Chess Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो खेळामध्ये मुख्यतः दोन प्रकार असतात ते म्हणजे मैदानी खेळ आणि घरगुती खेळ आज आपण अशाच एका घरगुती खेळाबद्दल माहिती पाहणार आहोत तो म्हणजे बुद्धिबळ. हा असा एक खेळ आहे जो माणसाची बौद्धिक पातळी विकसित करतो या खेळामध्ये आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करून खेळावे लागते म्हणून या खेळाला बुद्धिबळ हे नाव दिले आहे.
बुद्धिबळ खेळाची संपूर्ण माहिती Chess Game Information In Marathi
हा खेळ खेळण्यासाठी खेळाडूकडे उत्तम बुद्धिमत्ता व चांगल्या प्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक असते. हा खेळ खूप प्राचीन असून या खेळाची सुरुवात भारतामध्ये झाली आहे. पूर्वी हा खेळ मनोरंजनासाठी खेळला जात होता परंतु आता तो संपूर्ण जगभरामध्ये खेळला जात आहेत बुद्धिबळ हा खेळ रशिया या देशाचा राष्ट्रीय खेळ आहेत हा खेळ दोन खेळाडूंमध्ये खेळला जातो.
आता आपण या खेळाच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात या खेळाचा इतिहास खूप जुना आहे. त्यामुळे हा खेळ नेमका केव्हा सुरू झाला याबद्दल काहीही सांगता येणे कठीणच आहे परंतु हे खरे आहे की या खेळाची सुरुवात भारतात झाली हे सिद्ध झाले आहे.
रॉयल एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष सर विल्यम जोन्स व ऑक्सफर्डचे टॉमस हाईड तसेच मरी इत्यादी अनेक संशोधकांनी बुद्धिबळाचा उगम भारतातच झाला असल्याचे सिद्ध केले आहे.
15 व्या शतकामध्ये हा खेळ युरोप ,ग्रीस, स्पॅनिश, आयबेरिया आणि रशिया या देशांमध्ये पसरला भारतात सहाव्या शतकापासून बुद्धीबळ हा खेळला जात असून या खेळाला त्या वेळेस चतुरंग म्हणून ओळखले जात होते. 1975 मध्ये या खेळांमध्ये काही बदल करण्यात आले आणि ते बदल अजूनही तसेच आहेत.
भारतातील हा खेळ इराण अरबस्तान मार्गे युरोप मध्ये तसेच काश्मीर मार्गे चीन मध्ये जाऊन कोरिया जपान इत्यादी ठिकाणी पसरला भारतामध्ये अद्यापही या खेळाला शतरंज किंवा चतुरंग या नावानेही ओळखले जाते.
20 जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा केला जातो बुद्धिबळ या खेळाची चॅम्पियनशिप 1887 पासून सुरू झाली आपल्या भारतातील सर्वात लोकप्रिय बुद्धिबळ खेळाडू विश्वनाथन आनंद हे आहेत.
बुद्धिबळ खेळण्यासाठी आपल्याला एक लाकडी चौरस ठोकळा लागतो या ठोकळ्यावर 8 उभे स्तंभ आणि आठ आडव्या पंक्ती अशाप्रकारे एकूण 64 लहान चौरस असतात आणि हे चौरस अनुक्रमे पांढऱ्या आणि काळ्या रंगाने रंगवलेले असतात. तसेच या खेळांमध्ये 16 काळ्या सोंगट्या व 16 पांढऱ्या सोंगट्या असतात या सोळा सोंगट्यांमध्ये 8 प्यादे,2 हत्ती, 2 ऊंट ,2 घोडे,1 राजा आणि 1 वजीर अशा प्रकारच्या त्या सोंगट्या असतात.
या खेळा मध्ये फक्त दोन खेळाडू खेळू शकतात त्यापैकी एका खेळाडूला 16 काळ्या सोंगट्या दिल्या जातात व दुसऱ्या खेळाडूला 16 पांढऱ्या सोंगट्या दिल्या जातात. ज्याच्याकडे पांढऱ्या सोंगट्या असतात तो पहिली चाल करतो म्हणजे तो खेळाची सुरुवात करतो.
हा खेळ म्हणजे समोरील खेळाडूच्या राजाला मात देणे म्हणजे त्याला खेळाच्या भाषेत चेकमेट असे म्हणतात व प्रत्येक खेळाडूने आपल्या राजाच्या बचावासाठी उर्वरित सोंगट्याचा उपयोग करून विशिष्ट अशी चाल खेळावी लागते. व आपल्या राजाला वाचवायचे असते.
प्यादे :-
प्यादे हे नेहमी सरळ एक घर चालत असतात.पण जेव्हा त्याच्या तीरप्या बाजूला समोरच्या खेळाडूची सोंगटी आली तर तो तिरपे चालू शकतो. प्यादे हे एका प्रकारे शिपाया सारखे काम करतात. पहिल्या चालीत नेहमी आपण त्याला दोन चौरस हलवू शकतो. तो नेहमी पुढे एक घर जातो पण मागे येऊ शकत नाही.
हत्ती:-
हत्ती हा फक्त आडवी आणि उभी चाल चालू शकतो मग ती चाल कितीही घरांची असू शकते म्हणजेच हत्ती त्याच्या इच्छेनुसार कितीही चौरस चालू शकतो हत्ती हा तिरपी चाल चालू शकत नाही.
