कलौंजी वनस्पतीची संपूर्ण माहिती Kaloonji Plant Information In Marathi

Kaloonji Plant Information In Marathi भारताला आयुर्वेदाचे वरदान लाभलेले आहे, आणि या आयुर्वेदामध्ये रानावनातील अनेक वनस्पतीचे आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहेत. त्यातीलच एक उत्कृष्ट झाड म्हणजे कलौंजी होय. सुमारे १२ इंच वाढणारे हे झाड वेगवेगळ्या स्वयंपाकामध्ये मसाल्याच्या पदार्थांच्या स्वरूपात वापरले जात असते. त्याच्या बिया मुख्यतः उपयुक्त असून, ही वनस्पती दक्षिण पश्चिम आशियामध्ये उगम पावली असावी असे सांगितले जाते.

Kaloonji Plant Information In Marathi

कलौंजी वनस्पतीची संपूर्ण माहिती Kaloonji Plant Information In Marathi

अतिशय काळसर स्वरूपाचे बियाणे असणारी ही वनस्पती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जात असते. मुख्यतः या वनस्पतीची लागवड पाकिस्तान, बांगलादेश, आणि भारत यांसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. अगदी प्राचीन महत्त्व असलेली ही वनस्पती २००० वर्षांपूर्वी औषधी निर्मितीमध्ये वापरली जात असावी, असे संदर्भ किंवा पुरावे आढळून येत असतात.

रोजच्या आहारामध्ये या वनस्पतीचे सेवन केल्यास अतिशय आरोग्यदायी जीवन जगणे शक्य होते. या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, आणि मीठ इत्यादींचे प्रमाण असते. त्याचबरोबर यातील फायबर अन्नपचवण्यामध्ये आणि बद्धकोष्ठता दूर करण्यामध्ये अतिशय फायदेशीर दिसून आलेले आहे. या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषकतत्वे आणि खनिजे असल्यामुळे ही वनस्पती सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांद्वारे देखील दिला जात असतो.

या वनस्पतीमध्ये अमिनो ऍसिड देखील आढळते, ज्याचे प्रमाण चांगले असते. शरीरामध्ये होणाऱ्या प्रथिनांच्या कमतरतेची गरज भागवण्यासाठी कलोंजीचे सेवन करणे खूपच उपयुक्त समजले जात असते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल असणाऱ्या रुग्णांनी या वनस्पतीच्या तेलाचा वापर करणे देखील उपयुक्त असते.

रक्तदाब, श्वसन मार्गातील आजार इत्यादी दूर करण्यासाठी देखील उपयुक्त असणारे हे बियाणे अँटीऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करत असते. आजच्या भागामध्ये आपण या कलोंजी वनस्पती बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, व त्याचे आरोग्यदायी फायदे देखील जाणून घेणार आहोत…

नावकलोंजी
नावाचा अर्थआशीर्वादाची बी
रंगकाळसर
स्वरूपबियाणे
वापरऔषध आणि मसाला
फायदे हृदय आणि रक्त शुद्धीकरण
वापरदोन हजार वर्षांपासून

कलौंजी म्हणजे काय:

नावाप्रमाणेच काळसर रंगाच्या बियाणे स्वरूपामध्ये वापरली जाणारी वनस्पती म्हणजे कलौंजी होय. त्याच्या नावाचा अर्थ आशीर्वादाचे बियाणे असा देखील होत असतो. अतिशय उत्कृष्ट आणि परिपूर्ण औषधी वनस्पती म्हणून या वनस्पतीला ओळखले जात असते.

जवळपास संपूर्ण भारतामध्ये या वनस्पतीची लागवड केली जात असून, या वनस्पतीचे स्वरूपात झुडपाप्रमाणे असते, व त्याचा आकार १२ इंचापर्यंत वाढू शकतो. गडद रंगाच्या या बियाण्यांना अंडाकृती त्रिकोणी आकार प्राप्त झालेला असतो, जो जवळपास तिळ सारखाच दिसतो. मात्र रंगाचा या ठिकाणी बदल दिसून येत असतो. एक उत्कृष्ट मसाला आणि औषधी वनस्पती म्हणून या वनस्पतीला ओळखले जात असते.

कलौंजी वनस्पती चे फायदे:

कलौंजी ही वनस्पती एक उत्तम पाचक असून, त्याच्या मधील फायबर अन्न पचवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरत असतात. विविध रोग बरे करणे किंवा रोगांची लक्षणे दिसत असतील तर त्यावर उपाय करणे यासाठी देखील ही वनस्पती ओळखली जात असते.

नैसर्गिक उपचारांचा सर्वात मोठा मार्ग म्हणून या वनस्पतीकडे बघितले जात असते. त्याचप्रमाणे या वनस्पती पासून तयार केलेल्या तेलामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत तर नाहीच, मात्र शरीरात असणारे कोलेस्ट्रॉल कमी देखील केले जाते. त्यामुळे अशा रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीचे सेवन केले जात असते, आणि या गोष्टीबद्दल नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन या संस्थेने देखील दुसरा दिलेला आहे.

त्यामुळे दररोज एक चमचा कलोंजी खावी असे सांगितले जाते, आणि असे सलग तीन महिने केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणणे शक्य होते. त्याचबरोबर ज्या रुग्णांना वजन झपाट्याने वाढण्याची समस्या जाणवत असेल, असे रुग्ण देखील या वनस्पतीचे सेवन करून कमरेचा घेरा कमी करू शकतात. जेणेकरून वजन कमी होण्याबरोबरच शरीराला एकच उत्तम आकार प्राप्त होण्यास देखील मदत मिळते.

