Arunima Sinha Information In Marathi अरुणिमा सिन्हा हे जगातील सर्वोच्च शिखर असलेले माउंट एवरेस्ट पायी चढणारी जगातील पहिली व अपंग झालेली महिला आहे. ही भारतीय वंशाची असून उत्तर प्रदेशाची रहिवासी असून अरुणिमा 12 एप्रिल 2011 रोजी लखनऊ येथून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी तिला पद्मावती एक्सप्रेस मधून बाहेर फेकले होते. या घटनेत गंभीर जखमी तिला झाल्या आणि त्यांच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला.
अरुणिमा सिन्हा यांची संपूर्ण माहिती Arunima Sinha Information In Marathi
तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. दिव्यांग लोकांना आशेचा किरण दाखवणारी जगातील ही पहिली महिला ठरलेली आहे.यांच्या कर्तृत्ववान कामगिरीमुळे अपंग लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेरणा मिळाली आहे. प्रत्येक वेळी अपंग लोकांवर ते निरुपयोगी आहेत असे आरोप लावले जातात. त्यांची निंदा केली जाते. परंतु अरुणिमा सिन्हा यांनी अशा लोकांचे म्हण हे चुकीचे ठरवून सिद्ध केले आहे की, एक भारतीय म्हणून अरुणिमा सिन्हा यांच्या या कार्याचा सर्वांनाच फार अभिमान वाटतो.
नाव | अरुणिमा सिन्हा |
जन्म | 20 जुलै 1988 |
जन्म ठिकाण | उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ओळख | जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट चढणारी भारतीय पहिली महिला. |
राष्ट्रीय पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार |
जन्म व बालपण :
अरुणिमा सिन्हा यांचा जन्म हा भारतातील उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 20 जुलै 1988 रोजी झाला. आंबेडकर नगर हा उत्तर प्रदेशातील एक छोटासा जिल्हा आहे. तेथेच यांचा जन्म झाला, त्यांचा जन्म हा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचे बालपण सुद्धा त्याच कुटुंबात गेले.
अरुणिमा यांचे कुटुंब खूप साधे व गरीब होते. तिचे वडील भारतीय सैन्यात अभियंता म्हणून सेवा देत होते. त्यांची आई दवाखान्यांमध्ये आरोग्य विभागात सुपरवायझरचे काम करत होती. अरुणिमाला दोन भाऊ बहीण आहेत. एक मोठी ताई आणि एक छोटा भाऊ अरुणिमा ही आई-वडिलांचे दुसरी अपत्य आहे.
अरुणिमा तीन वर्षाची झाली होती आणि तिच्या वडिलांचे निधन सुद्धा झाले होते. कुटुंबाची परिस्थिती आणखीनच बिकट झाली, त्यानंतर अरुणिमाच्या कुटुंबीयांचे पालन पोषण तिच्या बहिणीच्या सासरच्यांनी केले.
शिक्षण :
अरुणिमा यांना लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राविषयी विशेष आवड होती. अरुणिमा सिन्हा नॅशनल हॉलीबॉल प्लेयर म्हणून होऊन गेले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे गव्हर्नमेंट गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण हे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौन्टेनिरींग येथे पूर्ण केले. समाजशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी ही पदवी मिळवली.
नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौन्टेनिरींग येथेच त्यांनी गिर्यारोहणाचा कोर्स सुद्धा केला. ट्रक लाईट विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवली. लहानपणापासून त्यांना क्रीडा क्षेत्राची आवड असली तरी त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर बनवले नाही.
अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनातील भयानक प्रसंग :
अरुणिमा या 23 वर्षाच्या असताना त्यांच्यासोबत एक खूपच भयानक असा प्रसंग घडला. यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळेच वर्णन मिळाले. त्यांच्यासारख्या बऱ्याच लोकांना प्रेरणा सुद्धा त्यांच्याकडून मिळाली. जेव्हा त्या नोकरीच्या इंटरव्यूसाठी निघाल्या होत्या, तो दिवस 12 एप्रिल 2011 होता आणि लखनऊ वरून दिल्लीला येण्यासाठी त्या एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये चढल्या. रात्रीच्या वेळी काही तरुण पोरं चाकू, सुऱ्या घेऊन जनरल कोचमध्ये चढले आणि तेथे अरुणिमा सिन्हा सुद्धा होत्या.
सगळ्यांना धमकावून त्यांनी सर्वांकडे असलेले मौल्यवान सामान वस्तू मागण्या सुरुवात केली. कोपऱ्यात एका सीटवर बसलेल्या अरुणिमा सिन्हा यांच्या गळ्यातील चैन बघून त्यातील एक तरुण त्यांच्याकडे आला आणि त्यांना धमकावून चैन मागू लागला आणि हिसकवून घेऊ लागला.
