Horse Animal Information In Marathi घोडा या प्राण्याचा उपयोग प्राचीन काळापासून होत आलेला आहे तसेच घोडा या प्राण्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. घोड्याचा वापर हिंदू धर्मातील महाभारत, रामायण या ग्रंथांमध्ये सुद्धा घोड्याचे संबंध दर्शविलेला आहे. घोडा या प्राण्यावर सर्वात जुना एक ग्रंथ लिहिलेला आहे, जो शालिहोत्र या ऋषींनी महाभारत काळापूर्वी लिहिला होता. त्याचे नाव शालीहोत्र ग्रंथ असे आहे. म्हणजेच पुरातन काळामध्ये सुद्धा घोड्याचा उपयोग झालेला आहे. त्यामुळे घोडा या प्राण्याचा आपण इतिहास किती जुना आहे. हे यावरून सांगू शकतो.
घोडा प्राण्याची संपूर्ण माहिती Horse Animal Information In Marathi
घोड्याचा उपयोग हा दळणवळण वाहतुकीसाठी केला जात असे. घोडा हा त्याच्या मालकाशी वफादार राहतो तसेच तो त्याच्या मालकाच्या आज्ञेनुसार चालतो. घोड्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर असतो. घोडा हा न थकता 60 ते 70 किलोमीटर अंतर पार करू शकतो. घोडा हा प्राणी शाकाहारी आहे. हा प्राणी गवत किंवा धान्य खातो. घोडा हा एकमेव असा प्राणी आहे, जो उभा राहून सुद्धा विश्रांती घेऊ शकतो.
घोडा या प्राण्याचा इतिहास :
घोडा हा एक वन्य प्राणी आहे, तो सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या मासासाठी आणि त्याच्या कातडीसाठी मारला गेला. बऱ्याच काळामध्ये घोड्याचे मास शिजवून खाल्ले जायचे. त्यानंतर त्याच्या त्वचेचा वापर हा कपडे बनवण्यासाठी सुद्धा केला जायचा. घोड्याच्या शिकार करण्यासोबत लोक त्याला पाळु लागले. लोकांना त्यावर वस्तू वाहून नेता याव्यात म्हणून त्यांनी घोड्याला पाळले तसेच घोड्याचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे. इसवी सन 1900 मध्ये ट्रोजन हॉर्स या होण्याची प्रतिमा ही ट्राय या शहरांमध्ये प्रथमच उघडकीस आली होती.
याआधी चीन इजिप्त या दोन्ही देशांमध्ये 1200 मध्ये रथ ओढण्यासाठी घोड्यांचा वापर केला जात होता. त्यानंतर घोड्याचा उपयोग हा सैन्यामध्ये सुद्धा होऊ लागला. घोड्यावर स्वार होऊन युद्धासाठी सैन्यातील लोक जात होते तसेच युद्धाचे रथ ओढण्यासाठी सुद्धा घोड्यांचा वापर केला जात असे.
18 व्या आणि 19 व्या शतकामध्ये घोड्यांचा वापर कुत्र्यासोबत शिकार करण्यासाठी सुद्धा केला गेला. त्यानंतर घोड्यापासून एक खेळ सुद्धा खेळल्या जातात, त्याला हॉर्स रेसिंग असे सुद्धा म्हणतात. हा खेळ आजकाल आपल्या सर्वांनाच माहित आहे.
घोड्यांची रचना :
घोड्यांची रचना ही लाखो वर्षापासून विकसित होत आलेली आहे त्यामुळे घोडे हे वेगवेगळ्या वातावरणात टिकून राहू शकतात तशा प्रकारची त्यांची शरीरिक रचना निर्माण झालेली आहे घोडे हे सामाजिक प्राणी आहेत. घोड्यांच्या रचनेमध्ये त्यांचा मजबूत बांधा असतो. घोडा हा एक संस्थान प्राणी आहे या घोड्याला चार पाय तसेच त्याच्या पायाला खुर असतात घोडे फक्त त्यांच्या नाकातून श्वास घेऊ शकतात. घोड्यांना एक झुबकेदार शेपूट असते. घोड्यांना शिंगे नसतात. घोडे हे उभे राहून झोप घेऊ शकतात.
घोडा कोठे राहतो कुठे राहतो?
पाळीव घोड्यांसाठी तबेला तयार केला जातो. त्या तबेलामध्ये घोड्यांना अन्न पाणी दिले जाते तसेच जंगली घोडे हे जंगलांमध्ये सुद्धा आढळतात.
घोड्यांचा आहार :
घोडा हा शाकाहरी प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या आहारामध्ये कोंडा, धान्य, ओट्स बारली आणि गवत यांचा समावेश असतो. घोड्याला चांगले खुराक दिल्यास, घोडा हा जास्त वेगाने धावू शकतो, त्याची कार्यक्षमता वाढते. पाळीव घोडे हे सुदृढ असतात तर जंगली घोडे हे सशक्त असतात तसेच जंगलामध्ये मिळणारा हिरवा चारा, गवत, झाडांची पाने, फुले हे घोडे खात असतात.
