साजन प्रकाश यांची संपूर्ण माहिती Sajan Prakash Information In Marathi

Sajan Prakash Information In Marathi जलतरण हा एक मनोरंजनाचा प्रकार असला तरी देखील आजकाल याला खेळाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आणि या खेळाच्या माध्यमातून अनेकांनी फार मोठी कामगिरी करत इतिहास रचलेला आहे. याच जलतरण खेळामध्ये चांगली कामगिरी करता नावलौकिक मिळवणाऱ्या खेळाडूबद्दल अर्थात साजन प्रकाश याच्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहे.

Sajan Prakash Information In Marathi साजन प्रकाश यांची संपूर्ण माहिती Sajan Prakash Information In Marathi

साजन प्रकाश यांची संपूर्ण माहिती Sajan Prakash Information In Marathi

भारतीय जलतरणपटू असणारा हा साजन प्रकाश पुरुषांच्या गटामधून बटरफ्लाय आणि फ्रीस्टाइल सह रिले इव्हेंट मध्ये गेले काही वर्ष उत्कृष्ट कामगिरी करून प्रसिद्ध झालेला आहे. त्याने एकूण सहा सुवर्ण, तीन रौप्य पदके, जिंकून भारतीय जलतरण इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात स्वतःचे नाव कोरलेले असून ८ फेब्रुवारी २०१५ रोजी त्याचा हा विक्रम देखील नोंदवला गेलेला आहे.

त्याने अनेक जलतरण स्पर्धांमध्ये मोठे यश संपादन करत भारताचे नाव देखील जागतिक पातळीवर मोठे केलेली आहे. केरळमध्ये जन्मलेला हा साजन प्रकाश अतिशय उत्तम प्रकारचा ॲथलेटिक खेळाडू असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत भारताची मान गर्वाने उंच केलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण या साजन प्रकाश बद्दल माहिती बघूया.

नावसाजन प्रकाश
ओळखजलतरणपटू
जन्म दिनांक१४ सप्टेंबर १९९३
जन्मस्थळथोडूपूझा, इडुक्की, केरळ
आईचे नावव्ही जे सत्यमोल
वय३१ वर्षे

साजन प्रकाश यांचे प्रारंभिक आयुष्य:

१४ सप्टेंबर १९९३ या दिवशी केरळमध्ये जन्मलेले साजन प्रकाश लहानपणापासूनच ॲथलेटिक खेळाशी संबंधित होते कारण त्यांच्या आई या ॲथलेटिक खेळाडू असून त्यांनी देखील भारताच्या संघाचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केले होते, त्यामुळे आपल्या आईकडून त्यांना ॲथलेटिक क्षेत्रामध्ये उतरण्याची प्रेरणा मिळाली होती.

लहानपणापासूनच त्यांना जलतरण क्षेत्राची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे ठरविले. त्यांनी अनेक ठिकाणी प्रशिक्षण घेतले असून नवीन लिग्नाइट सिटी स्विमिंग क्लब हे त्यांच्या स्विमिंग क्षेत्राला कलाटणी देणारे प्रशिक्षण केंद्र होते. त्यांनी २०१५ या वर्षी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये भाग घेतला. पुरुषांच्या बटरफ्लाय फ्री स्टाईल इव्हेंट मध्ये भाग घेत एक विक्रम नोंदवला होता.

त्यांनी सहा सुवर्णपदके व तीन रौप्य पदके जिंकून एक ऐतिहासिक कामगिरी केली होती, त्यामुळे भारतीय जलतरण क्षेत्रामधील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांचे नाव निवडले गेले. त्याचबरोबर त्यांनी २०१६ या वर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये भारत देशाच्या वतीने बटरफ्लाय प्रकारातील २०० मीटर स्पर्धेमध्ये भाग देखील घेतलेला होता.

साजन प्रकाश यांचे वैयक्तिक आयुष्य:

केरळमध्ये जन्मलेल्या साजन प्रकाश यांच्या आई एक माजी ॲथलेटिक खेळाडू होत्या हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन या साजन प्रकाश यांनी जलतरण क्षेत्रामध्ये आपले करिअर केले. त्यांच्या आई खेळातून निवृत्त झाल्यानंतर नव्याने लिग्नाइट या कंपनीमध्ये कार्य करत असत त्यामुळे त्यांना या ठिकाणी स्थलांतरित होणे भाग पडले.

या ठिकाणी त्यांना त्यांच्या आईकडून बॅडमिंटन, रनिंग यांसारख्या अनेक खेळांचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते, मात्र साजन प्रकाश यांची जलतरण क्षेत्रातील आवड ओळखून त्यांनी त्यांना नवीन सिटी स्विमिंग क्लब मध्ये दाखल केले. येथे त्यांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले, त्यामुळे स्विमिंग क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठी मजल मारली. येथे त्यांना जॉईन जोसेफ आणि साजी सेवेस्टियन यांसारखे दोन उत्तम प्रशिक्षक लाभले होते ज्यांच्या मार्फत त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली होती.

