मोदक रेसिपी मराठी Modak Recipe In Marathi

मोदक रेसिपी मराठी Modak Recipe In Marathi  मोदक हा एक गोड पदार्थ आहे. जो भारतात तसेच इतर राज्यात वेग वेगळ्या प्रकारचे आढळून येतात. मोदक हे सर्वाना आवडणारा पदार्थ आहे. हिंदू धर्मात श्री गणेशाचे आवडता पदार्थ मानला जातो. यांचा वापर प्रसाद म्हणून केला जातो. इतर राज्यात मोदकाचे काही प्रकार आढळून येतात. खवा मोदक, मोतीचुर मोदक, चॉकलेट मोदक अशा अनेक प्रकारचे मोदक तयार केले जातात. हॉटेलमध्ये अशा अनेक प्रकारचे स्वादिष्ट मोदक आढळून येतात. आपण यांचा वापर गणपतीचा वेळेस दहा दिवस प्रसाद म्हणून करू शकतो. काही लोकांना मोदक खवेशे वाटतात, पण त्याच्या सभोवताली मिळू शकत नाही. तर आज त्याच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. मोदक रेसिपी एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने मोदक कशे तयार करतात, त्यासाठी आपण हे रेसिपी पाहणार आहोत.

Modak

मोदक रेसिपी मराठी Modak Recipe In Marathi

मोदकसाठी पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्व सामान व्यवस्थित गोळा करणे आवश्यक आहे. हॉटेल किंवा बाहेरील मोदक जसे स्वादिष्ट असतात तसे मोदक बनवण्यासाठी आपल्याला 25 मिनिट लागतात.

कुकिंग टाईम :

मोदक कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट लागतात.

टोटल टाईम :

मोदक बनवण्यासाठी आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी लागते, आणि नंतर कुकिंग करावे लागतात. त्यासाठी आपल्याला टोटल टाईम 55 मिनिट एकूण लागतात.

मोदकचे प्रकार :

मोदकला भारतात तसेच इतर राज्यात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात भगवान श्री गणेश यांचा आवडता पदार्थ मानला जातो. गणेश चतुर्थीला हे खास करून बनवले जातात, आणि प्रसाद म्हणून यांचा उपयोग केला जातो. मोदकचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे उकडीचे मोदक, आणि दुसरा म्हणजे तळलेले मोदक हा एक गोड पदार्थ आहे. जो सर्वाचा लोकप्रिय आहे, यामध्ये काही लोक खव्हाचे सुध्दा मोदक तयार करतात. जे एकदम स्वादिष्ट लागतात. मोदकला हिंदू धर्मात महत्त्व आहे.

वाढीव :

मोदकचा वापर हा प्रसाद म्हणून केला जातो, त्यासाठी आपण मोदक हे 10 व्यक्तीकरिता बनवणार आहोत.

मोदक बनवण्यासाठी लागणारी सामग्री :

1) 2 वाटी गव्हाचे पीठ किंवा मैद्याचे पीठ.
2 ) 100 ग्रॅम गूळ.
3) 250 ग्रॅम तेल.
4) 50 ग्रॅम खोबरे खीस.
5) अर्धी वाटी रवा.
6) एक चिमूट मीठ.
7) 5 ते 6 काजू व बदाम.
8) एक इलायची.
9) 3 चम्मच तूप.

पाककृती :

  • मोदक तयार करण्यासाठी सर्वात पाहिले आपण त्यासाठी लागणारा पीठाचा नरम गोळा तयार करणार आहोत.
  • एका पात्रात गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये रवा, आणि चिमूट भर मीठ टाकून चांगले मिक्स करा, आता त्यामध्ये थोडे गरम तूप टाका.
  • सर्व साहित्य बरोबर मिक्सर करून घ्या. आता यामध्ये थोडे पाणी टाकून गट्ट मीठ तयार करा.
    पीठ थोडे नरम राहले पाहिजे, त्यामुळे मोदक एकदम कुरकुरीत होतात.
  • आता तयार झालेला गव्हाचे किंवा मैद्याचे गट्ट पीठ बाजूला 10 मिनिट एका प्लॅस्टिकचा पन्नीमध्ये ठेऊन द्या. त्यामुळे पीठ नरम होणार जेवढा जास्त वेळ ठेवला जाणार तेवढे चांगले.
  • आता मोदकसाठी लागणारा आतील मसाला तयार करणार आहोत, त्यासाठी पहिले सर्व गूळ बारीक करून घ्यावा.
  • तसेच बदाम आणि काजूचे लहान लहान तुकडे करून घ्यावे. खोबरे खिस थोडे भाजले तरी चालते, म्हणजे त्यातील ओलावा कमी होणार.
  • आपल्याकडे खोबरेचे डौल असेल तर त्याला व्यवस्थित बारीक खिसून घ्यावे.
  • आता गूळ, खोबरे खिस, काजू आणि बदाम, थोडी इलायची पूर्ण मिश्रण करून घ्यावे, व्यवस्थित मिक्स झाल्याने ते चवदार होते.
  • आता पीठाचा गोळा घ्या, आणि समान पाच ते सहा इंच एवढी लहान चपाती तयार करा, किंवा एक मोठी चपाती तयार करून तुम्ही सहा इंच एवढा गोल आकृती आकाराचे झाकण किंवा दुसरे काही पण वापरू शकता.
  • लहान चपाती तयार करताना त्यावर थोडे तूप लावा, त्याने मोदक चवदार होतील.
  • आता एक चपाती घा आणि त्यामध्ये एक चम्मच गुळाचे मिश्रण टाका. आता चपातीचे वरचे टोक एकत्र करा, म्हणजे आपला मोदक तयार होणार.
  • आपण साचा वापरून वेगवेगळ्या आकाराचे मोदक तयार करू शकतो. हाताच्या साहाय्याने आपण वेगळा आकार देऊ शकतो.
  • मोदक व्यवस्थित पूर्ण बंद करून घ्यावे. नाहीतर ते फुटतील याची काळजी करावी, अशा प्रकारे सर्व मोदक तयार करावे.
  • आता गॅसवरती एक खोल तळाची कढाई ठेवा. आणि तेल टाकून गॅस चालू करा, तेल मध्यम गरम करा, म्हणजे मोदक आरामात होतील.
  • तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक एक मोदक आरामात टाका, म्हणजे तेल हातावर उडणार नाही, असे करत त्यांना परतवत राहा.
  • जेव्हा मोदक थोडे लाल होतील आणि त्याचा वरती बुळबुळे येणे कमी होतील, तेव्हा आपले मोदक तयार झाले आहेत असे समजावे.
  • मोदक पूर्ण कडून झाल्यावर त्यांना थंड होऊ द्या, अशा प्रकारे आपले स्वादिष्ट आणि चमचमीत मोदक खाण्यासाठी तयार आहेत. एक एक करून आपण त्यांना खाऊ शकतो.

मोदकमध्ये असणारे पोषक घटक :

मोदक तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे सामान लागले. त्यामध्ये आपण गूळ, काजू, बदाम आणि खोबरे खीस यांचा वापर केला. यांतून आपल्याला प्रोटीन तसेच कॅल्शियम सारखे घटक मिळतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. गुळापासून आपल्याला शुगर मिळते. जे शरीरातील थकवा दूर करते, असे पोषक घटक आपल्याला मोदकपासून मिळतात.

फायदे :

मोदकमध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत. यामध्ये असणारे काजू बदाम व तेलाचे प्रमाण आपल्या शरीरात फॅट कमी असल्यास वाढवते. मोदक खाल्ल्याने आपल्याला लवकर भूक लागत नाही, असे अनेक फायदे या मोदक पासून आपल्याला मिळतात.

तोटे :

मोदक हा एक गोड पदार्थ आहे, जी गूळ किंवा साखर पासून बनलेला असतो. मोदक जास्त प्रमाणत सेवन केले तर आपल्याला मळ मळ व उलती होऊ शकते.

ज्या व्यक्तीना शुगरसारखे आजार आहेत. त्यांना हे धोक्याचे आहेत, यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, किंवा शरीरात शूगरचे प्रमाण वाढू शकते.

जास्त प्रमाणात सेवन केले तर पोट दुःखी सुध्दा होऊ शकते, आणि तेलकट असल्यामुळे डोकदुखू पण होय शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला मोदक रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment