आलू टीक्कीची रेसिपी | aalu tikki recipe in marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
आलू टीक्की ची रेसिपी | aalu tikki recipe in marathi

आलू टीक्की ची रेसिपी | aalu tikki recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो आज आपण चाट ची एक चटाकेदार रेसिपी पाहणार आहोत. चला तर मी आज आपण आलू टीक्की ची रेसिपी पाहणार आहोत.

आलू टीक्की साहित्य ( aalu tikki recipe in marathi ingredients ) :

2 लोकांसाठी ह्या साहित्यात तुम्ही आलू टिक्की बनवू शकता.

  • 8-9 बटाटे (मध्यम आकार)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1/2 चमचा  लाल तिखट
  • 1/4 चमचा काळ मीठ
  • 1 चमचा  मीठ
  • 1/2 चमचा लिंबाचा रस
  • 2 चमचे पोहे पावडर
  • तळण्यासाठी तेल
  • 1 चमचा  चाट मसाला

ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हला मोजून 20-25 मिनिटे लागतील.

आलू टीक्की कृती ( aalu tikki recipe in marathi steps) :

एका प्लेटमध्ये उकडलेले बटाटे घ्यावे व त्यात चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, मिठ, लिंबाचा रस, पोहे पावडर घालावी व बटाटे चांगले मॅश करून घ्यावे.

सगळे जिन्नस व्यवस्थित मिसळा व त्याचे मऊ पीठ बनवून घ्या. आणि १० मिनिटे हे पीठ बाजूला ठेवून द्या.

दहा मिनिटानंतर मळलेलं पीठ घ्या व त्याचे लहान – लहान गोळे तयार करून घ्या व त्याची टिक्की बनवा.

टिक्की बनवण्यासाठी तयार मिश्रणाचा गोळा घ्या व तळहाताच्या मध्ये ठेवा आणि दोन्ही हातांमध्ये दाबुन सपाट करावा.

आपल्या आलू टिक्की आत्ता तळण्यासाठी तयार आहेत. 

तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घ्या व टिक्की गरम तेलात शॅलो फ्राय करून घ्या व छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावे.

3-4 मिनिटांनी टिक्की ची बाजू पलटी करा व सुमारे 3-4 मिनीटे दुसऱ्या बाजुने तळून घ्या .
आलू टिक्की तयार आहेत.
गरमागरम सर्व्ह करा.
ही टिक्की तुम्ही गोड चिंचेची चटणी किंवा पुदिना चटणी बरोबर देखील खाऊ शकता.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment