाले तर 19 नोव्हेंबर 2010 रोजी त्यांच्याकडे वन मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार सोपवण्यात आला.
सांगलीतील वांगी भिलवाडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत गेले. डॉक्टर पतंगराव कदम महाराष्ट्रातील विधानसभेवर चार वेळा निवडून आले. दिल्लीतील वरिष्ठांशी ही त्यांचे अत्यंत कनिष्ठ संबंध होते.
लोकप्रिय नेता :
डॉक्टर पतंगराव कदम यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांच्या दिलदारपणामुळे तसेच स्पष्ट वक्ते म्हणून खूप प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे एखादा व्यक्ती गेला तर त्याला मदत करताना अजिबात मागेपुढे कोणताही विचार करत नव्हते तसेच रोखठोकपणामुळे काही वेळा ते अडचणीत सुद्धा आले परंतु त्यांच्याकडे जनतेने लोकप्रिय नेता म्हणून पाहिले. त्यांनी पुनर्वसन मदत खाते अंतर्गत सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठी मदत केलेली होती. भावसार योजनेचे वीज बिल मदत व पुनर्वसन विभागाच्या योजनांतून त्यांनी मदत केली.
डॉ. पतंगराव कदम यांना मिळालेले पुरस्कार :
डॉ. पतंगराव कदम यांना त्यांच्या सेवेसाठी संघटनांनी अनेक पुरस्कार दिले आहे. त्यामध्ये लोक श्री इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स हा पुरस्कार. नवी दिल्ली यांनी दिलेला आहे. सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल मानवता सेवा अवार्ड त्यांना मिळालेला आहे.
मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कामगिरीबद्दल प्रधान केलेला आहे. मराठा विश्व भूषण पुरस्कार. आय एम एम नवी दिल्ली तर्फे देण्यात येणारा एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन शहाजीराव पुरस्कार. कोल्हापुरातील उद्योग भूषण पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
पतंगराव कदम यांचे निधन :
पतंगराव कदम हे एक ज्येष्ठ काँग्रेसचे नेते तसेच भारती विद्यापीठाचे संस्थापक होते. परंतु त्यांच्या वयानुसार दीर्घ आजाराने वयाच्या 73 व्या वर्षी मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना, रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. पतंगराव कदम यांचे निधन 9 मार्च 2018 रोजी झाले.
FAQ
पतंगराव कदम यांनी कोणती कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली?
भारती विद्यापीठ.
डॉक्टर पतंगराव कदम हे कोणत्या पक्षाचे नेते होते?
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.
पतंगराव कदम यांचा मृत्यू कधी झाला ?
9 मार्च 2018 रोजी.
डॉ. पतंगराव कदम यांचा जन्म कोठे झाला?
डॉक्टर पतंगराव कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला.
डॉक्टर कदम महाराष्ट्र विधानसभेवर किती वेळा निवडून आले?
चार वेळा.