Baba Amte Information In Marathi बाबा आमटे यांचे खरे नाव मुरलीधर देविदास आमटे असे आहे परंतु त्यांना लोक बाबा आमटे या नावानेच ओळखतात. हे त्यांचे नाव त्यांच्या आईने ठेवले होते. हे एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते, त्यांनी अनेक लोकांची सेवा केली, त्यांच्या कार्याला सलाम आहे. त्यांनी कुष्ठरोग ग्रंथांच्या पुनर्वसन आणि सहकारण करण्यासाठी सुद्धा मदत केली. तसेच समाजसेवेचा वसा लहानपणापासूनच घेतला होता.
बाबा आमटे यांची संपूर्ण माहिती Baba Amte Information In Marathi
रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी हे त्यांचे आदर्श होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गरीब लोकांची मदत केली तसेच दिन दुबळ्यांना सहारा दिला. त्यांनी आजीवन हे कार्य सुरू ठेवले, त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.
बाबा आमटे यांचा जन्म व बालपण :
बाबा आमटे यांचा जन्म हा 24 डिसेंबर 1914 रोजी हिंगणघाट वर्धा चंद्रपूर येथे झाला होता. त्यांच्या वडिलांची नाव देविदास व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. देविदास त्यांचे वडील हे स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश प्रशासनामध्ये एक शक्तिशाली नोकर होते. तसेच वर्धा जिल्ह्यामधील ते एक श्रीमंत असे जमीनदार होते. त्यांचा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी घरामध्ये पूर्णतः प्रेमळ वातावरण होते.
लहापणापासून त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी सांभाळले. त्यामुळे त्यांना आई-वडील प्रेमाने बाबा म्हणून हाक मारत असत. नंतर पुढे जाऊन त्यांना हेच नाव पडले बाबा आमटे यांच्याकडे लहानपणापासून बंदूक होती व ते रानडुक्कर तसेच घारची शिकार करण्यासाठी वापरत होते.
बाबा आमटे यांचे शिक्षण :
बाबा आमटे यांची प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या गावांमध्ये झाली तसेच त्यांनी महाविद्यालय शिक्षण हे नागपूर मध्ये पूर्ण केले व नागपूर विद्यापीठातून त्यांनी 1934 साली बी.ए. व 1936 मध्ये एलएलबी ही पदवी संपादन केली. त्यानंतर स्वतः ते डॉक्टर बनावे असे विचार करत होते; परंतु त्यांच्या वडिलांच्या आग्रहामुळे ते वकील झाले, त्यानंतर काही काळ त्यांनी वकिली केली आणि 1949 ते 50 या काळामध्ये ते जवाहरलाल नेहरूंच्या शिफारशीमुळे कुष्ठरोगनिदानावरील व चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधीजींच्या सेवाश्रमामध्ये राहुन स्वातंत्र प्राप्तीमध्ये स्वतःला झोकुन दिले.
बाबा आमटे यांचे वैयक्तिक जीवन :
बाबा आमटे यांनी साधना यांच्याशी लग्न केले. व त्यांना सुद्धा आपल्या सोबत घेतले. साधना आमटे सुद्धा बाबा आमटे यांच्यासोबत नेहमी समाजसेवेत कार्यरत राहत असतात. त्यांना दोन मुले झाली. त्यांची पत्नी सुद्धा पुढे डॉक्टर बनली आणि बाबा आमटे यांचा त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर प्रभाव असल्यामुळे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचे काम केले. त्यांची मुलं आजही सामाजिक सुधारणाच्या प्रयत्नांमध्ये खूप प्रसिद्ध आपल्याला दिसतात.
बाबा आमटे यांच्या वरील गांधीजींचा प्रभाव :
बाबा आमटे हे गांधीजींना आपले गुरु मानत. त्यांनी महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानाचे सुषमा निरीक्षण करून त्यांच्या तत्त्वज्ञान सुद्धा त्यांनी जोपासले. गांधीवादी जीवन पद्धतीचा अवलंब त्यांनी केला. समाजामध्ये अन्याय विरुद्ध उभे राहणे आणि गरिबांची मदत करणे, सेवा करणे ही भावना त्यांना गांधीजींकडून मिळाली. बाबा आमटे हे प्रशिक्षित वकील होते, त्यामुळे त्यांना कायद्याचा अभ्यास करायचा होता.
गांधी प्रमाणेच त्यांनी आपल्या देशातील गरिबी आणि दुर्लक्षित लोकांच्या दुरवस्थेचे झालेले परिणाम त्यांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांनी त्या लोकांचे जेवण सुखी व्हावे, यासाठी नेहमी प्रयत्न केले. त्यांनी आपला औपचारिक पोशाख सोडला व काही काळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रँक वेजक आणि सफाई कामगारांसोबत सुद्धा त्यांनी काम केले.
महिलांचा अनादरन करणाऱ्या इंग्रजांनी विरोधात त्यांनी न घाबरता निषेध केला तसेच गांधीजींनी सुद्धा त्यांना ‘अभय साधक’ ही पदवी दिली होती. नंतर त्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले व बऱ्याच लोकांना त्यांनी या रोगाविषयी माहिती सांगितली. जनजागृती केली व अनेक रुग्णांना त्यांनी सहारा दिला.
