Bahinabai Chaudhary Information In Marathi बहिणाबाई चौधरी ह्या एक महाराष्ट्र मधील वारकरी महिला संत होऊन गेल्या आहेत तसेच बहिणाबाई चौधरी ह्या एक कवयित्री सुद्धा होऊन गेले आहेत, त्या ज्या कामांमध्ये रमून जात. त्यामध्ये आपल्या कविता सुद्धा करत असत. तसेच त्यांनी मराठी अभंग रचना सुद्धा केली आहे. त्यामध्ये त्यांच्या वैवाहिक दुखी जीवनाबद्दल आणि स्त्री जन्माला आल्याचे दुःख व्यक्त केले आहे. बहिणाबाईंनी त्यांच्या पतीच्या जबाबदाऱ्या स्वतः स्वीकारल्या तसेच त्यांची विठ्ठलाप्रतीची भक्ती आपल्याला कवितेतून दिसून येते.
बहिणाबाई चौधरी यांची संपूर्ण माहिती Bahinabai Chaudhary Information In Marathi
दैनंदिन जीवनातील विषयांवर त्यांच्या कविता अप्रतिम आहेत. त्यांनी दैनंदिन जीवनाविषयी अनेक कविता केल्या आहेत. त्यांच्या कवितांचा आजही संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. संत बहिणाबाईच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारे, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य यांची जपणूक सुद्धा केलेली आहे.
त्यांचा हा अवलंबित ठेवा पुढील पिढीला पाहता यावा यासाठी आजही त्यांच्या वाड्यात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या घराचे रूपांतर हे संग्रहालयामध्ये झालेले असून त्यांना बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहेत. अरे संसार संसार संसार, जसा तवा चुल्यावर ….
आधी हाताने चटका, मग मिळते भाकर….अशा सुंदर संसारिक जीवनाविषयी त्यांच्या कविता आजही आपल्याला आठवतात.
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म :
बहिणाबाई चौधरी यांचा हा तेराव्या शतकात म्हणजे 24 ऑगस्ट 1880 मध्ये झाला. त्या दिवशी नागपंचमी होती. त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन असे होते. त्यांचा जन्म हा जळगाव खान्देश पासून 6 किलोमीटर असलेल्या असोदे या गावांमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई असे होते तसेच त्यांना तीन भाऊ घमा, गना आणि घना तसेच तीन बहिणी अहिल्या, सीता व तुळसा होत्या.
बहिणाबाई चौधरी यांचे वैयक्तिक जीवन :
वयाच्या तेराव्या वर्षी त्यांची लग्न खंडेराव चौधरी यांचा पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी झाला. त्या काळामध्ये बालविवाह करण्याची प्रथा होती. त्यानंतर बहिणाबाई चौधरी यांना तीन अपत्ते झाली. त्यामध्ये ओंकार सोपान ही दोन मुलं आणि काशी नावाची एक मुलगी होती. त्या काळात जळगावमध्ये प्लेग हा साथीचा रोग आल्यामुळे ओंकारला कायमचे अपंगत्व आले आणि वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांचे पती मरण पावले व बहिणाबाईंना विधवापन आले.
बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी अनेक कविता केल्या परंतु लिहून ठेवता न आल्यामुळे त्यांच्या कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्यांचे पुत्र सोपान देव यांनी त्यांच्या काही कविता टिपून ठेवल्या आहेत.
बहिणाबाई यांचा कविता संग्रह :
बहिणाबाई यांच्या कविता सुंदर निसर्गावर प्राण्यांवर पक्षांवर तसेच जीवनातील चढउतार, सुख-दुखावर त्यांच्या कविता आधारित आहे. बहिणाबाईंच्या काव्यरचनेचे निसर्गदत्त अशी प्रतिभा आपल्याला दिसून येते. शेतामध्ये काम करताना किंवा घरकाम करताना त्या उत्स्फूर्तपणे ओव्या व कविता रचून गात असत.
त्यांच्या कवितांवरून आपल्याशी लक्षात येतात की, त्या एक कृषी जन भागातील तसेच संस्कृतीतील राबणाऱ्या कष्टकरी महिलांची आठवण आज आपल्याला त्यांच्या कवितेतून होते. तसेच त्यांच्या कलेचा हा ठेवा आपल्याला आज पाहायला मिळतो.
बहिणाबाईंचा मुलगा सोपानदेव चौधरी हे एकदा आपल्या आईच्या मृत्यूनंतर काही शोधत असताना त्यांना आपण लिहून ठेवलेल्या आईच्या सर्व कविता सापडल्या होत्या. त्या सर्व कविता सोपान देवांनी आचार्य अत्रे यांना दाखवल्या आचार्य अत्रे यांनी त्या कवितांना सोनं म्हटलं आणि त्या कविता प्रकाशित करण्यामध्ये पुढाकार घेतला.
