Cow Animal Information In Marathi गाय हा एक पाळीव प्राणी आहे तसेच भारतामध्ये व इतर देशांमध्ये गाईच्या अनेक प्रजाती आढळून येतात. गाय हा प्राणी बोविडे कुटुंबाचा एक भाग आहे. ज्यांचा समावेश गुरेढोरांमध्ये सुद्धा केला जातो. गाय हे मादीसाठी म्हटले जाते तर गाईच्या नराला बैल किंवा सांड असे म्हटले जाते. गाय हिंदू धर्मामध्ये पवित्रता व संपन्नतेचे प्रतीक मानली जाते.
गाय प्राण्याची संपूर्ण माहिती Cow Animal Information In Marathi
हिंदू धर्मामध्ये गाईला वैदिक काळापासून विशेष महत्त्व व स्थान आहे तसेच गाईचे गोमूत्र हे हिंदू धार्मिक कार्यात वापरले जाते. त्याला पवित्र मानले जातात, गाईचे शेण गोमूत्र गाईची दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य असे म्हणतात. भारतात खेड्यापाड्यांमध्ये आजही गायींची पूजा केली जाते, गायींना पाळले जातात तसेच घरातील सर्वात पहिला नैवेद्य गाईला देतात. हिंदू धर्मात गाईला माता संबोधले जाते तसेच तिला गोमाता म्हणून हाक मारतात.
सुरुवातीच्या काळामध्ये पैशाचा शोध लागला नव्हता तेव्हा गायीचा वापर विनिमय आणि देवाण-घेवांची साधन म्हणून केला जात होता. परंतु जसजशी माणसाची समृद्धी वाढत गेली तसेच गायींच्या संख्येवरून त्यामध्ये भिन्नता आली. गाईचे वास्तव्य हे हजारो वर्षापासून पृथ्वीवर आहे तसेच हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा गाईचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. गायीची संख्या ही जगभर पसरलेली आहे.
गाईची शारीरिक रचना :
अनेक देशांमध्ये गाईची शारीरिक रचना ही सारखीच असली तरी सुद्धा गायीच्या आकारात व जातींमध्ये थोडा फरक आपल्याला जाणवतो. काही गाई ह्या जास्त दूध देतात तर काही गायींच्या प्रजाती ह्या कमी दूध देतात. गाईंचे शरीर मात्र सडपातळ आणि मागे रुंद असते. गाईला मोठे दोन कान व मोठे दोन शिंगे असतात. गाईला दोन डोळे सुद्धा असतात. तिला एक शेपूट सुद्धा असते तसेच गाई तिच्या मानेच्या मदतीने 360 अंशापर्यंत पाहू शकते.
गायीला चार पाय असतात तसेच तिच्या चारही पायांवर खूरं असतात. गाय त्या खुरांच्या मदतीने कोणत्याही कठीण प्रदेशावर चालू शकते. गायला एक तोंड असते आणि वरच्या बाजूला ते रुंद असते तसेच तिच्या तोंडात तळाशी पातळ असते. गाईच्या संपूर्ण शरिरावर छोटे छोटे केस असतात.
गायीची मान लांब असून तिला चार कासे असतात. गाईच्या तोंडाच्या खालच्या जबड्यामध्ये 32 दात असतात व त्या दातांमुळे गाय दीर्घकाळ चढल्यानंतर अन्न चावत राहते. गाईला मोठे नाक असते. गाईंच्या काही प्रजातींना शिंगे नसतात.
गाय ही कोठे राहते?
गाय ही पाळीव प्राणी आहे, त्यामुळे गाईचे पालन पोषण हे गोठ्यात होते. त्या व्यतिरिक्त गाईंना गोठ्याच्या बाहेर चरण्यासाठी जंगलात सुद्धा नेले जाते. काही जंगलांमध्ये राहणाऱ्या गाई ह्या कडपाने राहतात तसेच त्या जंगलामध्ये राहतात.
गाय काय खाते?
गाय हा प्राणी शाकाहारी आहे, त्यामुळे गाय हे केवळ कडबा, कुट्टी, हिरवा चारा, धान्य इत्यादी खाते. वेगवेगळ्या प्रजातींच्या गाईचा वेगवेगळ्या देशांमध्ये आहार हा वेगळा असतो तसेच त्यांच्या शारीरिक बांधणी नुसार सुद्धा गाईंचा आहार ठरलेला असतो. गाईंची जेवढी आपण काळजी घेऊ तेवढे गायीचे आरोग्य चांगले राहते. तसेच गाईला दररोज अन्न व शुद्ध पाणी दिले गेले पाहिजे. गाईच्या दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी तिला पौष्टिक व संतुलित आहार दिला गेला पाहिजे.
प्रजनन काळ :
गाईचा प्रजनन काळ हा नऊ महिन्यांचा असतो नऊ महिन्यानंतर गाईला एक पिल्लू होते त्याला पाडस असे म्हणतात किंवा वासरू असे सुद्धा म्हणतात.
