Farmer Information In Marathi शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते आणि ते खरे सुद्धा आहे. आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील 68 % वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. त्यामुळे शेतकरी हा अन्नदाता आहे, जो त्याच्या स्वतःच्या घामाने आणि पैशाने अन्नधान्य जमिनीमध्ये निर्माण करतो, गोळा करतो व ते धान्य सावकारांना विकतो. शेतकरी हे कमी शिक्षित असतील तरी ते आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतात.
शेतकऱ्याची संपूर्ण माहिती Farmer Information In Marathi
शेतीव्यतिरिक्त शेतकरी हे त्यांच्या पशुपालन हा व्यवसाय सुद्धा करून आपली उपजीविका भागवतात. शेतकऱ्याकडे बैल, शेळ्या,, मेंढ्या, गाई, म्हशी यांसारख्या जनावरे असतात. ज्यांच्यापासून त्यांना योग्य उपयुक्त असे शेणखत मिळते. हे शेणखत शेतामध्ये टाकून त्यापासून जमीन पोषक बनवून उत्पादन जास्त होते.
शेतकरी बांधव नेहमीच आपला उदरनिर्वाह हा शेतीवर निर्भरित करतात. स्वातंत्र्यपूर्वी शेतकऱ्यांचे हाल खूपच होत होते तसेच त्यांची दयनीय अवस्था होती परंतु स्वातंत्र्यानंतर आता शेतकऱ्यांचे जीवनमान उच्च झाले आहे.
शेतकऱ्याच्या आयुष्यातील सुरुवात :
भारतामध्ये शिक्षणाची फारशी सोय पूर्वी उपलब्ध नव्हती, त्यामुळे लहानपणापासूनच शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले सर्वच बालके शेती विषयक कामांमध्ये आपला वेळ घालवत असत त्यामुळे त्यांना शाळेत जाण्यास सुद्धा कंटाळवाणी वाटत असे आणि त्या काळामध्ये शाळेत जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना प्रतिबंध होत असे.
शेतकऱ्यांकडे उपलब्ध पैसा नसल्यामुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हते. त्यांच्या कुटुंबांना चांगले अन्न सुद्धा मिळत नव्हते. त्यांना अनेक आजार होत होते आणि अशातच त्यांचा मृत्यू सुद्धा होत होता. त्यांच्या अशिक्षितपणामुळे मिळालेल्या निर्दयी वागणुकीमुळे त्यांच्या हालअपेष्टा होत होत्या.
शेतजमिनी अन्नधान्याची योग्य किंमत सुद्धा त्यांना मिळत नव्हती. शेतकऱ्यांची शोषण केले जात होते. बहुसंख्य शेतकऱ्यांची लहान वयातच लग्न होत होते. त्यांची आर्थिक व सामाजिक जबाबदारी सुद्धा त्यांना व्यवस्थित पार पाडता येत नव्हती. शेतातील आलेले पीक त्यांना जबरदस्ती कमी किमतीत विकणे भाग पडत होते. शेतकरी सर्वात कष्टकरी असून त्याला योग्य ते मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे मिळालेल्या पैशात सुद्धा ते समाधानी असत.
शेतकऱ्यांच्या समस्या :
शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये कठीण समस्यांपैकी एक म्हणजे त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. खरेदी विक्रीच्या प्रक्रियेमध्ये बसून सरकारी दलाल पैसे कमावतात, त्यामुळे भ्रष्टाचाराचा परिणाम शेतकऱ्यांना भोगाववा लागतो.
शेतकऱ्यासाठी आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सिंचनासाठी पाण्याचा तुटवडा लागतो. शेतकऱ्यासमोरचे दुसरे सर्वात मोठे आवाहन म्हणजे काही वेळा पाणी शेतातील पिकाला पाण्याची अपुरी व्यवस्था पडल्यामुळे शेतात असलेले पीक कमी होते. परिणामी त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्ती येतात जसे अवकाली पाऊस, वादळे पाऊस न पडणे या सर्व समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतामध्ये पीक पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी हे शेत पेरण्यासाठी कर्जबाजारी होतात. त्यांना हे कर्ज भरावे लागते परंतु कर्ज भरण्यासाठी त्यांना पीक न झाल्यामुळे त्यांना कर्जाला सामोरे जावे लागते.
शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना आरोग्य आणि शिक्षण या सुविधा सुद्धा उपलब्ध होत नाहीत कारण त्यांच्याकडे पुरेशी पैसे नसतात. शेतकऱ्यांकडे पैसा असेल तर ते आपल्या मुलांना पौष्टिक आहार सुद्धा देऊ शकतात व शिक्षणही उच्च प्रतीची देऊ शकतात; परंतु पिकातील कमी नफ्यामुळे ते हे सर्व करू शकत नाही. शेतकऱ्याचे जीवनमान उंच सुधारायचे असेल तर त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज असते.
शेतकऱ्यांची स्थिती :
आपण संपूर्ण भारत देशाचा विचार केला तर शेतकऱ्यांची संख्या ही जास्त आहे. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे शेतकरी हेच भारताचा कणा मानले जातात. भारताला कृषिप्रधान राष्ट्र ही मानवंदना शेतकऱ्यांमुळेच मिळालेली आहे. आज आपण पाहिले तर शेतकऱ्यांची अवस्था खूपच वाईट आहे. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात शेतकरी आत्महत्या च्या बाबतीत आपण अनेक घटना ऐकतो. तोच शेतकरी ज्याला आपल्या देशाचा महत्त्वाचा सदस्य म्हणून सुद्धा ओळखले जाते.
सध्या अतिशय आव्हानात्मक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. त्यांच्यापुढे साधनसामग्रीची सुद्धा कमतरता आढळते. त्यामुळे ते आपली शेत कष्टाने करूनही त्यांच्या श्रमाला मोल मिळत नाही किंवा त्यांना पुरेसे उत्पन्न सुद्धा प्राप्त होत नाही. शेतकऱ्या त्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. काही वेळा त्यांच्या कुटुंबाचे सुद्धा पालन पोषण किंवा जेवण त्यांना मिळत नाही अशा प्रकारच्या अनेक समस्या त्यांच्या समोर उभ्या राहतात. त्यामुळेच या समस्येला त्रास होऊन शेतकरी आत्महत्या करण्यास तयार होतात.
शेतकऱ्याच्या जीवनातील बदल :
शेतकऱ्याच्या जीवनात स्वतंत्र्यानंतर अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात शेतकऱ्यांसाठी विविध योजनाही सरकारने आता राबविल्या आहेत परंतु काही जमिनीपर्यंत पोचू शकला नाहीत परंतु 2015 च्या आकडेवारीनुसार आपण पाहिले तर शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रमाण आता कमी झालेले आहे.
सध्या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी योग्य उपाय योजना सुरू केले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण आणि पिकांच्या नुकसानीसाठी किंवा कमी व्याजावरील कर्जासाठी योग्य भरपाई देणे तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम सुद्धा राबवले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कमी दरात कृषी यंत्र उपलब्ध करून देणे. नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात पाठवणे. यामुळेच शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे.
FAQ
शेतकऱ्यांच्या समस्या कोणत्या आहेत?
शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, भूकंप दुष्काळ, कमी पीक झाल्यास तोटा सहन करावा लागतो, पिकांना योग्य भाव न मिळणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.
शेती उत्पादनाची किती भाग आहेत?
शेती उत्पादनाचे वेगवेगळ्या भागात विभाजन केले आहे, त्यामध्ये ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती, बागायती शेती, जिरायत शेती इत्यादी.
कृषी म्हणजे काय ळ?
कृषी म्हणजे नांगरणे असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच जमिनी नांगरून त्याच्यामध्ये बी पेरणी व पेरलेल्या बियांची व रोपांची काळजी घेऊन त्यापासून धान्य मिळवणे म्हणजेच कृषी होय.
भारतात एकूण किती टक्के लोक शेती करतात?
भारतात 43 टक्के लोक शेती करतात.
भारताचे एकूण किती टक्के लोकसंख्या शेती व्यवसाय करते?
भारताची एकूण 65 ते 70 टक्के लोकसंख्या शेती व्यवसाय करते व शेतीवर अवलंबून आहे.