श्री शंकर महाराज यांची संपूर्ण माहिती Shri Shankar Maharaj Information In Marathi

Shri Shankar Maharaj Information In Marathi भारत देश हा तसा संत महात्म्यांचा प्रदेश. या देशात अनेक अवलिया साधुसंत होऊन गेले, त्यापैकीच एक म्हणजे  श्री शंकर महाराज होय. या शंकर महाराजांचा इतिहास फार काही जुना नाही, अगदी अलीकडील काळामध्ये त्यांनी आपल्या अनेक चमत्कारांनी भक्तगणांना कोड्यात टाकले.

श्री शंकर महाराज यांची संपूर्ण माहिती Shri Shankar Maharaj Information In Marathi

मित्रांनो, श्री शंकर महाराज यांची समाधी पुण्याच्या धनकवडी येथे असून हे ठिकाण सातारा रस्त्यावर आहे. श्री शंकर महाराजांनी वैशाख महिन्याच्या शुद्ध अष्टमीला शके १८६९ म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार २४ एप्रिल १९४७ या सोमवारच्या दिवशी समाधी घेतल्याची नोंद आढळून येते. परंतु त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल फार काही नोंदी आढळून येत नाहीत. आजच्या भागामध्ये आपण याच अवलिया संताबद्दल म्हणजेच श्री शंकर महाराज यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत…

नाव: श्री शंकर महाराज
जन्मदिनांक: साधारणपणे १८०० च्या आसपास (जन्माबद्दल तारीख उपलब्ध नाही)
जन्मस्थळ: मंगळवेढा, पंढरपूर
आयुष्य काळ/ कार्यकाळ: इसवीसन १८०० ते १९४७
गुरू: श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट
धार्मिक दीक्षा: श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट
समाधीस्थळ: धनकवडी, सातारा रोड, पुणे

मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोकांनी श्री शंकर महाराज यांच्यावरील दूरदर्शन मालिका नक्कीच पाहिली असेल, त्यातील एक वाक्य तुम्हाला आठवत असेल ते म्हणजे “आम्ही कैलासहून आलो, नाव ही शंकर”

मित्रांनो, श्री शंकर महाराज यांच्या बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. सध्याच्या नाशिक जिल्ह्यामधील अंतापुर या गावांमध्ये कोणीतरी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत असत. त्यांना इतके दिवस संसार करून देखील मूलबाळ होत नव्हते. हे चिमणाजी नावाचे गृहस्थ भगवान शिव शंकराचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे ते नेहमी भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये तल्लीन राहत असत.

एके दिवशी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत मिळाला, त्या दृष्टांतात त्यांना जंगलामध्ये जा, तेथे तुला एक बाळ सापडेल, त्याला घेऊन ये तेच तुझे मुल असेल असे सांगण्यात आले. सकाळी उठल्यानंतर त्यांनी हा दृष्टांत आपल्या पत्नीला सांगितला, आणि त्याप्रमाणे ते जंगलामध्ये गेले. अगदी सांगितल्याबरहुकूम त्यांना जंगलामध्ये दोन वर्षाचे एक मूल सापडले, भगवान शंकर यांचाच प्रसाद म्हणून चिमणाजी रावांनी त्या मुलाचे नाव शंकर असे ठेवले.

मोठे होईपर्यंत हे मूल अर्थात शंकर महाराज चिमणाजीराव व त्यांची पत्नी या दांपत्याजवळ राहिले, मात्र त्यानंतर उलटच घडले, या बाळाने म्हणजेच शंकर महाराजांनी उलट आपल्या मातापित्यांनाच आशीर्वाद दिला की, तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. आशीर्वाद देऊन शंकर महाराजांनी आपल्या माता पित्याचे घर सोडले. त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. हा श्री शंकर महाराजांचा पहिला दृष्टांत.

श्री शंकर महाराज हे सर्व अर्थाने वेगळे होते, त्यांचे हात हे अजानुबाहू होते, तसेच त्यांचे डोळे देखील वाजवीपेक्षा मोठे होते, ते एका ठिकणी कधीच थांबत नसत, नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भ्रमंती सुरूच असे. त्यांची बसताना गुडघे वर करण्याची पद्धत देखील निराळीच, ते सर्वांगाने वेगळेच होते, जणू ते भगवान शिवाचे वैरागी अवतार असावेत.

मित्रांनो, श्री शंकर महाराजांविषयी फार माहिती सापडत नाही, कारण ते नेहमी आपले नाव, ठिकाण, आणि रूप बदलत असत. कधी त्रिवेणी संगमावर दिसणारे शंकर महाराज अक्कलकोटला पोहोचतील तर सोलापूर वरून त्रंबकेश्वरला दर्शन देतील हे कधीच सांगता येत नसे. तसेच ते कुठलेच एक स्पष्ट नाव धारण करत नसत, आणि रूप तर नेहमीच बदलत असत. म्हणून त्यांना वैराग्यमूर्ती म्हणून ओळखले जाते.