गोहत्या बंदी :
हिंदू धर्मामध्ये गोहत्या ही बंदी केलेली आहे. गाय हा एक पाळीव प्राणी असून तो खूप उपयुक्त आहे तसेच गाईचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत आहे. हे एक प्रकारचे दिव्य औषधी मानले जाते तसेच काही हिंदूंची समजत आहे की, गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते. परंतु तिची हत्या फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.
त्याकरिता हिंदू धर्मात गोहत्या निशिद्ध मानली गेली. भारतात महाराष्ट्र राज्यात 1976 पासून बहु हत्या बंदीचा कायदा सुरू झालेला आहे. 1995 मध्ये शिवसेना व भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ गाईच्याच नव्हे तर बैलांच्या सुद्धा हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला मात्र त्याला राष्ट्रपतींची अजून मंजुरी मिळाली नव्हती. पंधरा वर्षानंतर राज्यात परत सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीने राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हा कायदा भारतातील काही राज्यात लागू केला.
गाईचा उपयोग :
गाय हे पाळीव प्राणी असल्यामुळे ती खेडापाड्यांमध्ये तसेच शहरांमध्ये सुद्धा पाळली जाते. सकाळ संध्याकाळ गाईचे दूध मिळते.
काही गाईंच्या प्रजाती संकरित करून दूध मिळवण्यासाठी पाळल्या जातात तसेच दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांना विशिष्ट चाऱ्याची आवश्यकता असते.
गाईचे दूध छोट्या मुलांना खूप महत्त्वपूर्ण असते. शरीरासाठी पौष्टिक मानले जाते तसेच आजारी आणि लहान मुलांसाठी गाईचे दूध एक उपयुक्त आहार मानला जातो.
गाईच्या दुधाचे नियमित सेवन केल्यामुळे मनःतीक्षणा व स्मरणशक्ती सुद्धा वाढते तसेच गायीच्या दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये दही, चीज, लोणी तूप बनवले जाते.
गाईचे तूप आणि गोमूत्र हे खूप पवित्र मानले जाते. गायीचे गोमूत्र हे आयुर्वेदिक औषधी म्हणून सुद्धा वापरले जाते. ते अनेक मोठे रोग मुळापासून नष्ट करू शकते.
गाईचे शेण हे पिकांसाठी उत्तम खत आहे. त्यामुळे शेण वाढवून त्याचा इंधन म्हणून सुद्धा वापर केला जातो तसेच शेणखत शेतामध्ये सुद्धा वापरले जाते.
गायीच्या प्रजाती :
गिर गाय : गीर गाय ही गुजरात या राज्यातील काठेवाडच्या दक्षिणेकडील टेकड्या व जंगलांमध्ये आढळून येतात. या गाईचा उपयोग दूध उत्पादनासाठी केला जातो तसेच ही गाय 300 दिवस दूध देते तसेच या गाईचे सरासरी आयुष्य पंधरा वर्षे असते.
सिंधी गाय : सिंधी गाय ही पाकिस्तान मधील कराची व हैदराबाद येथे आढळून येते. ही गाय आकाराने लहान असून बदलत्या हवामानाशी समरस होऊ शकते. या जातीच्या गायी 300 दिवस दूध देतात व तिचे आयुष्य पंधरा वर्षे असते.
देवणी गाय : देवणी गाय ही आंध्र प्रदेश महाराष्ट्र उत्तर आणि पश्चिम बीड नांदेड जिल्ह्यात आढळून येते. या गाईचा उपयोग सुद्धा दूध उत्पादन व शेतीसाठी बैल निर्मितीसाठी केला जातो.
जर्सी गाय : जर्सी गाई इंग्लिश खाडीतील बेटांमध्ये आढळून येते. ही एक विदेशी गुरांमधील लहान जातीचे जानवरे आहे. या गुरांचा रंग लालसर पिवळा असतो. या गाईचा उपयोग दूध उत्पादनासाठी केला जातो.
होलस्टिन फ्रजियन गाय : या गायीच्या प्रजाती हालंड या युरोपीय देशातील आढळून येतात. या गाई इतर गाईच्या आकारमानाने मोठ्या असतात तसेच त्यांच्या रंग पूर्णतः पांढरा किंवा पांढरे पाणी ठिपके असलेला असतो. या गाईचा उपयोग दूध उत्पादनासाठी केला जातो तसेच या गाईच्या शेपटीचा गोंडा पांढरा असतो. ही गाई दूध उत्पादन करता जगभर प्रसिद्ध आहे.
FAQ
गाय किती वर्ष जगते?
गाय बारा ते पंधरा वर्षे जगते.
गाय किती दिवस दूध देते ?
गाय तीन वर्षापर्यंत दूध देऊ शकतात.
हिंदू धर्मात गाईला कोणत्या नावाने ओळखले जाते?
गोमाता कामधेनु.
भारतात गाईच्या किती जाती आढळून येतात?
30 जाती आढळतात.
गायीच्या पिल्लांना काय म्हणतात?
वासरु.