Adam Smith Information In Marathi तत्त्वज्ञान हे आजकालच्या जगामध्ये फार महत्त्वाची गोष्ट म्हणून उदयास आलेले आहे. तत्त्वज्ञानाच्या आधारावर अनेक लोकांनी फार मोठी मजल मारलेली असून या तत्त्वज्ञानाच्या जोरावरच अनेक लोक वक्ते देखील झालेले आहेत. त्या तत्त्वज्ञानाला खरी ओळख मिळवून देणारे व्यक्ती म्हणून ॲडम स्मिथ यांना ओळखले जाते.
ॲडम स्मिथ यांची संपूर्ण माहिती Adam Smith Information In Marathi
स्कॉटलंड या देशामधील किरककॅल्डी या छोट्याश्या गावामध्ये दिनांक १५ जून १७२३ रोजी जन्मलेले ॲडम स्मिथ अतिशय उच्चशिक्षित होते. त्यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच ग्लासगो विद्यापीठामध्ये शिष्यवृत्तीच्या जीवावर प्रवेश मिळवला होता आणि पुढील शिक्षणाकरता ऑक्सफर्ड कॉलेजची देखील निवड केली होती.
त्यांनी इंग्रजी तसेच युरोपियन साहित्य इत्यादी विषयांमध्ये पदवी मिळवलेली असून एक असामान्य बुद्धिमत्तेचे व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी तर्कशास्त्र, नैतिक तत्त्वज्ञान यांच्यासारखे विषय देखील अभ्यासले होते. त्यांनी अनेक देशांचा प्रवास केलेला असून त्यामध्ये स्वित्झर्लंड,फ्रान्स या देशांचा समावेश होतो.
येथे त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या भेटी घेऊन आपल्या ज्ञानामध्ये प्रचंड वाढ केली होती. त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणून “द वेल्थ ऑफ नेशन” आज देखील जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या या पुस्तकामध्ये अनेक अर्थशास्त्राचे सिद्धांत दिलेले असून १७७६ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक आज देखील एक बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.
या पुस्तकातच त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या देखील स्पष्ट केलेली आहे. अशा या स्मित नावाच्या अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी व्यक्तीबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत.
नाव | ॲडम स्मिथ |
जन्म दिनांक | १५ जून १७२३ |
जन्म स्थळ | किरकॅलिडी स्कॉटलंड |
आई | मार्गरीटा |
ओळख | तत्त्वज्ञ व अर्थशास्त्रज्ञ |
प्रसिद्ध कलाकृती | वेल्थ ऑफ नेशन आणि मुक्त बाजार प्रणाली सिद्धांत |
मृत्यु दिनांक | १७ जुलै १७९० |
ऍडम स्मिथ यांचे प्रारंभिक आयुष्य:
स्कॉटलांड देशाच्या एका गरीब कुटुंबामध्ये ॲडम स्मिथ यांचा जन्म झाला होता. काही लोकांच्या मते त्यांचा जन्म १५ जून १७२३ तर काही लोकांच्या मते त्यांचा जन्म १६ जून या दिवशी झाला होता. ॲडम स्मिथ यांना लहानपणापासूनच अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. ते अगदी तीन महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे स्मिथ लहानपणीच पोरके झाले होते. त्यांचे वडील एका कस्टम अधिकारी होते.
ॲडम स्मिथ यांचे शैक्षणिक आयुष्य:
लहानपणी आपल्या स्थानिक पातळीवर प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ग्लासगो विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याचे निश्चित केले यासाठी फ्रान्सिस हाचेसन यांनी दिलेल्या सिद्धांताचा त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम झालेला होता. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगला अभ्यास करून उत्तम मार्क मिळवले परिणामी त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली.
या शिष्यवृत्तीने त्यांनी आपले पुढील शिक्षण केले. त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेत विविध युरोपीय भाषांचे देखील शिक्षण घेतले. त्यांनी आपली सुरुवात भाषाशास्त्रामधून केली असली तरी देखील त्यांचा लहानपणापासूनच अर्थशास्त्राकडे ओढा होता, त्यामुळे अर्थशास्त्रामधील अनेक मूलभूत तत्व मांडून त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केले होते. त्यांचे हे अर्थशास्त्रामधील योगदान आज देखील सर्वत्र वापरले जाते.
फ्रान्सिस हचेसन यांचा त्यांच्या मनावर फार खोलपर्यंत परिणाम झाला होता, त्यामुळे त्यांनी देखील यांच्याप्रमाणेच एकत्र होण्याचे मनाशी निश्चित केले होते आणि याकरिता आवश्यक असणारी परीक्षादेखील त्यांनी १७३८ मध्ये उत्तीर्ण करून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या क्षेत्रात चांगले कार्य करणे सुरू केले होते.
