झेंडू फुलाची संपूर्ण माहिती Marigold Flower Information In Marathi

Marigold Flower Information In Marathi प्रत्येक फुलाचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर केला जात असतो. यावरून त्या फुलांचे वेगवेगळे महत्त्व व वैशिष्ट्य असते. झेंडूचे फुल हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे फुल असून, दसरा व दिवाळी या दोन सणांना या फुलांचा फार मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. या दोन सणांसाठी अतिशय उपयुक्त समजले जाणारे हे फुल दिसायला देखील अतिशय आकर्षक असते. त्याचबरोबर याचा सुगंध देखील खूपच छान असतो.

Marigold Flower Information In Marathi

झेंडू फुलाची संपूर्ण माहिती Marigold Flower Information In Marathi

हार बनवण्यासाठी मुख्यतः या फुलांचा वापर केला जातो, कारण या फुलाचा आकार अतिशय मोठा असतो. जेणेकरून हार अतिशय भरगच्च दिसतो. सोबतच हे फुल बऱ्याच कालावधीसाठी ताजे राहत असतात, व नाजूक नसल्यामुळे हातून ते पडत देखील नाहीत. या फुलांना मुख्यतः पिवळा व केशरी रंग प्राप्त झालेला असतो.

बाजारमध्ये मोठ्या प्रमाणावर विकले जाणारे हे फुल हार बनवुन देखील विकले जातात. या फुलांच्या बगीचा मध्ये गेले असता पिवळ्या व केशरी रंगांनी जणू सूर्याच्या तेजाची उधळण झालेली आहे असेच भासते. सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे हे फुल औषधी गुणधर्माने देखील युक्त आहे. हे फुल वर्षभर उगवू शकत असले, तरी देखील दसरा दिवाळीच्या काळामध्ये याला फुले येतील अशा रीतीने याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

जेणेकरून जास्तीत जास्त दर प्राप्त करून घेतला जाईल. या झेंडूचे विविध प्रकार पडतात, ज्यामध्ये आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू हे मुख्य प्रकार आहेत. या झेंडूच्या फुलाला अनेक नावाने ओळखले जाते. मारवाडी भाषेत हंजरी गजरा तर गुजराती भाषेमध्ये गलगोटा नावाने ओळखले जाणारे हे फुल इंग्रजी मध्ये मारीगोल्ड या नावाने सर्व प्रसिद्ध आहे. आजच्या भागामध्ये आपण या झेंडू फुला विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावझेंडू
प्रकारफुल
इंग्रजी नाव मॅरीगोल्ड
इतर नावेगलगोटा आणि हंजरी गजरा
शास्त्रीय नावटॅगीट्स
हायर क्लासिफिकेशनडेझी कुळ
कुटुंब किंवा कुळएस्टेरासी
मुख्य रंगपिवळा व केशरी
आकारमध्यम

झेंडूची ऐतिहासिक माहिती:

झेंडू ही वनस्पती अमेरिकेमध्ये शोधली गेली असे सांगितले जाते. मात्र याची सर्वप्रथम लागवड पोर्तुगीज लोकांनी केली होती. पूर्वीच्या काळापासूनच धार्मिक कार्यक्रम आणि औषधी गुणधर्म म्हणून झेंडूचा वापर केला जात आहे. स्पॅनिश लोकांनी अमेरिकेतून या वनस्पतीचे बियाणे स्पेन मध्ये नेऊन, तिथून संपूर्ण युरोपमध्ये प्रसारित केले. मोठ्या प्रमाणावर आर्थिक कारणाकरिता या वनस्पतीची लागवड विसाव्या शतका नंतरच करण्यात येऊ लागली.

झेंडूच्या प्रजाती:

झेंडू जसा जसा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रसारित होत गेला, त्याचप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती देखील निर्माण होऊ लागल्या. आज जगभरात प्रत्येक देशानुसार वेगवेगळ्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत. यामध्ये काही प्रजाती निसर्गतः तर काही प्रजाती मानवाने विकसित केलेल्या आहेत. जगभरात अनेक प्रजाती आढळून येत असल्या, तरी देखील भारतामध्ये मुख्यतः फ्रेंच झेंडू आणि आफ्रिकन झेंडू या दोन प्रजातींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असते.

झेंडूची लागवड:

मित्रांनो, झेंडू ही अशी वनस्पती आहे जी संपूर्ण वर्षभर आणि कोणत्याही जमिनीवर तसेच हवामानामध्ये लागवड केली जाऊ शकते. मात्र या फुलांना खऱ्या अर्थाने दसरा व दिवाळीच्या काळामध्ये चांगला दर मिळत असतो. इतर कालावधीमध्ये या फुलाची लागवड केली असता कमी दरामध्ये उत्पादन विकावे लागते, म्हणून अनेक शेतकरी वर्षभर या फुलाची लागवड करत नाहीत.

झेंडू वनस्पती कशी लागवड करावी:

झेंडू वनस्पतीच्या लागवडीकरिता शक्यतो रोपे पद्धत वापरली जाते. यामध्ये ट्रे मध्ये बियाणे टाकून रोपे बनवली जातात, व सरी काढून मुख्य शेतामध्ये त्याची पुनर्लागवड केली जाते. झेंडूची वनस्पती किमान कमरे इतकी उंच वाढत असल्यामुळे, त्यामध्ये योग्य अंतर देखील राखले जाते. जेणेकरून दोन वनस्पती एकमेकांमध्ये घुसणार नाहीत, व फुले तोडणी सोपी होईल.

झेंडू फुला बद्दल काही तथ्य माहिती:

  • झेंडूच्या फुलाला हिंदी मध्ये गेंदा या नावाने ओळखले जाते.
  • झेंडूच्या फुलाची लागवड जगातील सर्वच देशांमध्ये केली जात असली, तरी देखील आफ्रिका आणि आशिया या दोन खंडांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
  • झेंडू फुलांना मुख्यतः केसरी व पिवळा असे दोन रंग असले, तरी देखील या रंगाच्या विविध छटा या फुलांमध्ये आढळून येत असतात. ज्या प्रजातीनुसार भिन्न असतात
  • झेंडू फुलाचा प्रजनन व्यवस्थेनुसार यातील नर फुले व मादी फुले वेगवेगळी असतात.
  • या वनस्पतीला पाण्याची कमतरता पडली, तर फुलाचा रंग देखील बदलत असतो. पाण्याचा प्रमाणानुसार या फुलाचा रंग ठरत असतो.
  • आयुर्वेदामध्ये देखील झेंडूच्या फुलाचा उल्लेख केलेला असून, ते आरोग्यदायी म्हणून सिद्ध झालेले आहे.
  • झेंडूच्या फुलांपासून वेगवेगळ्या स्वरूपाचा रंग देखील बनवला जातो. ज्याचा वापर मुख्यतः कापड उद्योगांमध्ये कपड्यांना रंग देण्याकरिता केला जातो.

निष्कर्ष:

दिवाळी व दसरा आला की हमखास खरेदी केली जाणारी गोष्ट म्हणजे झेंडूचे फुल होय. या दिवशी अगदी वाहनांपासून घराच्या दरवाजाला लावण्यात येणाऱ्या तोरणापर्यंत मोठ्या प्रमाणावर या झेंडू फुलाचा वापर केला जात असतो. खास दसरा व दिवाळी करिता अनेक शेतकरी या पिकाची लागवड करत असतात. व त्यातून रग्गड नफा देखील कमवत असतात.

असे असले तरी देखील काही वर्षी या फुलांना अतिशय कमी दर मिळत असतो. त्याचबरोबर या फुलांना अळ्या धावण्याचे प्रमाण देखील जास्त असते, त्यामुळे मोजकेच शेतकरी या शेतीच्या मागे लागतात. जगभरात अनेक झेंडूच्या प्रजाती आढळत असल्या, तरी देखील आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू हे दोन प्रकार भारतामध्ये मुख्यतः लागवड केले जातात.

पिवळ्या व केशरी रंगांमध्ये येणारे हे फुल अतिशय उत्कृष्ट असून, आजच्या भागामध्ये आपण या फुलाविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ज्यामध्ये या फुलाच्या विविध प्रजाती, झेंडूचा इतिहास, त्याच्यासाठी आवश्यक असणारी जमीन व हवामान, या फुलांचे फायदे लागवडीची योग्य वेळ, झेंडू वाढवण्याची व काढण्याची योग्य पद्धत, झेंडू पिकाची घ्यावयाची काळजी, आणि या फुला विषयीची काही तथ्य माहिती बघितली आहे.

FAQ

झेंडूच्या फुलाला कोणाच्या नावाने ओळखले जाते?

झेंडू या फुलाला वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळे नाव आहेत. त्यामध्ये गुजराती भाषेत याला गलगोटा, तर मारवाडी भाषेमध्ये हंजरी गजरा या नावाने ओळखले जाते. सोबतच इंग्रजीमध्ये याचे नाव मारीगोल्ड असे आहे.

झेंडू या फुलाचा मुख्य रंग कोणता असतो?

भारतामध्ये मुख्यतः दोन रंगांमध्ये झेंडूची फुले आढळून येतात, यामध्ये केशरी व पिवळ्या या दोन रंगांचा समावेश आहे.

भारतामध्ये मुख्यतः झेंडू वनस्पतीच्या कोणत्या प्रजाती लागवड केल्या जातात?

झेंडू वनस्पतीच्या अनेक प्रजाती असल्या, तरी देखील भारतामध्ये मुख्यतः झेंडू वनस्पतीच्या आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू या दोन प्रजातींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

सर्वप्रथम झेंडू ही वनस्पती केव्हा व कोठे लागवड करण्यात आली होती?

सर्वप्रथम पोर्तुगीज लोकांनी अमेरिकेमध्ये झेंडूची पहिली लागवड केली होती, तो कालखंड १६ व्या शतकाचा होता.

झेंडू फुलाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?

झेंडूचे फुल कान दुखीच्या आजारावर अतिशय प्रभावी असून, याकरिता झेंडूच्या पानांचा रस कानामध्ये टाकला जातो. जेणेकरून वेदना कमी होते. त्याचबरोबर कोमल त्वचे करिता तसेच, दाह विरोधी गुणधर्म करिता झेंडूची फुले ओळखली जातात. सोबतच घराच्या आसपास झेंडूच्या रोपटे असेल, तर मलेरिया सारख्या आजारांचा देखील प्रादुर्भाव होत नाही. झेंडूच्या फुलांमध्ये विटामिन सी देखील बघितले जाते, त्यामुळे हृदयविकारावर देखील खूपच गुणकारी समजले जाते.

Leave a Comment