मटर पनीर रेसिपी मराठी Matar Paneer Recipe In Marathi मटर पनीर हे भारतात विविध ठिकाणी आढळून येते. हे एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. सर्व आवडीने खातात, मटर पनीर आपण वेग वेगळ्या प्रकारे बनवू शकतो. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहाल असेल मटर पनीर किती छान आणि स्वादिष्ट आहे. मटर पनीर हे डिश सर्वात जास्त पंजाब मधील प्रसिद्ध पकवान आहे. मुंबई, पुणे अशा अनेक शहरात आता हे प्रसिद्ध झाले आहे, यातील पालक पनीर, आलू मटर पनीर अशे अनेक प्रकार आहेत. आपल्या घरी पाहुणे आले किंवा तुम्हाला मटर पनीर खावसा वाटलं तर आपण सहज बनवू शकतो. तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मटर पनीर रेसिपी अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने आपण मटर पनीर बनवू शकतो. आता आपण मटर पनीर रेसिपी पाहणार आहोत.
मटर पनीर रेसिपी मराठी Matar Paneer Recipe In Marathi
मटर पनीरच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :
मटर पनीर तयार करताना आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी. मग आपण सहज मटर पनीर बनवू शकतो. त्यासाठी विविध भाजीपाला एकत्र करून बारीक करावा लागतो, यासाठी आपल्याला 25 मिनिट लागतात.
कुकिंग टाईम :
मटर पनीर कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
मटर पनीर तयार करताना आपल्याला व्यवस्थित नियोजन करावे लागते. सर्व सामान भाजीपाला एकत्र करून आपण सहज मटर पनीर बनवू शकतो. पूर्वतयारीसाठी आपल्याला 25 मिनिट आणि कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट लागतात, असा एकूण 45 मिनिट पूर्व वेळ आपल्याला लागतो.
मटर पनीरचे प्रकार :
मटर पनीर सर्वाना आवडतो. मटर पनीर हे वेग वेगळ्या ठिकाणी अलग अलग प्रकारे बनवली जाते, यामध्ये आलू मटार पनीर, पनीर माखणी, आलू मटार कढी, पनीर बदर मसाला, पालक पनीर, मेथी मटर मलाई अशा अनेक प्रकारे मटर पनीर बनवल्या जाते. हे एक स्वादिष्ट आणि चमचमीत पनीर मसाला आहे, जो सर्वाना आवडतो.
वाढीव :
मटर पनीर हे आपण 5 व्यक्तिकरीता बनवणार आहोत.
मटर पनीर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 2 मध्यम वाटी हिरवे वाटाणे/ मटर.
2) 200 ग्रॅम पनीर.
3) 2 कांदे.
4) 2 लहान टोमॅटो.
5) 2 चम्मच लसूण अद्रक पेस्ट.
6) 2 ते 3 हिरवी मिरची.
7) 2 चम्मच मिरची पावडर.
8) 1 चम्मच धानिया पावडर.
9) 1 चम्मच सुहाना मसाला.
10) 1 चम्मच गरम मसाला.
11) मीठ.
12) 150 ग्रॅम तेल.
13) आवश्यक तेवढे पाणी.
14) कोथिंबीर.
पाककृती :
- मोदक रेसिपी मराठी
- मटर पनीर तयार करण्या अगोदर भाजीपाला स्वच्छ धुऊन घ्यावा. जसे टोमॅटो, हिरवी मिरची, वाटणे, कोथिंबीर व्यवस्थित साफ करून घ्या.
- स्वच्छ केल्या नंतर टोमॅटो बारीक करून त्याचा पेस्ट तयार करा, व कांदा बारीक चिरून किंवा कापून घ्या, आणि याचा पण पेस्ट तयार करा.
- याच बरोबर हिरवी मिरची, लसन व अद्रक यांचा मध्यम पेस्ट तयार करा, आणि कोथिंबीर बारीक कापून घ्या. आता हे सर्व नंतरचा कामासाठी बाजूला ठेवा.
- नंतर पनीरचे चौकोनी आकाराचे मध्यम तुकडे तयार करा, आणि नंतरचा कामासाठी बाजूला ठेवा.
- आता एक खोल तळाचा पॅन घ्या, आणि गॅस चालू करून मध्यम आसेवरती गॅस वर ठेवा,
व त्यामध्ये तेल टाका. - तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा पेस्ट टाका. आणि तेल वेगळं होये पर्यत तीन ते चार मिनिट परतावत राहा, कांदा एकदम मऊ होऊ द्या.
- नंतर यामध्ये लसन अद्रक पेस्ट टाका, यांचे पूर्ण मिश्रण करा. नंतर याला दोन मिनिट परतवत राहा.
- हे झाल्या नंतर यामध्ये टोमॅटो पेस्ट टाका, आणि मध्यम गॅस वरती तेल अलगत होये पर्यत पाच मिनिट शिजवा.
- हे झाल्यानंतर यामध्ये दोन चम्मच मिरची पावडर, एक चम्मच धनीया, गरम मसाला, हळद आणि सुहाना मसाला टाका.
- चवीनुसार मीठ टाकून पूर्ण मिश्रण करून घ्या. हे टाकून झाल्यावर हा मसाला एक ते दोन मिनिट शिजवा.
- नंतर यामध्ये उकडलेले वाटणे / मटर टाका. आणि मिक्स करून घ्या, सोबतच 1 ग्लास पाणी टाका.
- नंतर पनीरचे चौकोनी तुकडे टाकून त्यांना 5 मिनिट शिजवा. आता यावर थोडी बारीक कोथींबीर टाका.
- नंतर गॅस बंद करून घ्या, आता आपला स्वादिष्ट आणि चमचमीत मटर पनीर तयार आहे. या सोबत आपण कांदा, लिंबू आणि काकडी घेऊन आपण खाऊ शकतो.
मटर पनीरमध्ये असणारे घटक :
मटर पनीर तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या भाजीपाल्यांचा वापर केला जातो. जसे मटर, टोमॅटो, कांदा, हिरवे वाटाणे यासारखे पौष्टिक घटक असणारे साहित्य आपण वापरतो. जसे प्रथिने, व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॅट असे अनेक घटक मटर पनीर मध्ये असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात.
फायदे :
मटर पनीर तयार करण्यासाठी आपण पनीरचा वापर करतो. हा पदार्थ दुधापासून बनलेला असतो. यातून आपल्याला फॅट व कॅल्शियम मिळते, हे आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे.
याचबरोबर हिरवे वाटणे, टोमॅटो, यातून आपल्याला व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने मिळतात. यामुळे आपल्याला अशक्तपना येत नाही, व आपले शरीर निरोगी राहते.
तोटे :
मटर पनीर जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्याला पोट दुःखी होय शकते. यामध्ये वापरल्या जाणारे सर्व सामान हे विशेष घटक असणारे आहे.
मटर पनीरमध्ये गरम मसाले वापरल्या जातात. त्यामुळे आपले पोट आतून गरम झाल्यासारखे वाटू शकते.
मटर पनीरमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्याला मळ मळ होऊ शकते. म्हणून आपण आवश्यक तेवढंच सेवन केले पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला मटर पनीर रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.