कोथिंबीर वडी रेसिपी मराठी Kothimbir Wadi Recipe in Marathi

कोथिंबीर वडी रेसिपी मराठी Kothimbir Wadi Recipe in Marathi कोथिंबीर वडीची खुसखुशीत आणि खमंग अशी चविष्ट रेसिपी कोणाला आवडणार नाही, तर ती सर्वांनाच आवडते लहान पासून मोठ्यांपर्यंत. कोथिंबीर वडी खायला अगदी खुसखुशीत आणि चवदार असल्यामुळे ती सर्वांची आवडती आहे. तसेच त्यामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे तिचा स्वाद आणखीनच वाढतो. कोथिंबीर वडी आपण कोणत्याही सीजनमध्ये तयार करून खाऊ शकतो. कोथिंबीर मध्ये अनेक औषधी गुण असतात. ते आपल्या शरीरासाठी पोषक असतात. कोथिंबीर मधील पोषक तत्वांमुळेच आपलं आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळेच कोथिंबीर वडी शरीरासाठी निरोगी पदार्थ आहे.

तर आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. माहिती आवडल्यास तुम्हीही नक्की कोथिंबीर वडी बनवून पहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Kothimbir Wadi

कोथिंबीर वडी रेसिपी मराठी Kothimbir Wadi Recipe in Marathi

कोथिंबीर वडीचे प्रकार :

कोशिंबीर वडी हा एक विदर्भातील अन्नपदार्थ असून तो खायला खूप चविष्ट आणि पोषण तत्त्वांनी युक्त असतो. कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या प्रकारात केली जाते. अनेक मिश्रित डाळीची कोथिंबीर वडी, बेसनाची कोथिंबीर वडी, त्यामध्ये तांदळाची ही कोथिंबीर वडी केली जाते. ही कोथिंबीर वडी एक तर वापरून केली जाते किंवा मग ती वापरल्यानंतर तळूनही खाण्याचा एक प्रकार आहे.
तर इथे आपण तळलेली कोथिंबीर वडी कशी करायची हा प्रकार पाहणार आहोत.

ही रेसिपी आपण 3 जणांकरता करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

कोथिंबीर वडीच्या पूर्वतयारी करता आपल्याला साधारण 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कोथिंबीर वड्या कुकिंग करण्याकरिता 25 मिनिटे लागतील.

टोटल टाईम :

कोथिंबीर वड्या तयार करण्यासाठी एकूण आपल्याला 55 मिनिटे एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) अर्धी वाटी बेसन
2) दोन चमचे तांदळाचे पीठ
3) दोन वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर
4) एक चमचा तीळ
5) एक चमचा लिंबाचा रस
6) एक चमचा तेल
7) एक चमचा अद्रक लसूण पेस्ट.
8) बिया काढून घेतलेली 1 हिरवी मिरचीचे तुकडे.
9) अर्धा चमचा लाल मिरची पावडर
10) अर्धा चमचा हळदी पावडर
11) मीठ चवीनुसार
12) अर्धा चमचा गरम मसाला
13) बेकिंग सोडा चिमूटभर
14 ) तेल तळण्याकरता

पाककृती :

  • बेसन लाडू कशी बनवायचे मराठी
  • कोथिंबीर वडी करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन टाकून त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घाला गुठळ्या जाईपर्यंत बेसन ढवळत रहा. गुडगुडीत पिठात आणखी थोडे पाणी घाला पकोड्यासारखे जाडसर पीठ तयार करा.
  • पिठामध्ये हिरवी कोथिंबीर आले पेस्ट, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, गरम मसाला, लिंबाचा रस आणि तेल घालून त्यामध्ये मिक्स करून घ्या.
  • आता तीळ थोडे भाजून घ्या व चिमूटभर सोडा त्या मिश्रणामध्ये टाका. हे मिश्रण चांगले मिसळून घ्या व मिश्रण तयार करून घ्या.
  • आता हे मिश्रण एका डब्यामध्ये ओतून घ्यायचे आहे, त्या अगोदर त्या डब्याला तेल लावून घ्या व नंतर वाफेवर शिजवण्यासाठी ठेवायचे आहे. त्यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी गरम करून ठेवा. पाण्यात जाडीचा स्टॅन्ड किंवा प्लेट ठेवा. त्यावर आपण मिश्रणाने भरलेले भांडे ठेवून घ्या.
  • मिश्रणाने भरलेले भांडे कुकरमध्ये ठेवलेल्या प्लेटवर ठेवल्यानंतर कुकरचे झाकण बंद करून घ्या. त्याआधी कुकरची शिट्टी काढून घ्या. मिश्रणाचा डबा ठेवण्या अगोदर पाण्याला उकळी आलेली असावी.
  • हे मिश्रण पंधरा मिनिटे वाफेवर शिजवून द्यायचे आहे त्यानंतर मिश्रण तयार आहे. हे मिश्रण तपासण्यासाठी शिजवलेल्या मिश्रणामध्ये चाकूच घालून पहा. मिश्रण चाकूला चिटकले नसेल तर आपली वडी पूर्णपणे वाफललेली आहे.
  • नंतर मिश्रण थंड झाल्यावर भांड्यातून बाहेर काढून घ्या आणि त्याचे छान असे तुकडे करून घ्या.
  • तुकडे केल्यानंतर एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये वड्या तळण्याकरता तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर गरम तेलात जेवढे तुकडे असतील तेवढे टाका.
  • हे तुकडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर बाहेर काढा सर्व कापलेले तुकडे तळून तयार करा.
  • अशाप्रकारे, गरमागरम, खुसखुशीत चविष्ट अशी कोथिंबीर वडी तयार आहे. आता ही कोथिंबीर वडी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता.

पोषक घटक :

कोथिंबीर वडी हा एक पौष्टिक नाश्ता तयार होतो. यामध्ये मानवी शरीराचे पोषण करण्याची क्षमता असते. कोथिंबीर वडीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक तत्व असतात.
आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.

फायदे :

कोथिंबीर वडी शरीरासाठी पौष्टिक नाश्ता असून त्यामुळे आपले पचनशक्ती सुधारते. तसेच गॅसेस आंबटपणा अपचन यांसारख्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते. यकृत देखील चांगले राहते.

कोथिंबीर हा मधुमेह रुग्णांसाठी रामबाण औषधी आहे. त्याचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्याला भरपूर आराम मिळतो.

तोटे :

कोथिंबीर वडीचे शरीरासाठी बराच फायदा असला तरी ज्या व्यक्तींना कोथिंबीर वडी सहन होत नसेल अशा व्यक्तींनी ते खाऊ नये. कारण एखाद्याला तळलेले पदार्थ शरीरासाठी हानी पोहोचू शकतात.

Leave a Comment