Yesaji Kank Information In Marathi छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले होते. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, सगळ्या प्रजेचे राज्य. यामुळे संपूर्ण प्रजादेखील या कार्यामध्ये सहभागी झालेली होती. प्रत्येकाने आपल्या जीवाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थात संपूर्ण प्रजेच्या स्वराज्यासाठी आपले जीवन वाहिले होते. आणि यातीलच एक नाव म्हणजे येसाजी कंक होय.
येसाजी कंक यांची संपूर्ण माहिती Yesaji Kank Information In Marathi
छत्रपती शिवाजी महाराज व येसाजी कंक हे बालपणापासूनच एकमेकांचे चांगले मित्र होते. स्वतः येसाजी कंक यांचे वडील श्रीयुत दादोजी कंक शहाजी महाराजांसोबत लढत होते. त्यामुळे त्यांच्या संबंध फार पूर्वीपासूनच होता. स्वराज्याला शाबूत ठेवण्यामध्ये यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली असून, ते वारसाने या कार्यात सहभागी होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा कणा म्हणून ओळखले जाई.
आजच्या भागामध्ये आपण येसाजी कंक यांच्या विषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया अंगावर शहारे आणणाऱ्या या ऐतिहासिक माहितीच्या प्रवासाला…
नाव | येसाजी कंक |
संपूर्ण नाव | येसाजी दादोजी कंक |
ओळख | स्वराज्यातील धुरंधर सरदार |
जन्म गाव | भुतोंडे |
पदवी | सरदार सरनोबत |
मुलगा | कृष्णाजी कंक |
हाक | छत्रपती शिवराय यांचा कणा |
सैन्यामध्ये येसाजी कंक यांची भूमिका:
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक प्रकार होते. यातील पायदळ सैनिकांच्या प्रमुख पदी हे येसाजी कंक होते. गनिमी कावा खेळण्यांमध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी अखेरपर्यंत निष्ठा दाखविली. प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या लढाईमध्ये येसाजी कंक यांनी फार मोलाची भूमिका निभावली होती. त्यांच्याविषयी असे सांगितले जाते की, त्यांनी एकदा पिसाळलेला हत्ती आटोक्यात आणून त्याचा पराभव केला होता. तब्बल सात फूट उंची असणारे येसाजी कंक शिवरायांचा कणा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते.
येसाजी कंक यांचा वारसा:
मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये वंशपरंपरेने ज्यांनी सेवा बजावली, ते म्हणजे कंक कुटुंब होय. शहाजीराजे भोसले सरदार असताना त्यांच्यासोबत लढाईची कामगिरी करणारे दादोजी कंक यांचे येसाजी कंक पुत्र होते. हे येसाजी कंक यांनी अगदी लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये आपले योगदान दिलेले होते, ते अगदी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत.
मात्र याच पिढीमध्ये स्वराज्यासाठीचे योगदान थांबले नाही तर त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे देखील स्वराज्य स्थापनेमध्ये मोलाची भूमिका बजावण्यात यशस्वी झालेले आहेत. मात्र त्यांना अकाली निधन आल्यामुळे त्यांच्याविषयी फार माहिती सापडत नाही. फोंडा किल्ल्याच्या लढाईमध्ये कृष्णाजी कंक सहभागी होते, मात्र त्यावेळी त्यांचे निधन झाले. या येसजी कंक यांनी स्वराज्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे.
जसे की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीमध्ये कैद झाले होते, त्यावेळी त्यांना सुखरूप बाहेर काढून रायगडापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे येसाजी कंक यांनी खूप सुंदरपणे पार पाडले होते. याशिवाय कुतुबशाही समोर स्वराज्याचा मान राखावा, याकरिता त्यांनी पिसाळलेल्या हत्तीशी दोन हात केले होते. आणि या हत्तीला हरवून त्यांनी स्वराज्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला होता.
महाराष्ट्रातील त्यांच्या वंशज मध्ये रामभाऊ कंक, भगवानराव कंक, राजेंद्र कंक, शशिकांत कंक, संजय कंक यांचा समावेश होतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा कणा म्हणून येसाजी कंक यांचे कार्य:
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य अगदी रामराज्य आहे असे म्हटले जात असे. आणि त्यांना अनेक धुरंधर आणि उत्कट युद्धे लाभलेले होते. त्यामध्ये येसाजी कंक यांचा देखील समावेश होता. प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी मोक्याच्या प्रसंगी येसाजी कंक यांची निवड होत असे.
जसे की आग्र्यावरील सुटका असो, कुतुबशाही समोरील मान जपणे असो, किंवा प्रतापगड च्या पायथ्याशी झालेले युद्ध असो. महाराजांसाठी सदैव सावलीसारखे तत्पर असणारे सरदार म्हणून येसाजी कंक यांचे नाव घेतले जाते.
मित्रांनो, अगदी स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञापासून महाराजांबरोबर असणाऱ्या येसाजी कंक यांनी प्रत्येक मोहिमेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाराजांना स्वराज्य स्थापनेमध्ये मदत केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक तरुण मुलांना युद्ध कलेमध्ये प्रशिक्षित करून त्यांना बळकट बनवले, जेणेकरून स्वराज्यातील कुठलाही सैनिक कमजोर राहता कामा नये. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे स्वराज्यामध्ये अनेक धुरंदर योद्धे निर्माण झाले. येसाजी कंक ज्या लढाईमध्ये सहभागी असत, त्या लढाया ते जिंकतच असत. कारण येसाजी कंक यांचा गनिमी काव्यामध्ये फार हातखंडा होता.
अगदी बालपणापासून प्रत्येक प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणाऱ्या आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या चरणी विश्वासू राहणाऱ्या कंक यांना महाराजांची सावली किंवा शिवाजी महाराज यांचा कणा म्हणून ओळखले जाते.
निष्कर्ष:
मित्रांनो, मोगल साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य यामध्ये एक मूलभूत फरक होता, तो म्हणजे मोगल लोक स्वतःच्या ऐशारामासाठी राज्य उपभोगत होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अखिल प्रजेचे आणि प्रजेच्या कल्याणासाठी असणारे स्वराज्य निर्माण केले होते.
त्यामुळे मोगल सरदार केवळ पगारासाठी लढत असत, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार स्वतःसाठी लढत असत. यातील एक उल्लेखनीय सरदार म्हणून येसाजी कंक यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिवरायांचा कणा अशी ख्याती असलेले, लढाईमध्ये फारच मातब्बर सरदार होते. आजच्या भागामध्ये आपण या येसाजी कंक यांच्या विषयी माहिती बघितली आहे. त्यामध्ये तुम्हाला विविध गोष्टी वाचायला मिळाल्या असतील.
जसे की येसाजी कंक यांच्या बद्दल प्राथमिक माहिती, त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये भूमिका, त्यांची वारसा परंपरेने शिवरायांवर असलेली निष्ठा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत त्यांचे संबंध, इत्यादी गोष्टींवर माहिती बघितली आहे. याच प्रमाणे त्यांच्याविषयी विविध प्रश्नोत्तरे देखील पाहिलेली आहेत. आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
FAQ
येसाजी कंक यांचे संपूर्ण नाव काय होते?
येसाजी कंक यांचे संपूर्ण नाव येसाजी दादोबा कंक असे होते.
येसाजी कंक यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला होता?
मित्रांनो, येसाजी कंक यांचा जन्म राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका गावामध्ये झाला होता ज्याचे नाव भूतोंडे असे होते.
येसाजी कंक यांच्याद्वारे वापरण्यात येणाऱ्या तलवारीची वजन किती होते?
येसाजी कंक यांच्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या तलवारीचे वजन सुमारे ६२ किलो पर्यंत होते असे सांगितले जाते.
येसाजी कंक स्वराज्य कार्यामध्ये कशा रीतीने सहभागी झाले?
येसाजी कंक यांचे वडील दादोबा कंक आणि शहाजीराजे भोसले एकमेकांसोबत लढाईमध्ये सहभागी होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व येसाजी कंक यांची लहानपणापासूनच मैत्री होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केल्यापासूनच ते त्यांच्यासोबत या स्वराज्या कार्यामध्ये सहभागी होते.
येसाजी कंक यांच्या विषयी अजून काय सांगता येईल?
येसाजी कंक राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या भूतोंडे गावात जन्मले होते. ज्यांचा वंश क्षत्रिय कोळी हा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये प्रमुख सरदार म्हणून त्यांची वर्णी होती, ज्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत शिवरायांचरणी निष्ठा दाखविली.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेल्या येसाजी कंक यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असणारच आहे, मात्र त्यासंदर्भातल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि लागोपाठ तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील हा लेख शेअर करू शकता.
धन्यवाद….