ते अतिशय उच्च बुद्धिमत्तेचे असल्यामुळे महाविद्यालयीन स्तरापासूनच त्यांना वेगळी ओळख मिळालेली होती. आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ गावी परतले. येथे सुरुवातीच्या काळी ते अनेक प्रकारचे लेक्चर्स देत असत ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली होती. त्यांनी १७५१ यावर्षी आपली प्राध्यापक म्हणून देखील कारकीर्द सुरू केली होती या ठिकाणी ते नैतिक तत्त्वज्ञान शिकवत असत.
ॲडम स्मिथ यांचे लिखाण:
ॲडम स्मिथ हे त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाकरिता ओळखले जातात. त्यांनी नऊ मार्च १७७६ रोजी लिहिलेले हे पुस्तक आर्थिक क्षेत्रामध्ये फार मोलाची भूमिका बजावत आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय सरळ व समर्पक भाषेमध्ये अर्थशास्त्राच्या विविध संकल्पना मांडलेल्या असून त्या शास्त्रोक्त पद्धतीच्या देखील आहेत.
या पुस्तकामध्ये श्रम या गोष्टीला फार महत्त्व दिलेले असून सुमारे ९०० पानं याच बाबीवर लिहिलेली आहेत. त्याचबरोबर व्यापार वितरण, उत्पन्न, निसर्ग इत्यादी प्रकारच्या घटकांवर देखील या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे. एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित सर्व सिद्धांतांचा अभ्यास केला होता त्यामुळे त्यांना या क्षेत्रामध्ये फार ज्ञान प्राप्त झालेले होते आणि या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी आपली पुस्तक लिहून त्याला प्रसिद्ध देखील दिली होती, मात्र या पुस्तकाच्या आधी देखील त्यांनी “द थेअरी ऑफ मोरल सेंटीमेंट” हे पुस्तक लिहिले होते जे त्यांचे सर्वात पहिले प्रसिद्ध पुस्तक होते.
या पुस्तकाचे प्रकाशन १७५९ यावर्षी झाले होते. या पुस्तकामध्ये त्यांना तत्त्वज्ञानाच्या रांगेमध्ये पहिले स्थान मिळवण्यास फार मदत झाली होती. ते प्रचंड ज्ञानी असण्याबरोबरच त्यांच्याकडे शब्दांचा साठा देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर होता, त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारचे व्याख्यान देत पुस्तके देखील लिहिलेली आहेत जे आज देखील एक आदर्श किंवा संदर्भ पुस्तक म्हणून वापरले जातात.
निष्कर्ष:
अगदी लहानपणापासूनच पैशाचे महत्व प्रत्येक व्यक्तीला समजत असते. पैसा नसेल तर दुकानात साधे चॉकलेट देखील कोणी देत नाही. या पैशाला योग्य रीतीने व्यवस्थापित केले तर माणसाला समृद्ध व श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, मात्र या पैशाचा गैरवापर केला किंवा योग्य रीतीने त्याचा वापर केला नाही तर लवकरच दिवाळ निघण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
सर्व लोकांना अर्थशास्त्राची ओळख व्हावी यासाठी ॲडम स्मिथ यांनी “द वेल्थ ऑफ नेशन” हे पुस्तक लिहिलेले आहे. या अंतर्गत अनेक लोकांनी आपले समृद्ध भविष्य घडवलेले आहे. हे पुस्तक आज देखील अनेक लोक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरताना दिसून येतात.
या ग्रंथामध्ये सर्वप्रथम एडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या देखील नमूद केली होती. अर्थशास्त्राचे विविध सिद्धांत असलेले हे पुस्तक एक बेस्ट सेलर पुस्तक आहे आणि अशा या पुस्तकाच्या लेखकाबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघितली आहे ज्यामध्ये ऍड स्मिथ यांचे बालपण, त्यांचा जन्म, त्यांची व्यावसायिका कारकीर्द, त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांच्या मृत्यू बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे.
FAQ
ऍडम स्मिथ यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व्यक्तीचा जन्म १५ जून १७२३ या दिवशी झाला होता.
ऍडम स्मिथ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता व त्यांच्या आईचे नाव काय होते?
ॲडम स्मिथ यांचा जन्म देशातील किर्ककेलडी या ठिकाणी झाला होता व त्यांच्या आईचे नाव मार्गरिटा असे होते.
ऍडम स्मिथ हे कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात?
ऍडम स्मिथ हे एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ व अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात, त्याचबरोबर त्यांनी लिहिलेल्या “द वेल्थ ऑफ नेशन” या पुस्तकाकरिता व “मुक्त बाजार प्रणालीच्या सिद्धांताकरिता” देखील त्यांना ओळखले जाते.
ॲडम स्मिथ यांनी कोणकोणत्या ठिकाणी शिक्षण घेतलेले आहे?
ॲडम स्मिथ यांनी ग्लासको विद्यापीठ ऑक्सफर्ड कॉलेज इत्यादी सुप्रसिद्ध ठिकाणी शिक्षण पूर्ण केलेले आहे.
ॲडम स्मिथ यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता?
ऍडम स्मिथ यांचा मृत्यू दिनांक १७ जुलै १७९० या दिवशी झाला होता.