Hardik Pandya Information In Marathi हार्दिक पंड्या हे भारतीय क्रिकेटपटू आहेत तसेच त्यांची सुप्रसिद्ध क्रिकेटर म्हणून ओळख आहे. हार्दिक पांड्या हे भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू असून हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू संघात घेतलेला आहे. हा खेळाडू जीटीए संघाकडून खेळतो. जी. टी. या संघाने त्याला 15 कोटी रुपयाला रिटेंड केले आहे. हार्दिक पांड्या यांचा भाऊ कृणाल पांड्या हा एल.एस.जी या संघाकडून खेळतो. सिक्स मारणे हे हार्दिक पांड्याचा आवडता छंद आहे. हार्दिक पंड्या सुरुवातीला लेखस्पिन गोलंदाजी करत होता. त्यानंतर त्याने वेगवान गोलंदाजी करायला सुरुवात केली.
हार्दिक पंड्या यांची संपूर्ण माहिती Hardik Pandya Information In Marathi
नाव | हार्दिक हिमांशू पंड्या |
जन्म | 11 ऑक्टोबर 1993 |
जन्मगाव | गुजरात मधील सुरत |
फलंदाजाची | पद्धत उजव्या हाताने |
पेशा | क्रिकेटर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जन्म व बालपण :
हार्दिक पांड्या यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरात मधील सुरत या शहरांमध्ये झाला. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला. हार्दिक पांड्या यांचे पूर्ण नाव हार्दिक हिमांशू पांड्या असे आहे. वडिलांचा कारभार हा कार फायनान्स म्हणजेच कार घेण्यासाठी लागणारे भांडवल देण्याचा एक छोटासा व्यवसाय आहे; परंतु हा व्यवसाय काही काळानंतर त्यांनी बंद केला.
आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बदोडा येथे स्थलांतरित झाले. हार्दिक याला एक भाऊ सुद्धा आहे. ज्याचे नाव कृणाल असे आहे, हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून मुंबई इंडियन्स या संघामध्ये इंडियन प्रीमियर लीग मध्ये सहभागी असतात. हार्दिक पांड्या याला कुंगफू पांड्या असं सुद्धा टोपण नाव आहे. हार्दिक यांना लहानपणापासूनच क्रिकेट या खेळाविषयी अत्यंत प्रेम होते.
जिव्हाळा होता, त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावासोबत किरण मोरे या ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि क्रिकेटचा सुरुवात त्यांनी तिथे केली. आज हार्दिक पांड्याचे विशेष म्हणजे उजव्या हाताने फलंदाजी करतात आणि उजव्या हाताने मध्यगती गोलंदाजी करतात. लहानपणापासून क्रिकेट खेळण्याकडे त्यांचे लक्ष असल्यामुळे शाळेमध्ये त्यांचे लक्ष लागत नव्हते. हार्दिक ने फक्त नववीपर्यंत शिक्षण केले आहे.
हार्दिक पांड्यांचे शिक्षण :
हार्दिक पांड्या यांना लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड असल्यामुळे ते शाळेमध्ये विशेषता लक्ष देत नव्हते, त्यामुळे त्यांनी केवळ नववीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्या पुढे शाळेला ते कधी गेले नाही आणि त्यांनी त्यानंतर आपले संपूर्ण लक्ष क्रिकेट या खेळावर केंद्रित केले व यांच्या 18 व्या वर्षी हार्दिक लेखस्पिनर कडून वेगवान गोलांदीची कडे वळला आणि तेव्हापासून तो वेगवान गोलंदाज बनला.
हार्दिक पांड्या यांचे वैयक्तिक जीवन :
1 जानेवारी 2020 मध्ये हार्दिक पांड्या यांचा विवाह झाले. त्यांचा विवाह हा 2020 मध्ये भारतीय वंशाची नताशा स्टॅनकोविझ तिच्याशी झाले तसेच त्यांना अगस्त्य या नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.
हार्दिक पांड्या यांचे क्रिकेटची कारकीर्द :
हार्दिक पांड्या यांना लहानपणापासून क्रिकेट खेळाची आवड असल्यामुळे त्याने क्रिकेटलाच आपले करिअर बनवले तसेच त्याचे कोच सनत कुमार यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन हार्दिक पांड्या यांनी 2013 मध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपले पहिले पाऊल टाकले आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बडोदा या संघामध्ये ते खेळले हार्दिक पांड्या यांच्या क्रिकेटच्या प्रसिद्धीला खरी तिथूनच सुरुवात झाली.
2013-14 मध्ये घडलेल्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि अंतिम सामन्यांमध्ये विदर्भ क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना आठ षटकार त्यांनी काढले व 86 धावा तसेच नाबाद आणि धुवाधार असा विजय त्यांनी त्यांच्या संघाला मिळवून दिला. षटकार मारणे हे त्यांचे आवडते कार्य आहे. डोमेस्टिक करिअर नंतर त्यांनी ओडीआय इंटरनॅशनल क्रिकेट म्हणजेच एक दिवशीय क्रिकेटमध्ये 16 ऑक्टोबर 2016 रोजी पदार्पण केले.
