ओईल फ्री रोस्टेड चिकन oil free roasted chicken
नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो कसे आहात तुम्ही सगळे. आज काल सगळेच जण हेल्थ काँशियास झाले आहेत.पण डाएट करताना आपल्या जिभेचे चोचले कसे पुरवायचे हा प्रश्न सर्वांना पडतोच तर आज आपण एक अशीच चमचमीत पण healthy रेसिपी पाहणार आहोत .चला तर म आपण ऑइल फ्री रोस्टेड चिकन ची रेसिपी पाहुयात.
ओईल फ्री रोस्टेड चिकन
वेट लॉस करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. भाज्यांचे खूप सारे प्रोटीन या डिशमधून आपल्याला मिळतात.
ओईल फ्री रोस्टेड चिकन साहित्य ( oil free roasted chicken ingredients ) :
ह्या साहित्यामध्ये आपण 2 जणांसाठी ही रेसिपी बनवू शकतो.
250 ग्रॅम बोनलेस चिकन
चिकन मॅरीनेशन साठी साहित्य:
- 1 लिंबू
- 2 चमचे तंदुरी मसाला
- 2 चमचे धने पावडर
- 2 चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
- 1 चमचा लाल तिखट
- 2 चमचे आलं लसूण पेस्टचवीनुसार मीठ
- 1/2 लाल सिमला मिरची बारीक चिरून
- 1/2 पिवळी सिमला मिरची बारीक चिरून
- आवडीनुसार ब्रोकोली बारीक तुकडे करून.
- 10-12 लसूण पाकळ्या
- 2 चमचे काळी मिरी पावडर
- 2 चमचे चिलीफ्लेक्सअल्युमिनियम फॉइलही रेसिपी.
आपण सगळं साहित्य उपलब्ध असल्यास 40 मिनिटात बनवू शकतो.
ओईल फ्री रोस्टेड चिकन कृती ( oil free roasted chicken steps )
सर्वप्रथम बोनलेस चिकन ला चिरा मारून घ्या व त्यानंतर त्यामध्ये सगळे सुके मसाले टाकून घ्या. व आले लसूण पेस्ट, लिंबाचा रस टाकून सगळे मिक्स घ्या व कमीत कमी एक तास सगळे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या.
आता ब्रोकोली व सिमला मिरची कापून घ्या व लसूण बारीक चिरून घ्या (एकदम बरके काप) त्यानंतर तव्यावरती ड्राय रोस्ट करून घ्या.
मराठमोळी थालीपीठाची रेसिपी | thalipeeth recipe in marathi येथे वाचा
रोस्ट करताना त्यामध्ये मीठ व काळीमिरी पूड घालावी. तेलाचा किंवा बटरचा वापर करू नये.
आता अलुमीनीयम फाईल घेऊन त्यामध्ये या भाज्या टाकाव्यात व त्याचे पाकीट बनवून घ्यावे. तसेच चिकनही अलुमीनीयम फाईलमध्ये ठेवुन पॉकेट बनवून घ्यावे.
एक तवा गरम करून घ्यावा व त्यावर तयार पॉकेट ठेवावे व झाकण लावून 15 ते 20 मिनिटे रोस्ट करून घ्यावे. त्यानंतर चिकनचं पाकीट दहा मिनिटानंतर पलटून घ्यावे.
व्यवस्थित रोस्ट करून घ्यावे.अश्या प्रकारे तयार होईल आपले रोस्टेड चिकन .एका प्लेट मध्ये चिकन व रोस्टेड भाज्या काढून घ्या व गरमागरम सर्व्ह करा.
तुम्ही ही डिश पुदिना चटणी किंवा रायत्या बरोबर सर्व्ह करा.