त्याचबरोबर कर्करोगासारख्या आजारांवर देखील या कलौंजीच्या सहाय्याने उपचार केला जाऊ शकतो. केमोथेरपी करायला सांगितलेल्या रुग्णांवर देखील ही पद्धती उपयुक्त दिसून आलेली आहे, त्याचबरोबर मधुमेह रुग्णांचे रक्ताची साखर नियंत्रित करणे, रक्तदाब सुरळीत ठेवणे, शरीरावर येणारी सूज कमी करण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, आणि व रक्त किंवा मूत्रपिंडाचे आजार इत्यादी गोष्टींवर उपचार करणे यासाठी हे कलौंजीचे बियाणे ओळखले जात असते.

कलोंजी ची साठवणूक:

ही वनस्पती जास्तीत जास्त दिवसांपर्यंत साठवून ठेवायची असेलच तर हवाबंद डब्यामध्ये ठेवून त्याचे झाकण घट्ट लावणे गरजेचे असते. त्या अंतर्गत तुम्ही अनेक दिवस ही वनस्पती साठवू शकता. त्याचबरोबर फाईल पेपर मध्ये गुंडाळून देखील ही वनस्पती ठेवली जाऊ शकते. ही वनस्पती ओल्या ठिकाणी ठेवू नये, असा सल्ला दिला जात असतो.

या वनस्पतीचा वापर भाजी बनवताना केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ही वनस्पती शक्यतो दुपारी किंवा संध्याकाळी खाणे सुचविले जाते,शक्यतो एकदम सकाळी ही वनस्पती खाऊ नये.

निष्कर्ष:

आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टींचे अर्थात जवळपास सर्वच वनस्पतींचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. त्यामध्ये कलोंजी या वनस्पतीचा देखील समावेश होत असतो. आज काल मानसाद्वारे हे बियाणे किंवा वनस्पती मसाल्याच्या स्वरूपात वापरली जात असली, तरी देखील फार पूर्वीपासून याचा औषधी म्हणून देखील वापर केला जात आहे.

अगदी दोन हजार वर्षांपूर्वी या वनस्पतीची उपयुक्तता निर्माण झालेली असून, तेव्हापासून ही वनस्पती औषधी म्हणून वापरली जात आहे. संपूर्ण भारतभर या वनस्पतीची लागवड केली जाऊ शकते. अतिशय छोट्याशा झुडूप स्वरूपात असणारी ही वनस्पती काळसर गडद रंगाच्या बियाण्याने युक्त असते.

या बिया साधारणपणे तिळाच्या बियाण्याप्रमाणेच दिसत असतात, व त्याचप्रमाणे त्याचा आकार हा काहीसा अंडाकृती आणि त्रिकोणी स्वरूपाचा असतो. एक उत्कृष्ट मसाला म्हणून देखील या वनस्पतीला ओळखले जाते. त्याचबरोबर लोणच्यासारख्या पदार्थांमध्ये देखील याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. त्यामुळे पदार्थ जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवण्यास मदत मिळत असते.

आजच्या भागामध्ये आपण या कलौंजी वनस्पती बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली असून, त्याचे बियाणे म्हणजे काय व त्याचे उपयोग देखील जाणून घेतलेले आहेत. त्याचबरोबर कलौंजी काय असते, त्याचे शरीरासाठी कोणकोणते फायदे होतात, इत्यादी माहिती बघितलेली आहे. या कलोंजीचा वापर कसा करावा, ती कशी साठवावी, सेवन कसे करावे, व कधी करावे, तसेच अति प्रमाणात ही कलौंजी खाल्ल्यामुळे कोणकोणते तोटे उद्भवू शकतात, या सर्वांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे.

FAQ

कलौंजी या वनस्पतीला कोणकोणत्या स्वरूपात वापरले जाते?

कलौंजी या वनस्पतीला मुख्यतः बियाण्याच्या स्वरूपात वापरले जाते.

कलोंजी हे बियाणे कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरले जाते?

कलोंजी हे बियाणे मुख्यतः मसाल्याच्या निर्मितीमध्ये आणि औषधी गुणधर्म करीत देखील वापरले जाते. त्याचबरोबर लोणच्यासारख्या पदार्थांमध्ये देखील याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असतो.

कलोंजी चे बियाणे साधारणपणे कसे असते?

कलौंजी चे बियाणे हे आकाराने तिळासारखे अर्थात काहीही अंडाकृती आणि त्रिकोणी स्वरूपाचे असते. त्याचबरोबर ते रंगाने काळसर असते.

कलोंजी या वनस्पतीमध्ये प्रति १०० ग्राम किती ऊर्जा साठवलेली असते.

कलोंजी या वनस्पतीमध्ये प्रति १०० ग्राम जवळपास ३७५ किलो कॅलरी ऊर्जा साठवलेली असते.

कलौंजी या वनस्पती मधून मुख्यतः कोणकोणते घटक मिळत असतात.

कलोंजी या वनस्पती बद्दल मुख्यतः फायबर, कार्बोहायड्रेट, आणि ग्लुकोज हे पदार्थ मिळत असतात. त्याचबरोबर अनेक मिनरल्स विटामिन्स आणि फॅटी ऍसिड देखील उपलब्ध असतात.

Leave a Comment