त्यांचा पहिला सामना हा न्यूझीलंड विरुद्ध होता. या सामन्यांमध्ये त्यांनी 32 चेंडूमध्ये 36 धावा अशी खेळ खेळली. त्यानंतर संदीप पाटील, मोहित शर्मा, के. एल. राहुल यांसारख्या क्रिकेट खेळाडू नंतर एक दिवसीय सामन्यात समान वीर म्हणून निवडला जाणारा हार्दिक पांड्या हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. क्रिकेटच्या विश्वामध्ये त्यांनी आपल्या कौशल्याने पुढे पाऊल टाकले आणि 2008 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 43 चेंडू मध्ये 76 धावा त्याने काढल्या.
क्रिकइन्फोने 2017 साली हार्दिक यांनी एक दिवशीय इलेव्हनमध्ये सुद्धा आपले पद कायम केले. ओडीआय नंतर हार्दिकने कसोटी सामन्यांमध्ये सुद्धा सहभाग घेतला आणि 2016 मध्ये भारताच्या कसोटी संघामध्ये फलंदाज म्हणून त्याची नेमणूक सुद्धा करण्यात आली. प्रॅक्टिस दरम्यान हार्दिक यायला दुखापत झाली होती. या कसोटी सामन्यात सहभागी होता आले नाही.
2017 मध्ये झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यांमध्ये हार्दिकने आपले कौशल्य दाखवून दिले. असा विक्रम नोंदवणारा हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय फलंदाज आहे. या शिवाय एका षटकात 26 भावा असा भारताकडून सर्वाधिक धावा केल्याचा नोंद झाली आहे. हार्दिक पांड्या एवढे पुढे जाण्याची कारण म्हणजे त्यांचे अथक परिश्रम, जिद्दपणा, किकेटविषयीचे प्रेम व चिकाटी आहे.
खूपच कमी दिवसांमध्ये हार्दिक पांड्या यांना क्रिकेट प्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि कमी वेळामध्ये त्यांनी 2016 च्या ऑस्ट्रेलियन विरुद्धच्या सामन्यांमध्ये दोन खेळाडूंना बाद करून टी 20 आंतरराष्ट्रीय सामने सहभागी होण्यास सुरुवात केली. रांची येथे झालेल्या श्रीलंका विरुद्ध टी ट्वेंटी सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या यांनी 14 चेंडूमध्ये 27 धावा केल्या होत्या तसेच आशिया चषक मध्ये 2015 मध्ये त्यांनी त्यांच्या बॅटमधून 18 चेंडूवर 31 धावा काढल्या.
बांगलादेश विरुद्ध यशस्वी बारी केली होती. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांमध्ये फक्त 8 धावा देऊन तीन खेळाडू बाद करणे, हार्दिक पांड्या यांना जमलं होतं. वर्ल्ड टी 20 मध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या एका सामन्यांमध्ये हार्दिक यांनी तीन चेंडूमध्ये बांगलादेशाच्या महत्वच्या विकेट्स काढल्या होत्या. हार्दिक पांड्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे बांगलादेशाला एका धावेने पराभूत व्हावे लागले होते .
तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंड विरुद्ध सामन्यात 34 धावा देत चार खेळाडू बाद केले होते. हार्दिक पांड्या यांनी नोंदवलेली ही आजपर्यंतची सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी आहे तसेच फलंदाजी करताना 14 चेंडू मध्ये 33 धावा त्यांनी नाबाद असा विक्रम रचला एकाच सामन्यांमध्ये हार्दिक यांनी तीस पेक्षा जास्त धावा करून चार खेळाडू बाद करून एक विजय मिळवलेला आहे. हार्दिक पांड्या यांनी आठ चेंडूमध्ये 31 चेंडू मध्ये 61 धावा करून आपल्या संघाला उत्कृष्ट विजय प्राप्त करून दिला.
2017 मध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यात हार्दिक यांनी रायझिंग पुणे सुपर जॉईंटविरुद्ध खेळताना शेवटच्या शतकात गोलंदाज अशोक दिंडाविरुद्ध 30 धावांची खेळी रचून विक्रम तयार केला आणि असा उत्कृष्ट खेळाडू हा मुंबई इंडियन संघाला घडवायचं नव्हता म्हणून म्हणून आयपीएल लिलाव जेव्हा झाला तेव्हा मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या यांना 11 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. हार्दिक यांनी आतापर्यंत अकरा कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये आतापर्यंत त्यांनी 532 धावांचा रेकॉर्ड केले.
FAQ
हार्दिक पांड्या यांची पूर्ण नाव काय आहे?
हार्दिक हिमांशू पांड्या.
हार्दिक पांड्या यांचा जन्म कधी झाला?
11 ऑक्टोबर 1993.
हार्दिक पांड्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
हार्दिक हार्दिक पांड्या हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे.
हार्दिक पांड्या यांचे शिक्षण किती झालेले आहे?
हार्दिक पांड्या यांचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झालेले आहे.
हार्दिक पांड्या यांच्यामध्ये कोणती विशेषता आहे?
हार्दिक पांड्या हा खेळाडू अष्टपैलू आहे.