What is kB MB GB in Marathi: नमस्कार मित्रांनो पुनः एकदा ब्लॉग वर आपले स्वागत. आपल्या मोबाइल मध्ये किंवा संगणकामध्ये जी काही माहिती आपण साठवून ठेवतो, म्हणजेच मेमरी. आज आपण बघणार आहोत, मेमरीचे एकक कोणते आहेत? ती कशी मोजली जाते? kB, MB, GB म्हणजे काय (What is kB MB GB in Marathi)
kB, MB आणि GB म्हणजे काय- What is kB MB GB in Marathi
आपण बघितले असेलच प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी एक स्वतंत्र एकक प्रणाली असते, जसे की द्रव पदार्थ आपण लिटर, मिलिलिटर मध्ये मोजतो तर क्षेत्रफळ मोजायचे असेल तर आपण गुंठा, एकर ही एकक वापरतो. अगदी तशीच एकक प्रणाली ही संगणक/मोबाइल मध्ये असणाऱ्या मेमरी (माहिती साठवून ठेवण्याची क्षमता) What is kB MB GB in Marathi साठी वापरली जाते.
मेमरी चे एकक (Units of Computer Memory) : (चढत्या क्रमाने)
- b (bit)
- B (bytes)
- kB (kilobyte)
- MB (megabyte
- GB (gigabyte)
- TB (terabyte)
- PB (petabyte)
- EB (exabyte)
- ZB (zettabyte)
- YB (yottabyte)
सविस्तर माहिती बघूयात :
1) b (bit)
संगणकाद्वारे वापरल्या जाणार्या माहितीचा सर्वांत छोटा घटक म्हणजे bit. यामध्ये 0 आणि 1 हे बायनरी अंक वापरले जातात. जसे की ऑन म्हणजे 1 आणि ऑफ म्हणजे 0.
2) B (bytes)
8 बायनरी अंकांचा 1 bytes होतो म्हणजेच 8 bits = 1 B (bytes) आपण एक उदाहरण बघूयात, जर आपल्याला “R” हे अक्षर मेमरी मध्ये साठवून ठेवायचे असेल तर ते ‘01010010’ असे 8 bits मध्ये साठवले जाते. म्हणजेच bytes द्वारे संगणक अक्षर, संख्या किंवा चिन्हासारखे वर्ण दर्शवू शकतो. उदा. “d”, “E”, “@”.
3) kB (kilobyte)
हे सुद्धा एक मेमरी चे छोटेच एकक आहे पण bytes पेक्षा मोठे आहे. संगणकामध्येही काही प्रणाली या power of 10 तर काही प्रणाली power of 2 वर आधारित आहेत.
यामध्ये दोन प्रकार पडतात :
- Base 10 (decimal) : 1 kB = 1000 bytes = 103 B (SI prefixes)
ही प्रणाली International System of Units (SI) आधारित आहे आणि नंतर International Electrotechnical Commission (IEC) नेही शिफारस केले आहे.
याचा वापर आपण जेव्हा काही माहिती ट्रान्सफर करत असतो त्यावेळी जो रेट दर्शवला जातो तेव्हा केला जातो. Memory card, Hard-drive, DVSs, flash-based storage येथेही Base 10 (decimal) एकक वापरले जातात.
- Base 2 (binary) : 1 KiB = 1024 bytes = 210 bytes (binary prefixes)
ही प्रणाली International Electrotechnical Commission 80000-13 ने शिफारस केली आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानक संस्था जसे की International Bureau of Weights and Measures (BIPM), National Institute of Standards and Technology (NIST) द्वारे समर्थित आहेत.
याचा वापर Microsoft Windows या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये केला जातो, तसेच random-access-memory (RAM), CPU cache size आणि टेलीफोन कंपनीच्या बिलिंग सिस्टम मध्येही वापर केला जातो.
4) MB (megabyte) [decimal]
आता यापुढची एकक 1000 च्या पटीने वाढतात.
