Dr. Vasant Govarikar Information In Marathi आज मितीला भारताने अंतराळ क्षेत्रात अतिशय प्रगती केलेली आहे, मात्र सुरुवातीच्या काळात भारतासाठी या गोष्टी काही सोप्या नव्हत्या. सर्वात पहिला उपग्रह भारताने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली सोडला होता, त्यानंतर मात्र भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आणि कधीही मागे वळून पाहिले नाही. भारताच्या या अंतराळा प्रवासात भारताला वसंत गोवारीकर नावाचे एक धुरंधर शास्त्रज्ञ देखील लाभले होते. आजच्या भागामध्ये आपण वसंत गोवारीकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

डॉ. वसंत गोवारीकर यांची संपूर्ण माहिती Dr. Vasant Govarikar Information In Marathi
संपूर्ण नाव | वसंत रणछोड गोवारीकर |
जन्म दिनांक | २५ मार्च १९३३ |
जन्म ठिकाण | पुणे |
पत्नी | सुधा वसंत गोवारीकर |
अपत्यांची नावे | इरावती गोवारीकर, अश्विनी गोवारीकर आणि कल्याणी गोवारीकर |
व्यवसाय | भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ |
भूषविलेली पदे | भारतीय अंतराळ संस्थेचे संचालक भारतीय पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार |
योगदान दिलेले क्षेत्र | अंतराळ संशोधन, लोकसंख्या शास्त्र, हवामान शास्त्र इत्यादी |
मृत्यू | २ जानेवारी २०१५ रोजी, वयाच्या ८१ व्या वर्षी, पुणे येथे |
वसंत गोवारीकर यांचे संपूर्ण नाव वसंत रणछोड गोवारीकर असे होते. २५ मार्च १९३३ रोजी पुणे येथे जन्मलेले गोवारीकर लहानपणापासूनच फार हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये खूप मोलाचे योगदान दिलेले आहे.
वसंत गोवारीकर यांनी अनेक पदे भूषवलेली आहेत, त्यातील महत्त्वाचे दोन पद म्हणजे त्यांनी काही काळ भारतीय पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून, तर बराचसा कालावधी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्य संचालक म्हणून पदभार भूषवलेला आहे. तसेच त्यांनी हवामान संशोधन आणि लोकसंख्या शास्त्र या दोन विषयांमध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे.
सुरुवातीचे जीवन:
वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी पुण्यातील एका साध्या कुटुंबात झाला. लहानपणापासून हुशार असलेल्या गोवारीकरांनी भारतामध्येच आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंग्लंड स्थित बर्मिंगहॅम विद्यापीठातून आपली केमिकल इंजिनिअरिंग मधील पदव्युत्तर पदवी घेतली.
तसेच त्याच क्षेत्रात आपली पी. एच. डी. देखील पूर्ण केली. त्यांच्या पी. एच. डी दरम्यान त्यांना गुरु म्हणून डॉक्टर एच एफ गार्नर मिळाले होते. या दोन असाधरण बुद्धीच्या व्यक्ती एकत्र आल्यामुळे त्यांनी गार्नर गोवारीकर सिद्धांत, तसेच द्रव पदार्थ व घनपदार्थ यांच्यातील वस्तुमान व उष्णता यांच्या परस्पर हस्तांतरणाचे एक उत्कृष्ट विश्लेषण मांडले.
त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्येच साधारणपणे १९५९ ते १९६७ या आठ वर्षांच्या कालावधीत ब्रिटिश अणुऊर्जा संशोधन प्रतिष्ठान, हर्बेल आणि समर्पिल्ड रॉकेट मोटर उत्पादन कंपनी या दोन ठिकाणी काम करण्याचा अनुभव देखील घेतला. याच प्रकारे त्यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या दोन विद्यापीठांच्या परीक्षा महामंडळाच्या परीक्षक पॅनलवर सुद्धा काम केले. तेथे त्यांनी वैज्ञानिक पुस्तकांच्या निर्मितीमध्ये संपादक म्हणून मोलाचे कार्य केले.
भारतामध्ये परत आल्यानंतर इसवी सन १९६७ मध्ये त्यांनी डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या खास विनंतीच्या नुसार भारतीय अंतराळ संशोधन केंद्र थुंबा, तिरुअनंतपुरम येथे प्रोपेलेंट अभियंता म्हणून कामकाज हाती घेतले. पुढे जाऊन इसवी सन १९७२ मध्ये सर्व केंद्र एकत्र मिळून विक्रम साराभाई स्पेस सेंटर बनले.