घोड्यांचा प्रजनन काळ
घोडा या प्राण्याच्या भारतामध्ये सहा प्रजाती आढळून येतात. जगभरात घोड्यांच्या अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या देशातील घोड्यांच्या या जातीला एक विशिष्ट वैशिष्ट्य आहेत. घोड्यांच्या काही प्रजाती खालील प्रमाणे आहेत. भारतामध्ये घोड्यांचा इतिहास हा खूप प्राचीन आहे तसेच भारतीय उपखंडाची व्याप्ती ही पूर्वी बऱ्याच बरोबर पसरलेले असल्याने आज ज्या प्रजाती स्थानिक प्रदेशाने ओळखले जातात, त्यामध्ये सिंधी घोडा आजही भारतीय अश्व म्हणूनच ओळखले जातात.
पंजाबी घोडा : पंजाबी घोडा हा पंजाब प्रांतांमध्ये आढळून येतो.
काठीयावाडी घोडा : काठीयावाडी ही घोड्याची एक प्रजाती आहे. ती गुजरात मधील सौराष्ट्र या प्रदेशांमध्ये आढळून येते. तसेच काठीयावाड द्वीपकल्पातील हा घोडा मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे या घोड्याला काठीयावाड घोडा हेच नाव प्रचलित झाले, हा घोडा वाळवंटात राहतो. त्याची स्टॅमिना ही जागतिक दर्जाची असते, त्याचबरोबर हे घोडे उबदार प्रदेशात गरम तापमानात आणि कमीत कमी प्रमाणात अन्न व पाण्याचे ठिकाणी सुद्धा राहू शकतात. या घोड्यांचा वापर हा युद्ध घोडा घोडदळ तसेच सैन्य दलामध्ये पोलीस करतात.
मारवाडी घोडा : या घोड्यांची प्रजाती ही राजस्थान मधील मारवाड प्रदेशात आढळून येते. ही एक दुर्मिळ प्रजाती आहे. तसेच या घोड्याच्या कानात टीप देऊन घोड्याला ओळखणे सोपे जाते. मारवाडी घोडा आणि काठीयावाडी घोडा दिसायला हे सारखेच असतात. 1930 मध्ये या जातीचे घोडे पूर्णपणे नष्ट झाले, त्यामुळे भारतातून या घोड्यांची निर्यात करण्यास बंदी घातली. या जातींमध्ये राखाडी रंगाचे घोडे हे खूप मौल्यवान असतात तसेच काठीयावाडी या जातीतील घोड्यांचा रंग काळा असल्यास तो मृत्यूचे प्रतिनिधित्व करणारा मानला जातो किंवा दुर्दैवी मानला जातो.
मणिपुरी पोनी घोडा :या घोड्याच्या प्रजाती ह्या अरब आणि वन्य घोडे तसेच तिबेटी पोलो या घोड्यांच्या जातीचे एकत्रीकरण करून निर्माण केलेली आहे. या घोड्यांचा वापर हा रेसिंगमध्ये केला जातो. तसेच भारतात पोलो हा खेळ खेळण्यासाठी सुद्धा या घोड्यांचा वापर केला जातो. ही भारतातील एक विकसित झालेली प्राचीन जात आहे.
भुटीया खोड : भुटीया या घोड्याची प्रजाती हे सिक्कीम व दार्जिलिंग येथून उत्पन्न झाली आहे असे मानले जाते. हे घोडे मंगोलियाच्या जाती सारखेच असतात तसेच हे घोडे आकाराने लहान असून ते डोंगरावर राहतात तसेच तिथल्या वातावरणामुळे या घोड्यांमध्ये कठोरपणा निर्माण झालेला आहे तसेच हे घोडे इतरत्र सापडत नाहीत.
FAQ
घोड्याचे आयुष्य किती वर्ष असते?
घोड्याचे आयुष्य हे त्यांच्या प्रजातीनुसार असते. सहसा घोड्यांच्या प्रजाती 25 ते 40 वर्षापर्यंत जगतात.
घोडा जिथे राहतो त्याला काय म्हणतात?
तबेला.
घोड्यांचा उपयोग पूर्वी कशासाठी केला जात असे?
घोड्यांचा उपयोग पूर्वी वाहतुकीसाठी तसेच सैन्यात व्यक्त करण्यासाठी व युद्धातील रथ होण्यासाठी होत असे.
घोड्यांची भुटीया ही प्रजाती कोठे आढळून येते
सिक्किम व दार्जिलिंग.
घोडा या प्राण्यावर लिहिण्यात आलेला ग्रंथ कोणता आहे?
शालिहोत्र.