1 MB = 1000 kB = 103 kB = 106 B
आणि
MiB (mebibyte) [binary]
1 MiB = 1024 KiB = 210 KiB = 220 bytes
5) GB (gigabyte) [decimal]
साहजिकच याची किंमतही MB पेक्षा 1000 पटीने जास्त असणार.
1 GB = 1000 MB = 103 MB = 106 kB = 109 B
आणि
GiB (gibibyte) [binary]
1 GiB = 1024 MiB = 210 MiB = 220 KiB = 230 bytes
6) TB (terabyte) [decimal]
1 TB = 1000 GB = 103 GB = 106 MB = 109 kB = 1012 B
आणि
TiB (tebibyte) [binary]
1 TiB = 1024 GiB = 210 GiB = 220 MiB = 230 KiB = 240 bytes
7) PB (petabyte) [decimal]
1 PB = 1000 TB = 103 TB = 106 GB = 109 MB = 1012 kB = 1015 B
आणि
PiB (pebibyte) [binary]
1 PiB = 1024 TiB = 210 TiB = 220 GiB = 230 MiB = 240 KiB = 250 bytes
8) EB (exabyte) [decimal]
1 EB = 1000 PB = 103 TB = 106 TB = 109 GB = 1012 MB = 1015 kB = 1018 B
आणि
EiB (exbibyte) [binary]
1 EiB = 1024 PiB = 210 PiB = 220 TiB = 230 GiB = 240 MiB = 250 KiB = 260 bytes
9) ZB (zettabyte) [decimal]
1 ZB = 1000 EB = 103 EB = 106 PB = 109 TB = 1012 GB = 1015 MB = 1018 kB = 1021 B
आणि
ZiB (zebibyte) [binary]
1 ZiB = 1024 EiB = 210 EiB = 220 PiB = 230 TiB = 240 GiB = 250 MiB = 260 KiB = 270 bytes
10) YB (yottabyte) [decimal]
1 YB = 1000 ZB = 103 ZB = 106 EB = 109 PB = 1012 TB = 1015 GB = 1018 MB = 1021 kB = 1024 B
आणि
YiB (yobibyte) [binary]
1 YiB = 1024 ZiB = 210 ZiB = 220 EiB = 230 PiB = 240 TiB = 250 GiB = 260 MiB = 270 KiB = 280 bytes
एकंदरीत निरीक्षणावरून असे दिसून येते की binary सिस्टम चे एकक हे decimal सिस्टम पेक्षा मोठे आहे.
खाली दिलेल्या चार्ट वरुण लगेच लक्षात येईल:
Decimal (Base 10) |
Binary (Base 2) |
||||
Value in B |
Metric |
Value bytes |
IEC |
||
103 |
kB |
kilobyte |
210 |
KiB |
kibibyte |
106 |
MB |
megabyte |
220 |
MiB |
mebibyte |
109 |
GB |
gigabyte |
230 |
GiB |
gibibyte |
1012 |
TB |
terabyte |
240 |
TiB |
tebibyte |
1015 |
PB |
petabyte |
250 |
PiB |
pebibyte |
1018 |
EB |
exabyte |
260 |
EiB |
exbibyte |
1021 |
ZB |
zettabyte |
270 |
ZiB |
zebibyte |
1024 |
YB |
yottabyte |
280 |
YiB |
yobibyte |
आपण काय शिकलो?
मेमरी म्हणजे काय What is kB MB and GB in Marathi ? ती कोणत्या एकक (Units of Computer Memory) मध्ये मोजली जाते तसेच त्यांचे रूपांतर आपण बघितले. binary आणि decimal याबद्दलही माहिती बघितली. त्यांचा वापर कुठे केला जातो याचीही सविस्तर माहिती बघितली. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेखात अशाच उपयुक्त माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद!
हे पण वाचा-
बिट आणि बाइट मधील फरक | Bit And Byte Difference In Marathi