रवा लाडू रेसिपी मराठी Rava Ladu Recipe in Marathi

रवा लाडू रेसिपी मराठी Rava Ladu Recipe in Marathi  रव्याचे लाडू सर्वजणांना आवडतात. त्याची बनवण्याची कृती मात्र बऱ्याच जणांना माहित नाही.
तर आम्ही खास तुमच्याकरिता पाकाचे रवा लाडू आणि बिना पाकाचे झटपट तयार होणारे लाडू असे दोन रेसिपी घेऊन आलो आहोत.

रवा लाडू रेसिपी प्रकार :

रवाचे लाडू आपल्या धार्मिक कार्यामध्ये किंवा शुभ मुहूर्तावर सर्वांचेच घरी बनविण्यात येतात. रवा लाडू बनवण्याची पद्धत मात्र सर्वांची वेगवेगळे असू शकते. रवा लाडूचे दोन प्रकार आपण पाहू शकतो. त्यामध्ये एक म्हणजे पाकाचे लाडू आणि दुसरे म्हणजे बिना पाकाचे लाडू. या लाडूमध्ये वेगवेगळे घटक वापरून त्याची शोभा वाढवली जाते व चवही वाढवली जाते. बिना पाकाच्या लाडूमध्ये दळलेली पिठीसाखर वापरली जाते. तर पाकाचे लाडूमध्ये साखरेचा पाक तयार करून वापरला जातो. दोन्हीही प्रकारचे रेसिपीचे रव्याचे लाडू खायला नरम आणि छान लागतात.

 Rava Ladu

ही रेसिपी किती लोकांकडे आहे?
ही रेसिपी आपण 5 लोकांकरिता बनवणार आहोत.

रवा लाडू रेसिपी मराठी Rava Ladu Recipe in Marathi

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

रव्याचे लाडूची पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला किमान 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

रव्या भाजण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

रवाचे लाडू तयार करण्याकरता आपल्याला एकूण 50 मिनिटे एवढा वेळ लागतो.

रव्याचे लाडू बनवण्याकरता लागणारे सामग्री :

1) चार वाटी बारीक रवा
2) दोन वाटी बारीक किसलेले खोबरे
3) एक वाटी तूप
4) तीन वाटी साखर
5) एक मोठी चिमुट केशर
6) बेदाणे किंवा काजू आवडीप्रमाणे
7) अर्धा चमचा इलायची पूड

रव्याच्या लाडूची पाककृती :

 • एका कढईमध्ये थोडे तूप घालून सुरुवातीला रवा भाजून घ्या. रवा भाजताना तो जळणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे.
 • रवा फार लाल भाजायची गरज नाही. रवा भाजत आला की, त्यामध्ये किसलेले खोबरे घाला, व हे मिश्रण सतत परतत रहा. खोबरे ओले असल्यास त्यातील ओलेपणा पूर्ण जाईपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे.
 • शक्य असल्यास वरून तूपही घातले तरी चालेल.
 • दुसरा भांड्यात साखर आणि दीड कप पाणी घालून पाक तयार करण्यासाठी ठेवा.
 • पाक करत असताना साखर बुडाशी जाऊन बसते, त्यामुळे ते सतत ढवळत रहा.
 • त्या पाकात केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला.
 • उकळी येऊन फेस आला की, गॅस मंद करा. पाकातला चमचा वर काढून थोडासा पाक अंगठा आणि मधले बोट यांच्यामध्ये धरून बोटे हळूहळू लांब करा चाचणी तयार झाली काय बघा.
 • त्यामध्ये तार दिसायला लागला की, गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा थोडा जास्त पाक काढून ठेवा.
 • आता हा पाक आपल्याला रव्यामध्ये घालून त्याचे एक मिश्रण तयार करायचे आहे.
 • दोन तीन तास झाकण न ठेवता हे मिश्रण असेच मुरू द्यायचे आहे.
 • हे मिश्रण कोरडे वाटले तर काढून ठेवलेल्या पाक कोमट करून लागेल तसा मिसळून घ्यावा
 • पाकाचे प्रमाण हे रव्यावर अवलंबून असते. आपण जाडा रवा घेतला तर पाक जास्त लागतो आणि बारीक रवा घेतला तर पाक कमी लागतो.
 • लाडू तयार करत असताना आपल्याला मिश्रण कडक लागले तर त्यामध्ये पाक घालून ते नरम करून घ्यायचे आहे. हवे तसे बेदाणे व काजू वापरून लाडू तयार करून घ्यायचे आहे.

