महात्मा ज्योतिराव फुले यांची संपूर्ण माहिती Mahatma Jyotirao Phule Information In Marathi

Mahatma Jyotirao Phule Information In Marathi महात्मा ज्योतिराव फुले हे एक मराठी लेखक तसेच समाजसेवक विचारवंत होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व त्या मार्फत त्यांनी लोकांचे अज्ञान दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले. त्यांनी शेतकरी व बहुजन समाजाच्या अनेक समस्या विचारांमध्ये घेऊन तसेच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षण गरजेचे आहे असे मानले. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे.

Mahatma Jyotirao Phule Information In Marathi

महात्मा ज्योतिराव फुले यांची संपूर्ण माहिती Mahatma Jyotirao Phule Information In Marathi

त्या काळामध्ये चूल आणि मूल एवढे स्त्रियांचे कार्य होते, त्यामुळे स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवले जायचे स्त्रियांना शिक्षण देऊ नये असे लोकांचे मत होते. परंतु काही लोक चांगल्या विचाराचे होते, त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना व मुलींना तसेच दलित वर्गाच्या लोकांना शिक्षक देण्यासाठी आपली स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन इतरांना शिक्षण देण्यासाठी तयार केले.

ज्योतिबा फुले यांचे जन्म व बालपण :

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. त्यांचे आजोबा हे शरीबा गोऱ्हे माधवराव पेशव्यांच्या दरबारामध्ये सजावटीचे काम करत असत, त्यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांचा व्यवसायामुळे त्यांना गोरे या आडनावा ऐवजी फुले म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले.

ज्योतिबांच्या आजोबांच्या मृत्यूनंतर ज्योतिबा फुले यांच्या काकांनी राणोजी यांनी 35 एकर जमीन स्वतः हस्तगत केली आणि त्यानंतर ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्याच्या व्यवसाय करू लागले. ज्योतिबा फुले हे केवळ नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे पालन पोषण हे सगुनाबाईने केले होते. त्यांच्या बालवयातच म्हणजे बाराव्या वर्षी ज्योतिबा यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला होता.

ज्योतिबा फुले यांचे शिक्षण :

महात्मा ज्योतिबा फुले हे सात वर्षाच्या असताना त्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये पाठवण्यात आले परंतु तेथे त्यांना जातीय भेदभाव याला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर त्यांना संस्थेतून बडतर्फही करण्यात आले; परंतु ज्योतिबा फुले हे बालपणापासूनच हुशार व्यक्तीचे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

नंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला व त्यांनी पाच-सहा वर्षातच आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्योतिबा फुले आपला अभ्यास अतिशय एकाग्र वृत्तीने मन लावून करत होते. त्यामुळे परीक्षेत सुद्धा ते पहिल्या क्रमांकावर येत होते.

शाळेमध्ये एक हुशार व शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून त्यांना ओळखले जायचे. पुण्यामध्ये कबीरपंथी फकीर येत होते, तेव्हा चांगले लिहायला वाचायला येणाऱ्या ज्योतिबांकडून कबीर पण ती फकीर रोज महात्मा कबीरांचा बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असतो. त्यामुळे ज्योतिरावांच्या मनावर कबीरांच्या विचारांची चांगलीच शिकवण मिळाली होती. त्यांचे अनेक दोहे पाठ झाले होते तसेच त्यातील एक नाना वर्ण एक गाय, एक रंग हे दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद…!

ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य :

महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एका कवितेची दिली आहे. आणि ती रचना आजही आपण ऐकत आलेलो आहोत ते म्हणजे…

विद्ये विना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नितीविना गती गेली,
गती विना वित्त गेले,
वित्तविना शूद्र खसले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.

बहुजन समाजाचे दारिद्र्य, अज्ञान व जातीभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शैक्षणिक कार्य हाती घेतले. त्यांनी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेमध्ये भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची सर्वात पहिली शाळा काढून तेथे शिक्षकाची जबाबदारी पार पाडली तसेच त्यांनी स्वतःच्या पत्नीवर एका शिक्षिकेची जबाबदारी सोपवली आणि त्यानंतर ज्योतिबा यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.

महात्मा फुले यांनी शिक्षणाची प्रेरणा ही अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. मेजर कँडी ह्या फुले यांच्या शाळेला पुस्तके पुरवत असत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याबरोबर अस्पृश्य मुलांसाठी सुद्धा शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा ही मावस बहीण सगुनाबाई यांच्याकडून घेतली.

ज्योतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेश भाषणे करीत तसेच ते शाळा शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने उपकरणे वापरावीत म्हणून शिक्षकांना नेहमी उत्तेजन देत असतात. महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला, त्या महाविद्यालयांमध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मनेत्तर विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण द्यावे अशी सुद्धा त्यांनी प्रार्थना केली होती.

सामाजिक कार्य :

महात्मा फुले यांच्या वाचनात जेव्हा मानवी “हक्क हे पुस्तक” आले हे पुस्तक फेमस पिन यांनी 1791 मध्ये लिहिले होते, त्याचा प्रभाव फुलांच्या मनावर झाला व त्यांच्या मनात सामाजिक ते पहिले अध्यक्ष व खजिनदार होते. त्यांनी वेदांना जुगारून हे कार्य हाती घेतले तसेच महात्मा फुले यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांची नेमणूक झाली आणि त्यांनी 19 स्त्रियांना सत्यशोधक समाजाचे कार्य वाटून दिले.

त्यावेळी सावित्रीबाई फुले एका कन्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या. दिनबंधू या प्रकाशाने सत्यशोधक चळवळीचे लेखन प्रकाशित करण्याचे काम केले होते. व ही माहिती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिला व न्यायापासून अत्याचारापासून गुलामगिरीतून शूद्रातील शूद्र समाजाची मुक्तता करणे अशी हक्काची जाणीव करून दिली.

महात्मा फुले यांचे लेखन साहित्य :

महात्मा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ लिहिला. तसेच त्यांनी मुखपत्र दिनबंधू हे साप्ताहिक चालवले. तुकारामांचे अभंगाचा खोल अभ्यास त्यांना होता. अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. तसेच सामाजिक विषमतेचे जागतिक भान त्यांनी ठेवून गुलामगिरी ग्रंथ लिहिला, जो अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला.

अस्पृश्य हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रकाशित झाला होता. याव्यतिरिक्त अनेक साहित्य रचना त्यांची आहे.

सन्मान :

  • महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाखाली अनेक संस्था महाराष्ट्र मध्ये कार्यरत आहेत.
  • महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते.
  • ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर 1995 साली आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले नावाचा चित्रपट काढला होता, त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे.

महात्मा फुले यांचा मृत्यू :

महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान थोर विचारवंत व्यक्तिमत्व होते. त्यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुणे येथे झाले.

FAQ

महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय आहे?

ज्योतिराव गोविंदराव फुले.

महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते?

चिमणाबाई.

फुले यांचा जन्म कधी झाला?

1827

महात्मा फुले यांचे वडील कशाचा व्यवसाय करत होते?

फुलांचा.

महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला?

28 नोव्हेंबर 1890 रोजी.

Leave a Comment