उंट:-
उंट हा कितीही चौरस तिरपी चाल चालू शकतो. तिरपी घरेही एकाच रंगाचे असल्याने पा पांढऱ्या घरातले उंट हे पांढऱ्या घरातूनच फिरतात व काळ्या रंगाचे उंट हे काळ्या रंगातील घरांनी फिरतात.
घोडा:-
घोडा हा इतरांपेक्षा वेगळी चाल चालत असतो तो कोणत्याही दिशेने अडीच घरे चालतो म्हणजे कुठल्याही दिशेला दोन घर सरळ आणि एक घर आडवी चाल करू शकतो.
राजा:-
जोपर्यंत पुढील खेळाडू राजाला चेकमेट देत नाही तोपर्यंत राजा कोणतीही चाल करू शकत नाही जेव्हा पुढील खेळाडू राजाला चेकमेट देतो तेव्हा तो एक घर चाल करू शकतो. म्हणजे राजा वर खाली बाजूला तिरपे अशाप्रकारे एक घर चालू शकतो.
राणी:-
राणी ही कितीही चौरस घरे आडवी उभी आणि तिरपी चालू शकते.
वजीर;- वजीर हा राणी प्रमाणेच कितीही चौरस घरे आडवी-उभी आणि तिरपी चालू शकतो. त्यामुळे या खेळामध्ये वजीर आणि राणी हे दोन शक्तिशाली असतात.
आता आपण बुद्धिबळ कसे खेळायचे हे पाहणार आहोत. आपण खेळण्यासाठी जो चौरस घेतलेला असतो त्या चौरसावर समोरा समोर काळा व पांढरा सोप्या लावून घेणे. त्याने हे सर्व समोरच्या बाजूला लावून घेणे दोन हाती हे दोन्ही बाजूच्या कडेच्या चौरसात असतात त्याच्या शेजारी घोडा असतो घोड्याच्या शेजारी उंट असतात पांढरा वजीर हा पांढरा घरात असतो व समोरच्या घरातील काळा वजीर हा काळ्या घरात ठेवला जातो.
खेळाची सुरुवात करताना पांढऱ्या सोंगट्या ज्याच्या असतात त्याची पहिली चाल असते. पहिली चाल खेळताना नेहमी तो दोन घर चालतो त्यानंतर तो एकच घर चालू शकतो. प्रत्येक सोंगटीची वेगळी चाल चालत असते. हत्ती उंट हे पुढे चौरस रिकामा असेल तरच पुढे जाऊ शकतात तर घोडा हा एकमेव आहे की पुढे सोंगटी असली तरी तो उडी मारून पुढे जाऊ शकतो.
हत्ती हा नेहमी आडव्या आणि उभ्या चौरसात चालू शकतो. तर उंट पांढऱ्या घरात असेल तर पांढरा घराच्या दिशेने तिरकी चाल व काळ्या घरात असेल तर काळ्या घराच्या दिशेने तिरकी चाल चालू शकतो. उंट हा आडवि व उभी चाल चालू शकत नाही.
राजाला जर प्रतिस्पर्ध्यांनी चेकमेट केलं तरीही राजा फक्त एक घर चौरस चालू शकतो मग तो उभी असो, आडवी असो, तिरपी असो पण तो एकच घर चाल करू शकतो.वजीर हा खूप शक्तिशाली सोंगटी आहे .
तो उभी ,आडवी, तिरकी अशी कितीही चौरस घरं चालू शकतो. जेव्हा प्रतिस्पर्धी राजाला अडकून ठेवतो म्हणजे चेकमेट देतो व राजा त्याच्यातून सुटू शकत नाही म्हणजे प्रतिस्पर्धी खेळाडू राजावर मात करतो तेव्हा तो खेळाडू डाव जिंकतो व हा खेळ संपतो व चेकमेट दिलेला खेळाडू हा विजयी होतो.
बुद्धिबळ या खेळाचे अनेक प्रकारे फायदे होतात ते म्हणजे या खेळामुळे आपली एकाग्रता वाढते, तसेच तांत्रिक तार्किक दृष्टिकोनही वाढतो ,आपल्या विचारांमध्ये व निर्णयांमध्ये स्पष्टता निर्माण होऊन आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये सर्वोत्तम निर्णय घेण्याचे कौशल्य प्राप्त होते. आपल्या मध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होऊन मेंदूचा व्यायामही होतो व आत्मविश्वास निर्माण होतो.
शांत नवा मध्ये शांत राहण्यास मदत होते व शैक्षणिक क्षेत्र व नोकरीमध्ये सुद्धा याचा फायदा होतो म्हणजे आपल्याला नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळविण्याकरिता राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या तीन मध्ये यावे लागते स्किझोफ्रेनिया या रोगावर उपचार होण्यास मदत होते .
भारतीय खेळाडू हे कुठल्याच खेळत मागे राहिले नाहीत.बुद्धिबळ या खेळातही आपल्या देशातील दिग्गज बुद्धिबळ खेळाडू आहेत .यांमध्ये पुरुषांबरोबर महिला देखील सामील आहेत .
विश्वनाथन आनंद, सूर्य शेखर गांगुली, परिमार्जन नेगी, पेंताला हरिकृष्ण, बास्करण आधीबण इत्यादी पुरुष खेळाडू असून कोनेरू हम्पी, पद्मिनी रौत, ईशा करवडे, द्रोनावल्ली हरिका ,तानिया सचदेव इत्यादी महिला खेळाडू आहेत.