Vitti-Dandu Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आपल्या लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळले आहोत. बैठे खेळ व मैदानी खेळही खेळले आहोत. आंधळी कोशिंबीर ,टिक्कर का पाणी, डोंगर पाणी, डब्बा एक्सप्रेस, पतंग उडविणे,गोट्या,भवरा, लपाछपी, विषामृत. अशी नावे व हे खेळ आत्ताच्या मुलांना माहितही नाही. तर चला आज आपण अशाच एका खेळाची सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत.
विटी-दांडू खेळाची संपूर्ण माहिती Vitti-Dandu Game Information In Marathi
तो खेळ म्हणजे “विटी-दांडू”. विटी-दांडू हा खेळ आपल्या मराठी मातीत पूर्वीपासून खेळला जात आहे .हा खेळ शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात खेळला जात होता. एक लाकडी दांडे असतो व लाकडा पासून तयार केलेली विटी असते असा हा विटी-दांडू खेळ खूप पारंपारिक व मजेशीर आहे. पूर्वी टीव्ही व मोबाईल हे फारसे नव्हते. त्यामुळे त्या काळात मुले हे खेळ आवडीने खेळत होते.
तसेच या खेळांसाठी फारशा साधनांची गरजही लागत नसायची, सवंगडी जमले की खेळ सुरू व्हायचे. या खेळात व्यायाम व मनोरंजन या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला जातो .प्रत्येकाने आपल्या लहानपणी हा खेळ नक्कीच खेळला असेल .
पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की, मुलांची लगबग सुरू व्हायची खेळाची मैदाने तयार करणे, विटी-दांडू तयार करणे, क्रिकेट खेळण्यासाठी बॉल ,बॅट व स्टंप तयार करणे. परंतु आता काळाच्या ओघाबरोबर सर्वच गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. त्यांना खेळही अपवाद नाहीत.
आजकालच्या बैठ्या खेळांची व मैदानी खेळांची जागा व्हिडिओ गेम ,मोबाईल व टीव्ही यांसारख्या वस्तूंनी घेतली आहे. त्यामुळे बाकीच्या खेळांपेक्षा विटी-दांडू हा खेळ शहरातून केव्हाच बाद झाला असून आता ग्रामीण भागात अजूनही हद्दपार होत चालला आहे. बाकीच्या खेळापेक्षा विटी-दांडू या खेळाचे महत्त्व खूपच कमी झाले आहे
.विटी आणि दांडू या खेळात विटी आणि दांडू या दोन गोष्टी लागतात. या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरूपात वापरले जाते व विटिसाठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते. हा खेळ वैयक्तिक व संघ करूनही खेळता येतो.
या खेळात खेळाडूंची मर्यादा नसते. हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला फक्त शून्य रुपये खर्च येतो .म्हणजे हा खेळ दुसऱ्या खेळांसारखा खर्चिक नाही. या खेळाला दुसऱ्या खेळासारखे असे ठराविक मैदान लागत नाही.
कोणत्याही मोकळ्या जागेत आपण विटी दांडू खेळ खेळू शकतो .विटी आणि दांडू हा खेळ भारतात खूप प्राचीन काळापासून खेळला जात आहे. हा खेळ शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जात होता. तसेच राम-लक्ष्मण ,कौरव-पांडव व कृष्ण यांनीही हा खेळ खेळला आहे.
यादव काळातील लीळाचरित्रात या खेळाचे वर्णन केलेले आहे. तसेच ज्ञानेश्वर, एकनाथ व तुकाराम या संतांच्या कवितेत व अभंगातही या खेळाचा उल्लेख आहे. हा खेळ भारतामध्ये 2500 वर्षांपासून खेळला जात होता. म्हणजे हा खेळ किती प्राचीन आहे हे यावरूनच आपणास समजते.
हा खेळ भारतामध्ये सर्व भागांमध्ये खेळला जातो. पण विशेष करून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हा खेळ खूप आवडीने खेळला जातो. उत्तर भारतामध्ये या खेळाला गुल्ली – दंडा किंवा गिल्ली – दंडा या नावाने ओळखले जाते .म्हणजे छोट्या आकाराची एक लाकडी भाग ज्याला महाराष्ट्रामध्ये आपण विटी असे म्हणतो तर दंडा म्हणजे दांडू.
आता आपण विटी दांडू कसा खेळतात व त्यासाठी काय साहित्य लागतं याची माहिती घेणार आहोत. विटी दांडू हा खेळ खेळण्यासाठी विशेष अशा मैदानाची गरज नसते. कुठल्याही मोकळ्या जागेत आपण विटी-दांडू हा खेळ खेळू शकतो. तसेच विटी-दांडू हा खेळ खेळण्यासाठी फक्त एक विटी आणि एक दांडू या दोनच गोष्टींची आपल्याला गरज असते .
तर चला ,आपण पाहूया विटी आणि दांडू कसे तयार करतात. एक विटी ज्याला आपण गुल्ली असे म्हणतो. विटी ही 5 ते 13 सेंटीमीटर लांबीची आणि तिचा व्यास 2 ते 3 मीटर व्यास असतो. साध्या भाषेत सांगायचं झालं की, साधारणतः एक वीत किंवा त्याहूनही कमी लांबीचा लाकडाचा निमुळता पण पायाच्या अंगठ्याच्या जाडिइतका तुकडा म्हणजे आपली विटी.
दांडू ची लांबी साधारण ते 40 ते 45 सेंटिमीटर लांब असते व त्याचा व्यास तीन ते चार मीटर असतो दांडू हा आपल्याला मुठीत धरता येईल इतका असतो. दांडू चा आकार हा बासरी सारखा भासतो. विटि तयार करताना दोन्ही बाजूंनी या लाकडाला निमुळते अशी टोके काढली जातात. म्हणजे दोन्ही बाजूंचे टिके ही शिसपेन्सिल सारखी दिसतात.
हा खेळ खेळण्याच्या आधी जमिनीवर एक छोटा खड्डा खणला जातो व त्यावर विटी आडवी ठेवतात. या खड्ड्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत. जसे की, गद, गली, गल वगैरे. हा खेळ कितीही खेळाडू खेळू शकतात. हा खेळ सुरू करताना पहिल्यांदा कोणत्या संघाने विटी तोलायची आहे. यासाठी टॉस केला जातो.
पूर्वीच्या काळी हा टॉस खापराचा किंवा चपटी दगडाला एका बाजूला थुकी लावून केला जात असे. म्हणजे एका बाजूला थुंकी लावली जात होती आणि एक भाग तसाच कोरडा ठेवून टॉस केला जायचा. हा टॉस जो जिंकेल त्याच्यावर राज्य असायचे आणि खेळाची सुरुवात व्हायची.
ज्याने टॉस जिंकला त्या खेळाडूला खेळायची पहिली संधी मिळते. तो खेळाडू जमिनीवर तयार करण्यात आलेल्या खड्ड्यावर म्हणजेच ज्याला आपण गाळ किंवा गली म्हणतो. त्याच्यावर विटी आडवी ठेवतो व नंतर त्या खड्ड्यांमधून विटी दांडूने हवेत भिरकवाची असते.
त्यावेळी बाकीचे खेळाडू मैदानात आजूबाजूला पसलेले असतात. कि जेणे करून ती हवेत उडालेली विटी झेलण्यासाठी उभे असतात. त्यावेळेस जर एखाद्या खेळाडूने हवेत उडालेली विटी झेलली गेली तर तो विटी मारणारा खेळाडू बाद होतो. जर कोणत्याच खेळाडूने विटी झेलली नाही.
तर, मग त्या गलवर दांडू हा आडवा ठेवायचा असतो. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतो. जर त्यावेळी दांडूला विटी लागली नाही लागली तर खेळाडू बाद होतो .जर तो बाद झाला नाही तर त्याने विटीने गुन मिळवायचे असतात.
यासाठी खेळाडू विटी च्या एका टोकावर दांडी मारून ती विटी हवेत उडवत उडवायची असते व ती विटी जमिनीवर पडू न देता बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे त्यांनी हवेत भिरकवायची असते.
केवळ दांडू च्या साह्याने हवेत उडवणे हे या खेळातील सगळ्यात मोठी कसरत असते .परत तिथुन पुन्हा त्या खेळाडूंनी विटी फेकायची जर विटी उडवताना जर विटी दांडूला लागली नाही तर मात्र तो खेळाडू त्यावेळेस बाद होतो.
हा खेळाडू विटी जेथे घेऊन जाईल तिथून त्याने पार केलेल्या अंतराच्या प्रमाणात अंक मोजले जातात. हे अंक अबक दुबक च्या प्रमाणात मोजले जातात. दांडूने विटी हवेत एकदा हलकेच सोडून मारली असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजले जाते म्हणजे आबक. जर हवेतल्या हवेत दोन वेळा विटीला उडवलं असेल तर ते अंतर विटीने मोजायचे असते.
त्याला दुबाक म्हणतात. सहाजिकच या खेळाडूत अबक दुबक करण्याचे कौशल्य जास्त असेल त्या खेळाडूचे गुण जास्त असतील. टोला चूकेपर्यंत किंवा दांडूला नेम लागेपर्यंत त्या खेळाडूचा खेळ चालूच राहतो.
ज्या खेळाडूंचे गुण जास्त किंवा संघ असेल तर त्या संघाचे गुण जास्त तो खेळाडू किंवा संघ जिंकतो .आता सांगा या मोबाईल गेम पेक्षा हा मैदानात लाल मातीत खेळला जाणारा खेळ किती मनोरंजक आहे!! त्यामुळे नवीन पिढीने जे आपण खेळत होतो .
ते ग्रामीण खेळ परत आत्मसात केले पाहिजे. इंटरनेटवरच्या खेळांपेक्षा अस्सल आपल्या मातीतल्या खेळांमध्ये किती धम्माल असते याचा अनुभव आजच्या पिढीने घेतला पाहिजे .म्हणून त्या खेळांना पुन्हा आपल्या आयुष्यात आणले पाहिजे. जेणेकरून ओस पडलेली मैदाने पुनरुपी मुलांनी भरून जातील . या पोस्ट मधली माहिती आपणास कशी वाटली हे सांगावे व या पोस्ट मुळे आपल्याला जर विटीदांडू खेळायची इच्छा झाली तर ती अवश्य खेळा.
धन्यवाद !!!!