खेळाची संपूर्ण माहिती Sports Information In Marathi

Sports Information In Marathi अगदी झोपेत देखील खेळायला चल म्हटलं तरी कोणीही एका पायावर तयार होते, कारण खेळ हा प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचा विषय आहे. खेळ म्हणजे तरी काय तर, बुद्धी किंवा शरीराचे कस पणाला लावून आनंद घेत समोरच्याला हरवण्याचा प्रयत्न करणे.

Sports Information In Marathi

खेळाची संपूर्ण माहिती Sports Information In Marathi

खेळ कोण खेळत नाही? मुलगा असो, मुलगी असो, लहान किंवा मोठा प्रत्येक जण खेळामध्ये आनंद लुटतो. ज्या लोकांना खेळ खेळणे शक्य होत नाही ते खेळ बघत बघत त्याचा आस्वाद घेतात. अगदी आयुष्याच्या संध्याकाळचा आस्वाद घेणारे आजोबा देखील आपल्या नातवासोबत खेळत खेळत कधी लहान होऊन जातात हे त्यांनाही कळत नाही.

खेळाला वयाचे बंधन नसते हेच यावरून दिसून येते. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती तर येतेच, शिवाय व्यक्तीच्या मानसिक आरोग्याला देखील खूप मोठा फायदा होतो. खेळामुळे अनेक गुण विकसित होतात, संघटन कौशल्य, नेतृत्व गुण, शिस्त, धैर्य, एकाग्रता आणि प्रेरणा इत्यादी गुणांचा समावेश होतो.

शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून खेळ खेळणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, शाळेमध्ये खेळासाठी विशेष तासिका असतात. तो एक शिक्षणातील अमुलाग्र भाग झालेला आहे. खेळ स्पर्धात्मक असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची भावना जागृत होते, तसेच स्पर्धा करताना देखील आपण नियमांचे पालन करायला हवे याची जाणीव देखील विद्यार्थ्यांमध्ये होते.

आजच्या भागामध्ये आपण खेळ या विषयावर माहिती पाहणार आहोत…

नाव खेळ
प्रकार मनोरंजन
फायदेशारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, इत्यादी
ठिकाणानुसार प्रकारइनडोअर (बैठे) खेळ, आणि आउटडोअर (मैदानी) खेळ
खेळाडूंनुसार प्रकारएकल खेळ, आणि सांघिक खेळ

खेळामुळे मिळणारी शारीरिक तंदुरुस्ती:

खेळ आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे. मैदानी खेळ खेळताना आपल्या शरीरातील सर्व अवयवांचा वापर केला जातो, त्यामुळे आपला सर्वांगीण व्यायाम होतो. त्यामुळे खाल्लेले अन्न पचते आणि ते शरीराला लागते. परिणामी आपले शरीर सर्वांगांनी बळकट होते. दिसताना शरीर हडकुळे दिसत असले तरी देखील ते शरीर अतिशय काटक असते.

खेळामुळे आपल्याला शारीरिक शिस्त लाभते, जी आपल्याकडून नकळत आयुष्यभर पाळली जाते, आणि मरेपर्यंत खेळाडू व्यक्ती अगदी तंदुरुस्त राहतो. त्यात कुस्ती खेळणारा खेळाडू जर असेल तर त्याच्या व्यायाम प्रकारामुळे आणि शरीराला लाभलेल्या शिस्तीमुळे तो शेवटपर्यंत कुठल्याही व्याधी शिवाय आपले जीवन निरोगीपणे जगतो.

आजकाल पालक आपल्या मुलांना अभ्यासाचा वेळ वाया जात आहे म्हणून मैदानावर पाठवायला नको म्हणतात, त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, अतिसार यांसारखे आजार बळावू लागतात. आणि या सर्व गोष्टींचा अतिरेक झाला की, मुले कॉलेजला गेल्यावर जिम लावण्याचा सल्ला दिला जातो.

इतक्या वर्ष शरीराला कुठल्याही कष्टाची सवय नसल्यामुळे जिम मध्ये मुले अजूनच अशक्त आणि बारीक व्हायला लागतात. या गोष्टी टाळायच्या असतील तर लहानपणापासून मुलांच्या शरीराला खेळाची सवय लावली पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन मुले शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहतील.

खेळांचे प्रकार:

जगभरात भरपूर प्रकारचे खेळ खेळले जातात. एकट्या भारतात देखील मोजता येणार नाहीत इतके खेळ सापडतील. ते खेळ खेळण्याच्या प्रकारावरून त्यांचे विविध प्रकार पडतात. त्यामध्ये सांघिक खेळ, एकल खेळ, मैदानी खेळ, बैठे खेळ, साधनांशिवाय खेळ, साधनयुक्त खेळ, शारीरिक खेळ, बौद्धिक खेळ, घरगुती खेळ आणि व्यावसायिक खेळ इत्यादी प्रकार पडतात.

खेळांचा इतिहास:

खेळांचा इतिहास हा मानवाच्या उत्क्रांती इतकाच जुना आहे असे म्हटले जाते, मात्र खेळा संदर्भातली अश्मयुगीन किंवा त्यानंतरच्या लगतच्या काळाचे स्पष्ट उल्लेख आढळून येत नाहीत. मित्रांनो, आज आधुनिक रित्या खेळल्या जाणाऱ्या बऱ्याचशा खेळांचा उगम हा ग्रीस मध्ये झाला असल्याचे सांगण्यात येते.

बऱ्याचशा खेळावर आजही ग्रीक लष्करी संस्कृतीचा प्रभाव पडलेला आढळून येतो. मित्रांनो, ग्रीस आणि खेळ यांचे इतके अतूट नाते आहे की ग्रीसने खेळांची उत्पत्ती केली, आणि खेळामुळे ग्रीस संस्कृती उदयास आली असे म्हटले जाते.

ग्रीसमध्ये खेळायला इतके महत्व दिले जाते की तेथे त्यांनी ऑलम्पिक खेळांचे आयोजन करण्यास सुरू केले, जे ग्रीसमधील ओलंपिया या शहरापासून सुरू झाले. त्यावेळी दर चार वर्षानंतर या खेळांचे आयोजन केले जात असे, ग्रीक लोकांनी सर्वप्रथम खेळाला स्पर्धात्मक दर्जा दिला आणि विविध ठिकाणांवरील लोकांना एकत्र करून ते स्पर्धा आयोजित करू लागले. पूर्वी अनेक देशांमध्ये केवळ मनोरंजनासाठी खेळला जाणारा खेळ मोठ्या प्रमाणावर स्पर्धात्मक झाला, ते या ग्रीक लोकांमुळेच…

आंतरराष्ट्रीय खेळाडूंची निवड:

एखाद्या खेळाची आवड असणारा खेळाडू नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची स्वप्ने बाळगून असतो. त्यासाठी मात्र उठला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला निघाला असे होत नाही, अगदी शालेय वयापासूनच त्या खेळामध्ये प्राविण्य मिळवणे गरजेचे असते. तेव्हा कुठेतरी एक एक पातळी ओलांडत तो खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतो.

तुम्हाला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर अगदी लहानपणापासूनच तुम्ही त्या खेळामध्ये सहभागी होत चला, जेणेकरून तुम्ही आंतरराष्ट्रीय संघामध्ये खेळू शकाल.

निष्कर्ष:

आजच्या भागामध्ये आपण खेळाविषयी माहिती पाहिली. खेळ हे चराचरातील प्रत्येकच जीवाला आनंद प्रदान करण्याचे काम करतात. लहान मुलापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण एक तर खेळ खेळण्याचा किंवा खेळ बघण्याचा आस्वाद घेत असतात.

अगदी प्राणी देखील आनंदासाठी खेळ खेळताना आपण बघतो. खेळामुळे आपले मन प्रसन्न होण्यास मदत मिळते, तसेच आपल्याला शारीरिक आणि मानसिक समाधान देखील लाभते. भारतामध्ये पूर्वापार अनेक प्रकारचे खेळ खेळत आलेले आहेत, यामध्ये हुतुतू, लंगडी, पकडापकडी, लपाछपी, कुस्ती, यांसारख्या खेळांचा समावेश होतो. ज्यामध्ये शारीरिक कसबासोबतच बुद्धीचा देखील पण लागतो.

आज खेळ कमी होत चालले असले तरी देखील खेळाचे खरे शौकीन आज देखील हा नाद जपताना दिसतात. मित्रांनो, तुम्हाला खेळ खेळण्यास वेळ मिळत नसेल तरी अगदी थोडेसे काही मिनिटे वेळ काढून किमान खेळ बघायला तरी हवा. त्यायोगे तरी तुमचे मैदानाकडे चक्कर मारणे होईल, आणि हळूहळू तुम्हाला देखील खेळ खेळण्याची आवड निर्माण होईल.

FAQ

खेळामुळे कुठली कुठली मूल्य विकसित होण्यास मदत होते?

खेळामुळे सर्वप्रथम खेळाडूंमध्ये नेतृत्व गुण विकसित होतात, त्याचबरोबर  चिकाटी, सर्व समावेशकता, इतरांचा आदर, टीम स्पिरिट इत्यादी प्रकारचे गुण मूल्य विकसित होतात.

खेळाला आपल्या दैनंदिन जीवनात इतके महत्त्व का आहे?

खेळामुळे खेळ खेळणाऱ्या च्या केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक स्तरावरील आरोग्यामध्ये देखील खूप मोठा फायदा होतो, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खेळाचा सहभाग हा असायलाच हवा.

व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्या प्रकारचे खेळ सर्वात जास्त उपयुक्त असतात?

व्यक्तिमत्व विकासासाठी सांघिक प्रकारातले मैदानी खेळ खेळणे अधिक फायदेशीर ठरते.

शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती खेळ खेळू शकतो का?

शारीरिक दृष्ट्या विकलांग असणाऱ्या व्यक्तींना बैठे प्रकारातील खेळ खेळणे शक्य आहे, तसेच आज-काल व्हीलचेअर क्रिकेट सारख्या संकल्पनांमुळे दिव्यांग लोक सुद्धा मैदानी खेळाचा आस्वाद घेऊ शकतात.

भारतातील काही पारंपारिक खेळ कोणते आहेत?

भारतामध्ये लंगडी, हुतुतू, शिवाशिवी, लपाछपी, पकडापकडी, कुस्ती इत्यादी पारंपरिक खेळ आहेत.

आजच्या भागामध्ये आपण खेळ या विषयावर यथायोग्य माहिती पाहिली, ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा. तसेच आपले तरी मित्र-मैत्रिणींना या माहितीचा आस्वाद घेता यासाठी त्यांना देखील ही माहिती शेअर करा.

 धन्यवाद…

Leave a Comment