आवळा लोणचं मराठी Aavla Lonche Recipe in Marathi

आवळा लोणचं मराठी Aavla Lonche Recipe in Marathi  लोणचे जेवणाच्या ताटामध्ये असले म्हणजे जेवणाची वेगळीच मज्जा येते. मग ते आंब्याचे असो किंवा आवळ्याचे. आवडा हा चवीला आंबट तुरट असला तरीही बऱ्याच लोकांना खूप आवडतो. पूर्वी शाळेमध्ये चिंचा, कैऱ्या, आवळे विकणाऱ्यांकडे लहान मुलांची गर्दी असायची. परंतु आता असे प्रमाण आपल्याला दिसतच नाही किंवा मग क्वचितच दिसतात. आवळ्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. आवळ्याचा आपल्या जेवणामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. कारण आवळा ही औषधी वनस्पती आहे. आवळ्यामध्ये पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रकार आहे. आयुर्वेदामध्ये आवडा हा अत्यंत महत्त्वाचा औषधी वनस्पती म्हणून गणला जातो. याच आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जे आपल्यासाठी पौष्टिक असतात. तर चला मग आज आपण आवळा लोणचे या रेसिपी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Aavla Lonche Recipe

आवळा लोणचं मराठी Aavla Lonche Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

आवळा लोणचे ही रेसिपी तयार करण्यासाठी अत्यंत सोपी व सात ते आठ महिने टिकणारी आहे. आवळ्यापासून विविध पदार्थ तयार केले जाते जसे आवडा मुरब्बा, आवळा सुपारी व आवळ्याचा कीस हे सर्व पदार्थ चटपटीत लागतात. तसेच ते पौष्टिकही आहे. आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो. आपण लोणच्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले असेल एस कैरी लोणचे, लिंबू लोणचे, मिरची लोणचे त्यातलाच आवळा लोणचे हा एक प्रकार आहे. आजकाल लोणचे आपल्याला रेडिमेट विकतही मिळतात. परंतु आपण आपल्या स्वतःच्या हाताने घरी बनवलेली लोणचं स्वस्त पडते व स्वच्छही असते. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

आवडा लोणची रेसिपी किती किलो तयार होणार आहे ?
आवळा लोणचे रेसिपी हे अर्धा किलो तयार होणार आहे.

रेसिपीच्या पूर्ण तयारी करता लागणारा वेळ :

रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला अर्धा तास वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

आवळे आपल्याला वापरून घ्यायचे आहे, त्याकरता आपल्याला दहा मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

ही रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण 40 मिनिटे एवढा वेळ लागतो.

आवळा लोणचं तयार करण्यासाठी लागणारी सामग्री :

1) 500 gm आवळे
2) 200 gm हिरवी मिरची
3) एक जुडी कोथिंबीर
4) 150 gm लसूण
5) पाच चमचे हिंग
6) पाच चमचे हळद
7) 5 चमचे लाल मिरची पावडर
8) मोहरी ते चार चमचे

आवळा लोणचे पाककृती :

  • सर्वप्रथम एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा व त्यामध्ये आवळे मंद आचेवर उकडून घ्या. आवळे जसे फुटू लागतील तसे खाली उतरून घ्या.
  • नंतर आवळ्यातील पाणी काढून घ्या व ते थंड होऊ द्या. नंतर आवळ्यामधून बिया वेगळ्या करून घ्या.
  • नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्या तसेच हिरवी मिरची जाडसर कापून घ्या. हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्या.
  • आता त्यामध्ये हळद, लाल मिरचीपावडर, हिंग पावडर, आणि मीठ घालून एकत्रित मिक्स करून घ्या
  • नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर जाडसर वाटलेली हिरवी मिरची व वाटलेला लसूण घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यावर मोहरीचे तेल घालून पुन्हा मिक्स करून घ्या अशा प्रकारे हे लोणचे तयार आहे आता तयार झाली घेऊन स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणी मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.
  • तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे लोणचे खाऊ शकता. अशाप्रकारे आवळा लोणचं हे एक पौष्टिक रेसिपी तयार झाले आहे.

पोषक घटक :

आवळ्यामध्ये टॅनिन, फॉस्फरस, विटामिन सी, लोह आणि कॅल्शियम असते. तसेच हे घटक मानवी शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आहेत. आवळा केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे. तसेच रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्यामुळे किंवा त्याचा रस केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात.

फायदे :

आवळा अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे आवळ्यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे आवडा हा त्वचा रोगावर उत्तम औषधी मानला जातो.

आवळा लोणचं खाल्ल्यामुळे किंवा आवळे खाल्ल्यामुळे आपली स्मरणशक्ती चांगली राहते. त्यामुळे लहान मुलांना नेहमी आवळा खाण्यासाठी द्यावा.

आवळा लोणचे खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो सकाळी मोरवळा खाल्ल्यामुळे आपल्याला छान फायदा मिळतो.

आवळा खाल्ल्यामुळे आपले डोकं शांत राहतं, तसेच केसांच्या तक्रारी दूर होतात व केस गळती थांबते.

तोटे :

आवळा खाण्याचे बरेच फायदे आपल्याला दिसतात परंतु आवळा जेवढा आरोग्यदायी आहे, तेवढाच तो हानिकारक देखील आहे.

आवळा आपल्या शरीरातील बरेच रोग दूर करत असला तरीही त्याचा अतिरिक्त वापर केल्यास आपल्या शरीराला हानी होऊ शकते म्हणून आवळ्याचे सेवन योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे.

प्रेग्नेंट महिलांसाठी आवळा हानिकारक ठरू शकतो म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय प्रेग्नेंट महिलांनी आवळ्याचे सेवन करू नये.

तर मित्रांनो, तुम्हाला आवळा लोणचे ही रेसिपी कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment