Atyapatya Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये (पाटीत) अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ म्हणजे आट्यापाट्या!!! आज आपण या खेळाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. संत तुकारामाच्या काळी हा खेळ प्रचलित होता, असे त्याच्या अभंगातील वर्णनावरून दिसते.
आट्यापाट्या खेळाची संपूर्ण माहिती Atyapatya Game Information In Marathi
आट्यापाट्या हा भारतातील एक प्राचीन पारंपरिक खेळ असून तो प्रामुख्याने ग्रामीण भागात खेळला जातो हा खेळ महाराष्ट्र राज्यामध्ये अधिक लोकप्रिय आहे या खेळाला फेंटसचा खेळ असेही संबोधले जाते.
हा खेळ मनोरंजक, भरपूर व्यायाम करून देणारा व बिनखर्ची आहे. वैयक्तिक चापल्य व सांघिक कौशल्य यांची कसोटी यात लागते. तसेच शारीरिक व मानसिक अनुसंधानाचेही शिक्षण मिळते.मराठी मातीत खेळला जाणारा आट्यापाट्या हा खेळ आता तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाईल, त्या दृष्टीने अनेक प्रयत्न सुरू आहे.
हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जावा, यासाठी अनेक बदल करण्यात आले आहे. खेळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यामध्ये काळानुसार परिवर्तन आणण्याची आवश्यकता असते. गेल्या काही वर्षांपासून कॅरम, खो-खो, मल्लखांब यांसारख्या स्पर्धानी काळाची गरज ओळखून युवा पिढीला आकर्षित करणाऱ्या नियमांसह तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून खेळाचा प्रसार केला.
मात्र असंख्य शतकांहून पुरातन असलेला ‘आटय़ापाटय़ा’ हा खेळ या स्पर्धेत मागे पडला व आता हळूहळू शहरी भागातील मैदानातून दिसेनासाच झाल्यामुळे तो वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे.
गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये या खेळाचा समावेश असला तरी मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या प्रमुख भागांत या खेळाच्या स्पर्धा क्वचितच होताना आढळतात. त्याशिवाय संघटना व माजी खेळाडूंतर्फे या खेळाच्या प्रसारासाठी ठोस पावले उचलली न गेल्यामुळेच एके काळी ‘मैदानी खेळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळ आता हरवत चालला आहे.
मागील वर्षी राज्य अजिंक्यपद आटय़ापाटय़ा स्पर्धा शेगावला झाली, तर राष्ट्रीय स्पर्धा बेंगळूरु येथे आयोजित करण्यात आली होती. त्याशिवाय १९९८-९९ मध्ये या खेळाचा शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत समावेश करण्यात आला असून आतापर्यंत २७ खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे.
खेळातील जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३२ जिल्हे व २८ राज्यांत हा खेळ खेळला जातो. उन्मेश शिंदे, वाशिम व गंगासागर शिंदे, उस्मानाबाद यांनी या वर्षांचे छत्रपती पुरस्कार मिळवले असून या खेळाच्या नव्या हंगामाला जून-जुलैपासून सुरुवात होणार आहे. विदर्भ, परभणी, यवतमाळ, शेगाव, औरंगाबाद येथे या खेळाच्या स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर आयोजित केल्या जातात.
नागपूर येथे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात महाराष्ट्र आटय़ापाटय़ा महामंडळाचे मुख्यालय आहे. एकंदर खेडय़ापाडय़ांत आटय़ापाटय़ाच्या स्पर्धाचे आयोजन नियमितपणे होत असले तरी इतर मैदानी खेळांच्या तुलनेत आटय़ापाटय़ाला दुय्यम स्थानच मिळत आहे.
आटापाट्या हा खेळ दोन संघांत खेळला जातो. त्याचे क्रीडांगण सुमारे ९० फूट लांब बाय ११ फूट रुंद या आकारमानाचे असते. ते मैदान एक उभी पाटी (सुरपाटी) आणि नऊ आडव्या पाट्यांनी (संरक्षण पाट्यांनी) विभागलेले असते. आटापाट्याच्या खेळात एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूंची ठरावीक पाटीत अडवणूक करतात. व त्यांना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी दुसऱ्या संघातील खेळाडू बचाव करत हुलकावणी देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या खेळात अडवणूक, पाठशिवणी, हुलकावणी या तीनही तंत्रांचा वापर होतो.
आट्या पाट्या या खेळाचा इतिहास
पूर्वी या खेळासाठी सर्वमान्य नियम नव्हते. पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने हा खेळ सुधारून त्याचे १९१४ मध्ये अधिकृत व नियमबद्ध अखिल भारतीय सामने सुरू केले. १९१८ मध्ये बडोद्याच्या हिंदविजय जिमखान्यानेही सामन्यांसाठी वेगळे नियम केले. १९३५ पासून अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने या खेळाला आधुनिक, आकर्षक, संघटित व शिस्तबद्ध स्वरूप दिले.
एकेरी आट्यापाट्यांची नवीन पद्धत याच मंडळाने सुरू केली. आज त्यांच्या नियमांनुसारच हा खेळ सर्वत्र खेळला जातो. महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने खेळाच्या विकासासाठी विभागीय स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धे मध्ये महाराष्ट्र ,कर्नाटक ,गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातील खेळाडूंनी देखील सहभाग घेतला. मग त्यानंतर आशियाई खेळाच्या वेळी इसवीसन 1982 मध्ये आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली.
आट्यापाट्या हा खेळ मैदानी खेळ असल्यामुळे हा खेळ मैदानावर खेळला जातो आणि या खेळाच्या मैदानाची विशिष्ट प्रकारे रचना केलेली असते. या खेळाच्या मैदानाचा आकार 11 फूट रुंद आणि 90 फूट लांब असतो .या खेळांमध्ये एक उभी पाटी असते. जी 90 फूट लांब असते आणि त्या पाटिवर आडव्या नऊ पाट्या असतात .त्या खेळाच्या मैदानाच्या रुंदी एवढ्या असतात.
या मैदानावरील उभ्या पाटिला सुरपाटी म्हणून ओळखले जाते. आणि मैदानावरील आडव्या पाट्यांना संरक्षक पाट्या म्हणतात. या खेळांमध्ये खेळ ज्या पाटी पासून सुरु होतो त्या पाटिला कपाळपाटी असे म्हणतात आणि ज्या ठिकाणी खेळ संपतो त्या पाटिला लोणी पाटी असे म्हणतात .मध्यवर्ती उभी पाटी म्हणजे सुरपाटी प्रत्येक 9 पाट्याना समान भागांमध्ये विभागते तसेच या खेळाच्या मैदानाभोवती 10 फूट मोकळी जागा असते.
आट्यापाट्या हा असा खेळ आहे जर दोन रंगांच्या मध्ये खेळला जातो आणि या दोन संघांमध्ये प्रत्येकी नऊ खेळाडू असतात.
आट्यापाट्या हा खेळ कसा खेळला जातो–
या खेळामध्ये २ संघ एकमेका विरुद्ध खेळतात आणि प्रत्येक संघामध्ये ९ खेळाडू असतात एक संघ हल्ला करणारा असतो आणि एक संघ बचाव करणारा असतो. कोणता संघ बचाव करणार आणि कोणता संघ हल्ला करणार हे ओलीसुखी टकून ठरवले जाते.
या खेळामध्ये उभी एक मोठी पाटी असते आणि त्यावर आडव्या ९ पाट्या असतात या ९ पाट्यांवर बचावकार्य करणाऱ्या संघाचे खेळाडू उभे असतात आणि दुसऱ्या संघातील हल्ला करणारे २ खेळाडू कपाळपाटी म्हणजेच सुरुवातीच्या पाटीजवळ उभे असतात.
एकदा खेळाला सुरुवात झाली कि हल्ला करणारे खेळाडू मैदानावरील सर्व पाटया ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत असतात पण बचाव कार्य करणारे खेळाडू त्यांना स्पर्श करून किंवा अडवून बाद करण्याचा प्रयत्न करत असतात पण हल्ला करणाऱ्या खेळाडूंनी जर त्यांच्या हातून निसटून जावून लोणपाटी ओलांडली तर त्यांचे गुण वाढतात आणि खेळाडू बाद होत नाही तो परत खेळण्यास पात्र ठरतो.
आट्या पाट्या या खेळाचे नियम –
- आठ्या पाट्या या खेळामध्ये चार डावांचा समावेश आहे, प्रत्येक डावाचा कालावधी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावाच्या शेवटी ५ मिनिटांचा मध्यांतर असतो किंवा ५ मिनिटांची विश्रांतीची वेळ दिलेली असते.
- जे पाट्या ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यांना हल्लेखोर म्हणतात
- प्रत्येक संघात ९ खेळाडू असतात आणि प्रत्येक खेळात २ डाव असतात.
- बचावकर्ते प्रत्येक पाटीवर समोरील खंदकाकडे तोंड करून उभे राहतील जेणे करून त्यंना हल्ला करण्यास येणाऱ्या खेळाडूला रीखता येथील.
- हल्ला करणाऱ्या खेळाडूने जर सर्व पाट्या ओलांडल्या की लोना गोल झाला असे म्हणतात.
- नाबाद असलेले सर्व हल्लेखोर समोरच्या पाटीवर (कपाळपाटी) जातील आणि पुन्हा ते आपला डाव चालू करतील म्हणजेच हल्ला करतील.
- २ डावांमध्ये कोणता पक्ष अधिक गुण मिळवतो तो खेळ जिंकतो.
सध्या झालेल्या आट्या पाट्या स्पर्धा
भुटकळ आट्या पाट्या असोसिएशन आणि कर्नाटक आठ्या पाट्या असोसिएशन दावणगेरे यांनी संयुक्तपणे २०१३ ‘म भारतातील कर्नाटक राज्यातील भटकळ येथे राष्ट्रीय स्तरावर आठ्या पाट्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.