बिना पाकाचे रव्याचे लाडू झटपट कसे तयार होतील त्याची रेसिपी आपण पुढील प्रमाणे पाहूया.

1) एक कप रवा
2) अर्धा कप तूप
3) दोन ते तीन चमचे किसलेला नारळ
4) बदाम, काजू, पिस्ता बारीक करून घेतलेला.
5) दीड कप साखर पावडर
6) दूध आवश्यकतेनुसार
7) वेलची पूड एक ते दोन चमचे
8) मनुका

पाककृती :

 • सर्वप्रथम आपल्याला लाडू तयार करण्यासाठी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप गरम करायचे आहे. नंतर त्यामध्ये एक कप रवा टाकायचा आहे. आता रवा मंद आचेवर भाजून घ्या. व हलका रंग येईपर्यंत सतत ढवळत रहा.
 • तसेच रवा भाजताना वरून आणखीन दोन-तीन चमचे तूप घाला. नंतर त्यामध्ये दोन ते तीन मोठे चम्मच घेतलेला नारळ घाला. एक ते दोन मिनिटे परतून घ्या.
 • आता त्यामध्ये आठ ते दहा चिरलेले बदाम, काजू, पिस्ता टाकून दोन मिनिटे पुन्हा परतून घ्या.
  ड्रायफ्रूट्स कुरकुरीत झाल्यानंतर गॅस बंद करून टाका.
 • मिश्रण थोडे थंड झाले की त्यामध्ये दीड कप साखर पावडर टाका. नंतर अर्धा चमचा वेलची पूड टाका आणि हे मिश्रण एकत्रित मिसळून घ्या.
 • आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये मनुके टाका. जर रव्याचे मिश्रण तुम्हाला कोरडे वाटत असेल तर त्यामध्ये दूध टाकून चांगले मिश्रण एकत्रित करा व लाडू तयार करून घ्या.
 • या मिश्रणात दूध टाकल्यामुळे लाडू तयार करण्याला सोपे जाईल. नंतर आपल्याला हवे त्या आकारात लाडू तयार करून घ्या.

अशाप्रकारे रव्याचे चवदार लाडू तयार होतील. तुम्ही ते आठ ते दहा दिवस खाऊ शकता.

रेसिपीतील पोषक घटक :

रव्याच्या लाडू मध्ये कर्बोहायड्रेट, प्रोटीन फायबर असे पोषक तत्व असतात तसेच कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक असते. रवा खाणे तसा शरीरासाठी पोषक आहे. याव्यतिरिक्त विटामिन बी 6, विटामिन बी 12 , विटामिन ए आणि व्हिटॅमिन डी सुद्धा असते.

फायदे :

रव्याचे पदार्थ खाणे फायदेशीर आहे, कारण रव्यामध्ये फायबर असते, जे पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. यामुळे पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

रवा खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्याचा उपयोग करून आपण झटपट आपले कामे पूर्ण करू शकतो.

रव्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्यामुळे रव्याचे सेवन आपल्या शरीराची ऊर्जा पातळी टिकवून ठेवते.

तोटे :

ज्या लोकांना रव्यापासून ऍलर्जी असेल त्यांनी रव्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे.

सर्दी, शिंका किंवा पोटात गोळा येणे, उलट्या होणे, मळमळ होणे अशा स्थितीत रवा वापरू नये कारण श्वसनाच्या समस्येसाठी रवा खाणे धोकादायक असतो.

तसेच रव्याच्या लाडूमध्ये साखर घातलेले असते, तर हे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी देखील हानिकारक करू शकते.

Leave a Comment