वेब ब्राऊजर म्हणजे काय? Web Browser Information in Marathi येथे आपण बघणार आहोत. ज्यावेळी आपण इंटरनेट बद्दल बोलत असतो त्यावेळी खूप वेळा वापरला जाणार शब्द म्हणजे वेब ब्राऊजर. या वेब ब्राऊजर चा इतिहास आणि त्याचे वेगवेगळे उपयोग व प्रकार आपण येथे बघणार आहोत.
हे एक असे सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन आहे ज्याद्वारे World Wide Web या इंटरनेट जाळ्यातून माहिती मिळवली जाते. ज्यावेळी आपण या अॅप्लिकेशन मधून काही माहितीसाठी विनंती करतो, त्यावेळी वेब ब्राऊजरद्वारे वेब सर्वर वरून माहिती मागवून ती आपल्याला वेब पेजेस् वर दाखवली जाते.
वेब ब्राऊजर म्हणजे काय? | Web Browser Information in Marathi
वेब ब्राऊजर आणि सर्च इंजिन या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेब ब्राऊजर हे एक अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे तर सर्च इंजिन हे एक संकेतस्थळ आहे. सर्च इंजिन हे आपल्याला वेगवेगळी संकेतस्थळे शोधायला मदत करत असते, तर वेब ब्राऊजर द्वारे आपण ती आपल्या उपकरणावर मिळवू शकतो.
इतिहास :
आज हे वेब ब्राऊजर इ-स्टोर वर सहज उपलब्ध होत आहेत आणि आपण त्याचा मोबाइल, लॅपटॉप, संगणक यांच्यावर वापर करत आहे. त्याच्या इतिहासाबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत.
1. WorldWideWeb: जगातील पहिले वेब ब्राऊजर म्हणजे WorldWideWeb. आज आपण जे World Wide Web हे इंटरनेट महाजाल वापरत आहोत ते याच्यापेक्षा पूर्ण वेगळे आहे. या वेब ब्राऊजर चा शोध Sir Tim Berners Lee यांनी 1990 मध्ये लावला.
2. Mosaic: 1993 मध्ये या वेब ब्राऊजर चा शोध लागला. यामध्ये चित्रे टाकण्याचे नवीन फीचर आले होते आणि त्याचा युजर इंटरफेस खूप नावीन्यपूर्ण होता. त्यावेळी ते एक जगातील पहिले लोकप्रिय वेब ब्राऊजर होते.
3. Netscape Navigator: त्यानंतर 1194 मध्ये Mosaic चा कार्यसंघ नेता (Team Leader) Marc Andreessen नवीन ब्राऊजर वर काम सुरू केले आणि ते Netscape Navigator या नावाने बाजारामद्धे आणले गेले.
4.त्यानंतर Internet Explorer (1994) by Microsoft, Moxilla Firefox (2002), Safari (2003) असे अनेक ब्राऊजर बाजारामद्धे येत आहेत आणि यामध्ये संशोधन सुरूच आहे.
वाचा : संगणक म्हणजे काय
वेब ब्राऊजर हे काम कसे करते?
वेब ब्राऊजर चे मुख्य कार्य म्हणजे World Wide Web मधून माहिती मिळवणे आणि ती आपल्या ग्राहक वर्गाला उपलब्ध करून देणे. कोणत्याही संकेतस्थळाला भेट द्यायची असेल तर वेब ब्राऊजर चा वापर केला जातो.
ज्यावेळी वेब ब्राऊजर च्या सर्च बार मध्ये एखाद्या संकेतस्थळाचा URL टाकला जातो. तेव्हा ते ब्राऊजर आपल्याला त्या संकेतस्थळावर घेऊन जाते. आपण जी काही माहिती शोधत असतो किंवा वेगवेगळ्या संकेतस्थळांना भेटी देत असतो त्यावेळी त्याच्या सर्व नोंदी वेब ब्राऊजर आपल्याकडे करून ठेवत असतो. वेब ब्राऊजर हे Internal Cache सुद्धा साठवून ठेवत असते, याचा फायदा असा होतो की आपण जेव्हा एकच वेब पेजेस् किंवा संकेतस्थळाला पुनः भेट देतो तेव्हा आपला इंटरनेट डेटा कमी वापरला जातो.
या वेब ब्राऊजर मध्ये अजूनही काही फीचर आहे जसे की, आपण एकाच वेळी अनेक वेब पेजेस् चालवू शकतो, तसेच मागील पेज, पुढील पेज सहज मिळवू शकतो. एखादे पेज आपण रीलोड ही करू शकतो. यामुळे ब्राऊजिंग खूप सोयस्कर होत आहे.
आता आपण बघणार आहोत काही लोकप्रिय असलेले वेब ब्राऊजर :
1. Google Chrome:
आज 2021 मध्ये जगातील 70% लोक याच ब्राऊजर चा वापर करत आहेत. यामागे कारण म्हणजे ब्राऊजिंग स्पीड आणि आपल्या वायक्तिक google account शी जोडण्याची पद्धत. त्यामुळे हे ब्राऊजर लोकांना वापरायला सोयीस्कर वाटते आणि याचा User Interface आजही खूप लोकप्रिय आहे.
2. Safari:
Apple कंपनीच्या उपकरणामद्धे हे Default ब्राऊजर म्हणून काम करते. त्यामुळे हे US देशामध्ये लोकप्रिय ब्राऊजर आहे. Macs, iPads, and iPhones या मध्ये हे वेब ब्राऊजर support करते.
3. Microsoft Edge (formerly Internet Explorer):
Microsoft कंपनीच्या उपकरणांमध्ये पूर्वी Internet Explore हे Default वेब ब्राऊजर येत होते. आता त्याच ब्राऊजर ला बदलून Microsoft Edge हे ब्राऊजर येत आहे.
वाचा: इंटरनेट म्हणजे काय
4. Opera:
1995 मध्ये मार्केट मध्ये आलेले हे वेब ब्राऊजर Microsoft Windows, Android, iOS, macOS, and Linux operating systems या सर्व उपकरणांमध्ये आजही अॅक्टिव आहे. यानंतर 2005 मध्ये Operamini हे एक अडवांस व्हर्जन आले. त्यामध्ये संकेतस्थळ ज्या जाहिराती दाखवत असते त्या सर्व ब्लॉक करण्याची सिस्टम आलेली आहे आणि हे वेब ब्राऊजर Mobile Device वर जास्त वापरत आहे.
आपण काय शिकलो?
वेब ब्राऊजर बद्दल पूर्ण माहिती माहिती आपण वर बघितली. त्याचे काम कसे चालते, त्याचा इतिहास आणि वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासले. ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारामद्धे शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!