Grampanchayat Information In Marathi ग्रामपंचायत म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम निवडणुका आठवतात, कारण लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकांना जेवढे मनावर घेतले जात नाही त्यापेक्षा कित्येक पटीने ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये धांदल दिसून येते.
ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती Grampanchayat Information In Marathi
मुख्यत्वे प्रशासनाला विकेंद्रीकृत करण्याकरिता ग्रामस्तरावर या ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या ग्रामपंचायतीला ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार वैधानिक दर्जा देखील प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र मध्ये असलेल्या त्रिस्तरीय पंचायतीराज व्यवस्थेमधील सर्वात तळाची पंचायतराज संस्था म्हणून ग्रामपंचायतला ओळखले जाते.
या ग्रामपंचायतीवर ०७ ते १७ सदस्यांची पाच वर्षांच्या कालावधी करताना निवडणूक घेतली जाते. आणि यातील ग्रामप्रमुखाला सरपंच म्हणून ओळखले जाते. आणि इतरांना सदस्य म्हणून ओळखले जाते.
आजच्या भागामध्ये आपण आहे ग्रामपंचायत बाबत माहिती बघणार आहोत…
नाव | ग्रामपंचायत |
प्रकार | प्रशासन संस्था |
स्तर | पंचायतराज मधील तिसऱ्या स्तरावरील संस्था |
सदस्य संख्या | ७ ते १७ सदस्य७ ते १७ सदस्य |
प्रमुख | सरपंच |
पातळी | ग्राम किंवा गावपातळी |
ग्रामपंचायतींचे स्वरूप:
पंचायतराज कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हाप्रमुख किंवा जिल्हा दंडाधिकारी लोकसंख्येच्या प्रमाण निकषावर आधारित ग्रामपंचायतच्या स्थापना करत असतात. एका गावाला एक ग्रामपंचायत असू शकते, मात्र कमी लोकसंख्येच्या दोन शेजारील गावांना एकत्र जोडून गट ग्रामपंचायतची देखील स्थापना केली जाते. या ग्रामपंचायतीमधील प्रमुखाची निवड बहुमताच्या आधारे केली जाते. ज्याला सरपंच असे म्हणून ओळखले जाते.
वेळोवेळी सरपंच हा थेट जनतेमधून निवडायचा की सदस्यांमधून निवडायचा याबाबत बदल झालेले आहेत. साधारणपणे एका वार्डमध्ये ५०० लोकसंख्या असते, आणि या प्रत्येक वार्ड किंवा प्रभागामधून एका सदस्याची निवड केली जाते.
ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्य इत्यादींचा समावेश असतो. पहिल्या सभेपासून पुढील पाच वर्ष त्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असतो. त्यानंतर पुन्हा नव्याने निवडणुका घेतल्या जातात, आणि नवीन ग्रामपंचायत ची स्थापना केली जाते.
ग्रामपंचायतीच्या सभा किंवा बैठका:
ग्रामपंचायत मध्ये बैठका घेणे अनिवार्य करण्यात आलेले असून, प्रत्येक दोन महिन्यातून किमान एक तरी ग्रामपंचायत सभा ग्रामपंचायत मुख्यालयामध्ये होणे गरजेचे ठरते. त्यासाठी ग्रामप्रमुख सरपंचांनी अधिसूचना काढावी लागते. तसेच ग्रामपंचायतच्या एकूण सदस्यांच्या एक तृतीयांश सदस्यांनी ग्रामसभा घेण्याची विनंती केल्यास सरपंच या विनंतीच्या पंधरा दिवसांच्या आत ग्रामसभा बोलावत असतो.
ग्रामपंचायतीच्या सभांची सूचना देताना त्यामध्ये सभेचे ठिकाण, वेळ, दिनांक, आणि सभेमध्ये चर्चेला ठेवले जाणारे मुद्दे यांसारख्या गोष्टी नमूद केलेल्या असल्या पाहिजेत. तसेच सभेमध्ये काय चर्चा झाली, आणि त्यातून काय निष्पन्न झाले हे इतिवृत्त लिहिण्याकरिता रजिस्टर असले पाहिजे. आणि उपस्थित सर्व सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केल्या पाहिजेत.
ग्रामपंचायतच्या बैठका या केवळ सदस्यांनाच घेऊन केल्या जातात. मात्र ग्रामसभा या गावातील सर्व जनतेसाठी खुले असतात. या ग्रामसभेच्या सूचना आधी देणे गरजेचे असते. ज्यामध्ये साधारण सभा असेल तर सात दिवस आधी, आणि विशेष सभा असेल तर तीन दिवस आधी संपूर्ण गावाला कळविणे गरजेचे असते. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विराजमान असतात. मात्र ते उपस्थित नसतील तर उपसरपंच ही जबाबदारी पार पाडू शकतात.
ग्रामसभेतील विविध स्थायी समिती:
ग्रामसभेला कार्य करण्यासाठी विविध समित्यांची आवश्यकता असते. आणि या समित्यांमध्ये ग्रामपंचायत मध्ये निवडून दिलेल्या सदस्यांचा समावेश होतो. एक सदस्य एका किंवा अनेक स्थाई समित्यांमध्ये देखील सदस्य असू शकतो. मित्रांनो, स्थाई म्हणजे शाश्वत किंवा पर्मनंट होय. त्यानुसार या स्थायी समिती ग्रामपंचायत कार्यकाळ संपल्यानंतर देखील कायम राहत असतात. मात्र पुढील सदस्यानुसार त्यातील सदस्यांच्या जागा बदलत असतात.
