मराठमोळी थालीपीठाची रेसिपी | thalipeeth recipe in marathi
नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो आज आपण अस्सल मराठमोळी थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत.थालिपीठ हा मराठी मातीतली अत्यंत खमंग , खुसखुशीत, खरपूस , पौष्टिक,चौरस आहारामध्ये मोडणारी रेसिपी आहे. ह्यामध्ये सर्व डाळींचा आणि कडधान्यांच्या पिठाचा समावेश असतो. त्यामुळे थालिपीठ खूप पौष्टिक आहार आहे.
मराठमोळी थालीपीठाची रेसिपी साहित्य thalipeeth recipe in marathi ingredients
4 जणांसाठी ह्या साहित्यात तुम्ही थालिपीठ बनवू शकता.
2 वाटी थालिपीठाची भाजणी
2 कांदे बारीक चिरून
1/2 कप कोथिंबीर बारीक चिरून
1/2 चमचा ओवा3 चमचे लाल तिखट
1 चमचा हळद
1 चमचा तीळ (तीळ तुम्हाला आवडत असतील तरच घालावे)चवीनुसार मीठ
1 कप गाजर किंवा कोबी किंवा इतर कुठलीही भाजी किसून घालावी.
मराठमोळी थालीपीठाची रेसिपी कृती ( thalipeeth recipe in marathi steps )
थालीपीठ तव्यावर थापण्यासाठी तेलही रेसिपी तुम्ही 20- 25 मिनीटात बनवू शकता.
सर्वप्रथम एका परातीत किंवा मोठ्या ताटामध्ये थालिपीठाची भाजणी घ्या.
त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा,तीळ, तिखट, मीठ, हळद ,घालून पीठ भिजवून घ्या.
पीठ जास्त घट्ट किंवा फार सैल भिजवू नका. आणि हे पीठ झाकून दहा मिनीट ठेवा.
नंतर तव्यावर एक चमचा तेल घालून थालिपिठाचा एक गोळा घेउन ओल्या हाताने पीठ व्यवस्थित थापावे.
ओईल फ्री रोस्टेड चिकन | oil free roasted chicken येथे वाचा
कडा पातळ थापाव्यात आणि थापून झाल्यावर चार ते पाच भोकं मध्ये पाडावीत आणि त्यात तेल सोडावे म्हबजे थालीपीठ व्यवस्तीत शिजेल. आता तव्यावर झाकण ठेवावे आणि मंद आचेवर थालीपीठ खरपूस भाजावे.
एका बाजूने सोनेरी रंगावर थालीपीठ भाजुन झाले की बाजू उलटवून दुसऱ्या बाजूने तेल टाकून खमंग भाजून घ्यावे. आपले मराठमोळे थालीपीठ तयार झाले आहे.
तयार झालेले खमंग खरपूस थालिपीठ लोण्याबरोबर किंवा sauce बरोबर सर्व्ह करा.