परंतु त्यांनी सोन्याची चैन देण्यास नकार केला व त्यांच्या बाकीच्या साथीदारांनी येऊन एकाने अरुणिमा सिन्हा यांच्या पोटात लाथ मारली तर एकाने त्यांचा गळा पकडला व तिसऱ्याने तिच्या गळ्यातील चैन काढून घेतली. बाकीचे सर्व प्रवासी या गुंडांना आपल्या जवळील वस्तू लगेच देऊन टाकू लागले.
एकट्याच अरुणिमा सिन्हा यांनी विरोध केल्यामुळे या गुंडांनी तिला भर चालू रेल्वे गाडी मधून बाहेर ढकलून दिले. या प्रसंगामुळे बऱ्याच त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर, पायावर, कमरेवर जखमा झाल्या व कमरेपासून पायाचे हाड मोडले गेले. रात्रभर या जखमी अवस्थेत अरुणिमा ह्या अरुणावर पडून होत्या. रोडावरून बऱ्याच रेल्वे गाड्या जाणं येणं करत होत्या.
अरुणिमा स्वतःच्या जीवनाशी संघर्ष करीत होती परंतु थोड्या वेळाने ती बेशुद्ध पडली. सकाळी तिथून जाणाऱ्या एका गृहस्थाने त्यांना पाहिले व लगेच जवळच्या प्राथमिक दवाखान्यांमध्ये नेले. तेथे त्यांचा एक पाय कापण्यात आला. त्यानंतर त्यांना तेथे कृत्रिम पाय लावण्यात आला.
माऊंट एव्हरेस्ट ची सर
अरुणिमा सिन्हा यांच्यासोबत घडलेल्या या भयानक प्रसंगानंतर त्यांनी हार मानली नाही. त्यांनी माउंट एवरेस्टची सर करण्याचा निर्णय घेतला. याआधी सुद्धा त्यांनी किलिमांजरो, एल्ब्रास, कोसिउस्झाको, एकोनगुवा, कारस्टेनझ, पौरमिड या शिखरांची सर केली माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी अरुणिमा यांनी बचेंद्री पाल यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय स्त्री माउंट एवरेस्टवर चढणाऱ्या आहेत. खरंतर एका कृत्रिम पायावर माउंट एवरेस्ट सर करण्याचा अरुणिमा यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांच्यासोबत जी काय घटना घडली. त्यांच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बळ एकवटून हा निर्णय घेतला आणि यासाठी त्यांची कौतुक केले पाहिजे.
माउंट एवरेस्ट शिखर चढाई करण्यासाठी अरुणिमा सिन्हा यांना 52 दिवस लागले. 21 मे 2013 रोजी अरुणिमा सिन्हा यांनी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी जगातील सर्वात उंच शिखरावर पोहोचल्या होत्या.
हा प्रवास त्यांच्यासाठी खूपच खडतर होता. कारण ज्यावेळी अरुणिमा यांच्यासोबत ट्रेन एक्सीडेंट झाला, त्यावेळी अरुणिमा सिन्हा यांच्या पायावरून जवळपास 49 रेल्वे गाड्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना एक कृत्रिम पाय बसवून द्यावा लागला. माऊंट एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांचा हा कृत्रिम पाय सुद्धा निकामी होतो की, काय याचे भीती त्यांना होती परंतु सुदैवाने असं काहीही घडलं नाही आणि त्यांनी यशस्वीरित्या माउंट एवरेस्टची सर केली. उंच शिखर चढण्यासाठी अरुणिमा सिन्हा यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मॉन्टेनिंग येथे प्रशिक्षण घेतले तसेच बेचेन्द्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही चढाई केली.
पुरस्कार :
अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवास घडला. त्यांच्यासोबत झालेले अपघात तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि माउंट एवरेस्ट सारख्या उंच पर्वतावर शिखरावर चढणारी ही भारतीय पहिली अपंग महिला होती. त्यांच्या या कामगिरीसाठी भारत सरकारने 2015 रोजी त्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच पद्मश्री दिला.
FAQ
अरुणिमा सिन्हा यांचा जन्म कधी झाला?
20 जुलै 1988.
अरुणिमा सिन्हा यांना कोणत्या भारतीय पुरस्कार मिळालेला आहे?
पद्मश्री पुरस्कार.
माउंट एवरेस्ट वर चढाई करणारी भारतीय पहिली महिला कोण?
बचेंद्री पाल.
एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण?
अरुणिमा सिन्हा.
अरुणिमा सिन्हा यांना माउंट एवरेस्ट वर चढण्यासाठी किती दिवस लागले?
अरुणिमा सिन्हा यांना माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी 52 दिवस लागले.