बाबा आमटे यांची भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्य :
महात्मा गांधी हे बाबा आमटे यांचे गुरु होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा महात्मा गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय स्वतंत्र्याच्या चळवळीमध्ये पदार्पण केले. भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या जवळजवळ सर्व प्रमुख आंदोलनांमध्ये भाग घेतला व संपूर्ण भारतातील तुरुंगामध्ये असलेल्या नेत्यांच्या बचावासाठी त्यांनी एक वकील संघटना तयार केली. त्यांनी महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्यासोबत संपूर्ण देशाचा दौरा केला व देशातील खेड्यापाड्यातील गरिबांमध्ये जगणारे लोकांच्या खऱ्या समस्या जाणून त्यांनी घेतल्या.
8 ऑगस्ट 1942 रोजी दुसऱ्या महायुद्धात भारत छोडो या आंदोलन सुरू झाले, त्यामुळे आंदोलनामध्ये सुद्धा बाबा आमटे यांनी बंड नेत्यांचा खटला लढण्यासाठी भारतभर वकील संघटना तयार केली होती. त्यांनी वयाच्या 35 व्या वर्षी वकिली सोडून समाजसेवा सुरू केली व त्यानंतर त्यांनी कुष्ठरोगाची माहिती गोळा केली व आनंद भवन या नावाचा एक आश्रम स्थापन केला. जिथे आजही कोष्ठरुग्णांना मोफत सेवा दिली जाते. बाबा आमटे हे खरे कर्मयोगी बनले त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी 1985 मध्ये आणि आसाम ते गुजरात 1988 मध्ये दोनदा भारत जोडो आंदोलन सुद्धा सुरू केले.
त्यांनी 1989 मध्ये नर्मदा खोऱ्यात सरदार सरोवर धरणाच्या बांधकामाला हजारो आदिवासींच्या विस्थापनाला विरोध करण्यासाठी बाबा आमटे यांनी बांधकामामुळे पाण्याखाली जाणाऱ्या भागात निजिबल नावाचा छोटा आश्रम बांधला. बाबा आमटे यांनी स्वातंत्र्य चळवळीतील कार्याबरोबर इतर कार्यामध्ये सुद्धा योगदान दिले आहे. त्यांनी साहित्यिक कार्य सामाजिक कार्य पर्यावरण विषयक कार्य यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
आनंदवन :
बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी व तेथे अपंग लोक तसेच समाजातील इतर लोक उपचार घेण्यासाठी आणि पुनर्वसन करण्यासाठी एका आश्रमाची त्यांनी स्थापना केली ते आश्रम म्हणजे आनंदवन होय. 15 ऑगस्ट 1949 रोजी त्यांनी त्यांची पत्नी साधना आमटे यांनी एका झाडाच्या खाली कुष्ठरोग आनंदवन सुरू केले.
आनंदवन हे बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी उभारलेले एक घर होते तसेच त्यांनी दोन एक युनिव्हर्सिटी, अनाथाश्रम, अंध आणि मूकबधिर युनिव्हर्सिटी व तांत्रिक प्रशिक्षणासाठी शाळांची स्थापना केली. महारोग सेवा समितीची स्थापना सुद्धा त्यांनी यादरम्यान केली.
बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार :
- पद्मश्री 1971 पद्मविभूषण 1986.
- महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार 1998.
- अपंग कल्याण पुरस्कार 1986.
- गांधी शांतता पुरस्कार 1999.
- मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार 1985.
- महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार 1974.
- राष्ट्रीय भूषण पुरस्कार 1978.
- बाबा आमटे यांना सामाजिक विचारांसाठी डॉक्टर आमचा पुरस्कार 1999.
- रामन मॅगसे पुरस्कार.
- संयुक्त राष्ट्र अधिकार हक्क पुरस्कार 1998.
- पर्यावरण विशिष्ट कामासाठी संयुक्त राष्ट्र रोल ऑफ ऑनर 1991.
- पर्यावरणाशी संबंधित ग्लोबल 500 पुरस्कार 1991.
गुगलने 26 डिसेंबर 2018 रोजी बाबा आमटे वर डूडल शोधून त्यांना श्रद्धांजली वाहीली. याव्यतिरिक्त त्यांना बरेच पुरस्कार मिळाले आहे.
बाबा आमटे यांचे निधन :
बाबा आमटे यांनी आयुष्यभर समाजसेवेचे कार्य उत्तमपणे पार पाडले तसेच त्यांनी कुष्ठरोग यांना सुद्धा मदत केली, त्यासाठी आनंदवन बांधले. अशा या थोर पुरुषाचे निधन हे 9 फेब्रुवारी 2008 रोजी वरोडा येथील निवासस्थानी झाले.
FAQ
बाबा आमटे यांनी रुग्णांसाठी कोणते आश्रम बांधले?
आनंदवन आश्रम.
बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे?
मुरलीधर देविदास आमटे.
बाबा आमटे यांचा जन्म कधी झाला?
26 डिसेंबर 1914.
बाबा आमटे यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?
महात्मा गांधी व विनोबा भावे.
बाबा आमटे यांनी कोणते आंदोलन सुरू केले होते?
नर्मदा बचाओ आंदोलन.