डॉ. वसंत गोवारीकर यांचे करियर:
डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केमिकल व मटेरियल ग्रुपच्या संचालक पदाचा कार्यभार इसवी सन १९७३ मध्ये स्वीकारला. त्यांनी या पदावर इसवी सन १९८५ पर्यंत कार्य केले, त्यानंतर त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत प्रवेश केला. त्यांच्या येथील कार्यकाळा दरम्यान भारताने आपले पहिले प्रक्षेपण वाहन एस एल व्ही ३ बनवले, ज्याला प्रचंड मोठे यश मिळाले.
त्यामुळे गोवारीकरांना भारतीय प्रक्षेपण वाहनांसाठी घन इंधन तंत्रज्ञान बनवण्याचे कार्य प्रदान करण्यात आले. आणि याबाबतीत त्यांना संपूर्ण अधिकार देण्यात आले. त्यांच्याच या कार्यकाळात इस्त्रोने सॉलिड स्पेस बूस्टर प्लांट बांधला जो तब्बल साडेपाच हजार एकर जमिनीवर होता.
पुढे १९८६ पासून १९९१ पर्यंत त्यांनी भारतीय सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांमध्ये सचिव या पदावर कार्य केले. यानंतर भारतीय पंतप्रधान यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी इसवी सन १९९३ पर्यंत आपला कार्यकाळ सांभाळला.
गोवारीकरांच्या आयुष्यातील सर्वात मोठे संशोधन म्हणजे स्वदेशी हवामान अंदाज मॉडेल होय. त्यांनी १९९४ ते २००० या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि सोबतच मराठी विद्या परिषद अध्यक्ष अशी दुहेरी पदे भूषविली.
गोवारीकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने फर्टिलायझर एनसायक्लोपीडियाचे २००८ साली संकलन केले, ज्या अंतर्गत सर्व लोकांना समजतील अश्या सोप्या भाषेत त्यांनी रासायनिक खतांच्या संरचना, उत्पादन, आणि वापर यांच्या तब्बल ४५०० नोंदी केल्या. त्यामुळे रासायनिक खत क्षेत्रात एक महत्वाची क्रांती घडली.
गोवारीकर यांना मिळालेले विविध पुरस्कार:
विविध पुरस्कार हे व्यक्तिमत्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत असतात, या पुरस्कारांनी त्यांचे कार्य जगासमोर येण्यास मदत होते. डॉ गोवारीकर यांना पुढील पुरस्कार मिळालेले आहेत.
१. १९८४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
२. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार
३.एस्रोनोटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या आर्यभट्ट पुरस्काराने सन्मानित.
निष्कर्ष:
भारत हा प्रगतिशील देश आहे, आणि भारताच्या या प्रगतीच्या वाटेवर अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी आपले योगदान दिलेले आहे. त्यामध्ये अनेक व्यावसायिक लोकांचा समावेश असला तरी देखील वसंत गोवारीकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे प्रयत्न देखील खूप मोलाचे ठरतात.
आज आपण वसंत रणछोड गोवारीकर या भारताच्या महान शास्त्रज्ञा बद्दल माहिती पाहिली. कुठलाही देश सर्व क्षेत्रात पुढे न्यायचा असेल तर त्या देशातील शास्त्रज्ञांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, वसंत गोवारीकर यांनी अंतराळ क्षेत्रात तर आपले योगदान दिलेच, मात्र पावसाचा अचूक वेध घेणारे मॉडेल विकसित करून भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य या महान शास्त्रज्ञाने केले. अशा या महान शास्त्रज्ञाच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण अभिवादन.
FAQ
वसंत गोवारीकर हे कोण होते?
वसंत गोवारीकर हे एक भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ होते.
वसंत गोवारीकर हे सध्या हयात आहेत का?
दुर्दैवाने वसंत गोवारीकर हे सध्या आपल्यात नाहीत. इसवी सन २०१५ मध्ये त्यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी वसंत गोवारीकर यांचे वय किती होते?
मृत्यू समयी वसंत गोवारीकर यांचे वय ८१ इतके होते.
वसंत गोवारीकर यांच्या पत्नीचे नाव काय होते?
वसंत गोवारीकर यांच्या पत्नीचे नाव सुधा गोवारीकर असे होते.
वसंत गोवारीकर यांचे कोणते संशोधन खूप प्रसिद्ध ठरले होते?
वसंत गोवारीकर यांचे हवामानाचा अंदाज अचूक घेऊन पावसाचा अचूक वेध घेणारे स्वदेशी निर्मितीचे हवामान वेध यंत्र फार प्रसिद्ध ठरले होते.
आजच्या भागामध्ये आपण वसंत गोवारीकर या भारतीय शास्त्रज्ञ बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. या शास्त्रज्ञा बद्दल तुम्हाला अजूनही काही माहिती असेल तर ती माहिती कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आमच्या सोबत सामायिक करायला विसरू नका. योग्य माहितीला नक्कीच प्रकाशित केले जाईल. तसेच ही माहिती आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.
धन्यवाद…