अंतरे यांच्या पुढाकाराने बहिणाबाईंची गाणी 1952 मधील पहिली आवृत्ती आणि दुसरी आवृत्ती 1969 मध्ये प्रकाशित झाले. तसेच या महान कवयित्रीचा महाराष्ट्रात परिचय झाला. या कवितासंग्रहात बहिणाबाईच्या फक्त 35 कविता होत्या. त्या व्यतिरिक्त काही कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या.
बहिणाबाई चौधरी यांच्या प्रसिद्ध कविता :
बहिणाबाई ह्या वारकरी संप्रदायातील एक संत कवयित्री होत्या तसेच त्यांना संत तुकाराम महाराजांचे शिष्य सुद्धा मानले जाते. त्या निरक्षर होत्या, त्यामुळे त्यांना लिहिता येत नव्हते. त्यांच्या अनेक कविता कोणी लिहून न ठेवल्यामुळे आज आपण पाहू शकत नाही किंवा त्या नष्ट झाल्या परंतु आजही त्यांच्या जेवढ्या कविता आहेत. त्या अप्रतिम आहेत तसेच त्यामध्ये संसाराविषयीचे प्रेम आपल्याला दिसते. त्यांच्या कवितां या त्यांच्या मातृभाषेमध्ये अवलंबून आहेत.
त्यांच्या कविताचे विषय हे शेतीचे साहित्य शेती कार्य त्यांचे जग कृषी जीवनातील घटना फोडा गुढीपाडवा इत्यादी सणांचा सुद्धा समावेश होतो तसेच त्यांच्या जीवनामध्ये देव कसा असतो. सूर्य, वारा, पाणी, अवकाश, भगवान श्रीकृष्ण या सर्वांचे त्यांच्या कवितांमध्ये समाविष्ट केलेले आहे.
बहिणाबाई चौधरी ह्या एक मराठी साहित्यिक असून जुन्या काळातील चमकेल तेवढं ढकलेलं असं बावनकशी अशा प्रकारे त्यांच्या कविता सोन्यासारख्या आहेत. त्यांच्या कविता आजही ऐकल्यास आपल्याला वेगळं पण वाटते. त्यांच्या काही कविता खालील प्रमाणे आहे.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर..
धरतीच्या कुशीमधी बीयबियानं बियाणं निजली.
वऱ्ह पसरली माती जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले वऱ्ह
गहिवरलं शेता जसं अंगावरती शहारे….
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी नशिबी दगड गोटे काट्याकुट्याचा धनी पायाला लागे ठेचा आल डोळ्याला पाणी….
माजी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचा लेकरू
चांगदेव योग्याने तिने मानणारे गुरू…..
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चागला
देखा पिल्लासाठी तिन
झोका झाडाला टांगला…
मन वढाय वढाय जस पिकातलं ढोर किती हाकल हाकला फिर येत पिकावर.
मन मोकाट मोकाट, त्याला ठाई ठाई वाटा
जशा वाऱ्याने चालल्या पाण्यावरहल्या लाटा
अशाप्रकारे त्यांच्या कविता सुंदर निसर्गावर प्राण्यांवर, पक्षांवर तसेच जीवनातील चढउतार, सुख-दुखावर त्यांच्या कविता आधारित आहे. बहिणाबाईंच्या काव्यरचनेचे निसर्गदत्त अशी प्रतिभा आपल्याला दिसून येते. शेतामध्ये काम करताना किंवा घरकाम करताना त्या उत्स्फूर्तपणे ओव्या व कविता रचून गात असत.
त्यांच्या कवितांवरून आपल्या लक्षात येतात की, त्या एक कृषीजन भागातील तसेच संस्कृतीतील राबणाऱ्या कष्टकरी महिलांची आठवण आज आपल्याला त्यांच्या कवितेतून होते तसेच त्यांच्या कलेल्याचा हा ठेवा आपल्याला आज पाहायला मिळतो.
बहिणाबाई चौधरी यांना मिळालेला मानसन्मान :
बहिणाबाई चौधरी यांच्या सम्मानार्थ जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे.
बहिणाबाई चौधरी यांचा मृत्यू :
बहिणाबाई चौधरी यांचा वयाच्या 71 व्या वर्षी जळगाव जिल्ह्यातील डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला.
FAQ
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जन्म कधी झाला?
जळगाव खानदेश मधील असोदे या गावी 24 ऑगस्ट 1880 रोजी झाला.
बहिणाबाई चौधरी यांच्या पतीचे नाव काय होते
नथूजी खंडेराव चौधरी.
बहिणाबाई चौधरी उभ्या पिकातील ढोर कोणाला उद्देशून म्हणतात?
मानवाच्या मनाला.
बहिणाबाई चौधरी ह्या कोण होत्या?
बहिणाबाई चौधरी ह्या कवयित्री होत्या. तसेच त्या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होऊन गेल्या आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा मृत्यू कधी झाला?
3 डिसेंबर 1951 रोजी.