श्री शंकर महाराज हे खरे योगी होते, त्यांनी अनेक लीला करून दाखवल्या. मात्र त्यांचे नेहमी एक सांगणे असे ते म्हणजे कोणीही सिद्धीच्या मागे लागू नका. त्यांच्या मते अनेक लोक सिद्धीची उपासना ही केवळ प्रसिद्धीसाठीच करतात, त्यामागे त्यांचा स्वार्थ दडलेला असतो.

मात्र शंकर महाराजांना सर्व सिद्धी अवगत असून देखील त्यांनी या सिद्धींचा कधीही दुरुपयोग केला नाही, की या सिद्धींच्या वापराने मोठा डामडौल मिरवला नाही. मात्र त्यांनी सिद्धीच्या आधारे केलेल्या अनेक चमत्कारांचा अनुभव अनेक दिग्गज लोकांनी सुद्धा घेतला आहे. श्री शंकर महाराजांच्या शिष्यामध्ये न्यायरत्न विनोद, श्री आचार्य अत्रे यांसारखी प्रसिद्ध लोक सुद्धा होते, ते काही उगीच नाही.

मित्रांनो, श्री शंकर महाराज खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष स्वभावाचे होते. त्यांच्या भक्तगणांमध्ये जसे हिंदू असत, तसेच मुस्लिम ख्रिस्ती देखील असत. ते नेहमी म्हणत मला जाती धर्म काहीही नको, माझी कुठलीच जाती नाही की कुठलाच धर्म नाही. ते सर्वांशीच सलोख्याने वागत. एका मुस्लिमाने त्यांच्याकडे आपली समस्या मांडली, शंकर महाराजांनी त्याला सल्ला दिला की तुम्ही नमाज का पडत नाही?, तुम्ही नमाज पडायला हवी. यावरून त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचा प्रत्यय येतो.

श्री शंकर महाराजांबद्दल न सुटलेलं आणखी एक कोड म्हणजे ते अति हुशारी करणाऱ्या लोकांना अगदी अस्खलित इंग्रजी मध्ये उत्तरे देत. त्यांनी इंग्रजीचे शिक्षण कोठे घेतले किंवा त्यांना इंग्रजी भाषा कशी अवगत झाली हे अजून कोडेच आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज कुठल्याही संत महात्म्याचा चमत्कार सांगायला गेलं की, लोकांना अंधश्रद्धाच वाटते. मात्र पूर्वीच्या काळात अनेक साधुसंतांनी विविध चमत्कार करून दाखवले. पूर्वीचे संत महात्मे हे लोकांचे कल्याण करण्यासाठी सल्ला आणि उपचार सांगत, आणि त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा करत नसत.

ते खरे संत होते. आज कालच्या काळामध्ये भोंदू बाबांचा सुळसुळाट फार वाढलेला आहे, समोरील व्यक्तीस कुठल्या ना कुठल्या कारणाने घाबरवून देऊन पैसा उकळणे हा त्यांचा एक मात्र धंदा बनलेला आहे. अशा भोंदू बाबांपासून बाजूला राहून आपण आपले संरक्षण केले पाहिजे. आणि त्या बरोबरीनेच आपली धार्मिक श्रद्धा देखील जपली पाहिजे.

FAQ

श्री शंकर महाराज यांचा जन्म दिनांक काय आहे?

श्री शंकर महाराज यांच्या जन्मदिनांक बाबत कुठेही ठाम नोंद आढळत नाही, मात्र अंदाजाने त्यांचा जन्म १८०० च्या आसपास झालेला असावा असे म्हटले जाते.

श्री शंकर महाराज हे कोणाचे शिष्य होते?

मित्रांनो प्रत्येक संत महात्म्याला आपला एक गुरु हा निश्चितच असतो, त्यानुसारच श्री शंकर महाराज यांनी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांना आपले गुरु मानले होते.

श्री शंकर महाराज यांनी समाधी कोठे व केव्हा घेतली?

श्री शंकर महाराज यांनी २४ एप्रिल १९४७ या दिवशी पुण्यामधील सातारा रोड येथे असणाऱ्या धनकवडी या ठिकाणी समाधी घेतली.

श्री शंकर महाराज यांच्या तोंडी कोणते वाक्य नेहमीच राहत असे?

श्री शंकर महाराजांच्या तोंडात नेहमी आम्ही कैलासातून आलो आहोत आमचे नावही शंकर हे वाक्य नेहमी राहत असे.

श्री शंकर महाराजांचे अन्य नावे काय आहेत?

शंकर महाराज यांना सुप्या, कुवरस्वामी, गौरीशंकर इत्यादी अन्य नावांनी ओळखले जात असे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण श्री शंकर महाराज या संताबद्दल माहिती पाहिली जी तुम्हाला नक्कीच नवीन वाटली असेल. त्यामुळे ही माहिती तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि मित्र-मैत्रिणींसोबतच मिळून आम्हाला या माहिती विषयीची तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये भरभरून लिहून कळवा.

धन्यवाद…

Leave a Comment