कामाचे प्रभावीपणे विभाजन केले जावे, प्रत्येक कामाची गुणवत्ता तपासून योग्य काम व्हावे, आणि सर्व नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाव्यात, याकरिता या समित्यांची स्थापना करण्यात येत असते. ग्रामपंचायतीने किती समिती स्थापन कराव्यात, याबाबत कुठलीही मर्यादा नसली तरी देखील महत्त्वाच्या किमान सहा समित्या प्रत्येक ग्रामपंचायतीने स्थापन केल्या पाहिजेत, अशी सक्ती करण्यात येत असते. या सहा समित्या मध्ये पुढील समित्यांचा समावेश होतो.
- नियोजन समन्वय व वित्त समिती
- सामाजिक न्याय समिती
- सार्वजनिक आरोग्य ग्रामीण स्वच्छता आणि कुटुंब कल्याण समिती
- उत्पादन समिती
- शिक्षण समिती आणि
- सार्वजनिक बांधकाम समिती
यातील, नियोजन वित्त आणि समन्वय समिती ही सर्व समित्यांची प्रमुख समिती असून, यामध्ये वित्तीय बाबींबद्दल कार्य केले जाते. तसेच या समितीमार्फत या समितीच्या कक्षेबाहेरीलही काम बघितले जाते.
सरपंच यांच्या कार्य व जबाबदाऱ्या:
- मित्रांनो, ग्रामप्रमुख म्हणून सरपंचांना विविध कार्य आणि जबाबदाऱ्या पार पाडावे लागतात, त्या पुढील प्रमाणे.
- ग्रामपंचायतच्या बैठका व ग्रामसभा यांचे आयोजन करणे.
- ग्रामसभेच्या कामकाजाबद्दल सुव्यवस्था राखणे.
- प्रत्येक दोन महिन्यांनी एक ग्रामपंचायतची बैठक, आणि प्रत्येक वर्षात किमान चार ग्रामसभा आयोजित करणे.
- गावाचा निधी आणि भांडवली निधी यावर लक्ष ठेवणे, आणि त्याचे योग्य विनियोजन करणे.
- ग्रामपंचायत मुख्यालयाचे पर्यवेक्षण करणे.
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे, आणि त्यांचे नियंत्रण करणे.
- ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करणे.
- नवीन कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
- सरकारने कायदा किंवा अधिसूचनेद्वारे नेमलेली अधिकची कर्तव्य देखील पूर्ण करणे.
निष्कर्ष:
ग्रामपंचायत हा शब्द आपल्या अगदी लहानपणापासून कानावर पडत आलेला आहे. ग्रामपंचायत म्हटलं की गाव स्तरावर असणाऱ्या राजकारणाचा मुख्य घटक समजला जातो. ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि इतर सदस्य तसेच काही ठिकाणी सरपंच अर्थात उपसरपंचाचा समावेश असतो.
हे सर्वजण मिळून गावाचा कारभार चालवत असतात आणि विविध शासनाच्या योजना राबविण्याबरोबरच गावातील समस्यांचे शासन दरबारी प्रश्न मांडण्याचे कार्य या सदस्यांमार्फत आणि ग्रामपंचायतीच्या प्रमुख अर्थात सरपंच मार्फत केली जाते. आजच्या भागामध्ये आपण या ग्रामपंचायत विषयी माहिती बघितलेली आहे.
त्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत म्हणजे काय, तिचे स्वरूप कसे असते, बैठका कशा होतात, त्यातील स्थायी समिती म्हणजे काय, तसेच ग्रामप्रमुखाची जबाबदारी काय असते, आणि या ग्रामपंचायतीची कार्य काय असतात, इत्यादी गोष्टींबद्दल माहिती घेतलेली आहे. तसेच सोबत काही ग्रामपंचायतीविषयीचे प्रश्न देखील बघितलेले आहेत.
FAQ
ग्रामपंचायतीच्या स्थापनेमध्ये कोणती घटना दुरुस्ती महत्त्वपूर्ण समजली जाते?
ग्रामपंचायतच्या स्थापनेमध्ये पंचायतराज साठीची घटना दुरुस्ती अर्थात ७३ वी घटना दुरुस्ती खूप महत्त्वाची समजली जाते.
ग्रामपंचायतीची स्थापना कशा नुसार केली जाते?
ग्रामपंचायतीची स्थापना ही त्या ठिकाणावरील लोकसंख्येच्या आधारावर केली जात असते. कमी लोकसंख्या असेल तर अशा ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका करिता गावाचे विभाजन कसे केले जाते?
ग्रामपंचायत निवडणुका करिता लोकसंख्येवर आधारित गावाचे विविध भाग पाडले जातात. त्याला वार्ड असे म्हटले जाते. आणि या प्रत्येक वार्ड मधून सदस्य संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या निवडणूक घेतली जातात.
पंचायतराज व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या पंचायतींचा समावेश होतो?
पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद या तीन स्थानिक स्वराज्य संस्थेचा समावेश होतो.
ग्राम प्रमुखाच्या अर्थात सरपंचाच्या मुख्य जबाबदारीमध्ये कशाचा समावेश होतो?
ग्रामप्रमुखाच्या प्रमुख कार्यांमध्ये आणि जबाबदारी मध्ये गावाला हवे नको त्या गोष्टी बघणे, गावाचा विकास करणे, आणि ग्रामसभेचे आयोजन करणे, व त्यासंदर्भातील नोटीस प्रसिद्ध करणे इत्यादी कार्यांचा समावेश होतो.
आजच्या भागामध्ये आपण ग्रामपंचायत या विषयावर माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा. सोबतच तेथे तुमच्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकां दरम्यान झालेल्या अनेक गमती जमती देखील आमच्या सोबत शेअर करा. आणि सोबतच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती शेअर करा.
धन्यवाद…