साजन प्रकाश यांचे प्रोफेशनल आयुष्य:

पोहण्याची प्रचंड आवड साजन प्रकाश यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नवीन क्लब मध्ये त्यांना मोठ्या पाण्यामध्ये पोहण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळे त्यांनी बसवानगुडी एक्वाटिक सेंटर येथे आपले नाव नोंदविले. त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याचबरोबर केरळमध्ये झालेली स्पर्धा जिंकत त्यांनी अनेक पदकांचा मानकरी होण्याचा मान पटकावला, ज्यामुळे ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले.

या यशाने हुरळून न जाता त्यांनी अधिक क्षमता वाढवून पोहण्याच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचे ठरविले. २०१६ या वर्षी रिओ ऑलिम्पिक मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळवता आले नसले तरी देखील भारत हा देश देखील जलतरण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असून जलतरण क्षेत्रामध्ये भारतही मोठी कामगिरी करू शकतो हे संपूर्ण जगाने बघितले.

साजन प्रकाश यांना मिळालेले यश:

साजन प्रकाश यांनी २०१५ च्या ३५ व्या भारतीय राष्ट्रीय खेळामध्ये सुमारे आठ पदके जिंकलेली आहेत ज्यामधील सहा पदके ही सुवर्ण तर दोन पदके ही रौप्य पदके आहेत. यातील सुवर्णपदक हे त्यांना १०० व २०० मीटर बटरफ्लाय, ४००, ८०० व १५०० मीटर फ्रीस्टाइल आणि ४१०० मीटर रिले फ्रीस्टाइल या प्रकारांकरिता मिळाले होते, तर रौप्य पदक हे २०० मीटर फ्रीस्टाइल आणि ४१०० मीटर रिले या स्पर्धांकरता देण्यात आले होते.

निष्कर्ष:

आपल्यासमोर अनेक क्षेत्र उपलब्ध असतात मात्र आपण पठडीतील जीवन जगत असताना वेगळ्या करिअरच्या क्षेत्राकडे लक्ष देखील देत नाहीत, मात्र काही लोक या क्षेत्रांकडे लक्ष देऊन त्यामध्ये चांगले करिअर घडवत असतात आणि प्रसिद्ध देखील होतात. खेळ हा जीवनामधील अतिशय महत्त्वाचा घटक असून खेळामुळे माणसाला मनोरंजन देखील मिळत असते, मात्र या खेळालाच जर करिअरचे क्षेत्र बनवले तर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद निर्माण होत असतो.

जलतरण मुळे एक आनंद निर्माण होण्याबरोबर शरीराचा व्यायाम देखील होत असतो. अनेकांनी या क्षेत्राला करिअर चे क्षेत्र बनवून मोठी मजल मारलेली आहे त्यामुळे आजकाल या लोकांची प्रसिद्धी गगनाला भिडलेली आहे. आजच्या आपण अशाच एका जलतरणपटूबदल अर्थात साजन प्रकाश यांच्या बद्दल माहिती बघितलेली आहे. केरळमधील साजन प्रकाश यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध जलतरण स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारताचे नाव मोठे केलेले आहे.

आजच्या या भागात आपण त्यांच्या प्रारंभिक जीवनासह वैयक्तिक जीवनाची देखील माहिती घेतलेली आहे, सोबतच त्यांचे शैक्षणिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य याबद्दल देखील जाणून घेतलेले आहे. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळवलेले यश आणि त्यांना मिळालेले काही पुरस्कार याबाबत देखील माहिती घेतलेली असून त्यांच्या जीवन चरित्रावर संक्षिप्त प्रकाश टाकलेला आहे. या माहितीमुळे तुम्हाला देखील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल अशी अशा व्यक्त करतो.

FAQ

साजन प्रकाश यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?

साजन प्रकाश यांचा जन्म दिनांक १४ सप्टेंबर १९९३ या दिवशी झाला होता जे आज मीतिला ३१ वर्ष वयाचे आहेत.

साजन प्रकाश हे कोणत्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आहेत?

साजन प्रकाश हे जलतरण क्षेत्रातील दिग्गज खेळाडू असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

साजन प्रकाश यांनी आपल्या जलतरण क्षेत्रातील प्रशिक्षण कोणत्या संस्थेमधून सुरू केले होते?

साजन प्रकाश यांनी आपल्या जलतरण क्षेत्रातील प्रशिक्षण नवेली लिग्नाइट सिटी स्विमिंग क्लब नवेली या संस्थेमधून सुरू केले होते.

साजन प्रकाश यांच्या आई बद्दल काय सांगता येईल?

साजन प्रकाश यांची आई देखील एक ॲथलेटिक खेळाडू असून त्यांनी देखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

साजन प्रकाश यांच्या नावावर जलतरण क्षेत्रामध्ये कोणता विक्रम नोंदवण्यात आलेला आहे?

साजरा प्रकाश यांनी अतिशय ऐतिहासिक कामगिरी करत २०० मीटरचे अंतर बटरफ्लाय पद्धतीने अवघ्या दहा मिलि सेकंदामध्ये पार केले होते.

Leave a Comment