Chandrashekhar Azad’s Information In Marathi चंद्रशेखर आझाद हे एक भारत भूमीमध्ये जन्मलेले थोर क्रांतिवीर आहे. ज्यांची माहिती आपल्या सर्वांनाच आहे; परंतु त्यांनी जे महान कार्य केले आहे, तो ठेवा आजही आपल्याला अंगावर शहारे उभे करून देण्यासारखा आहे. त्यांची व्यक्तिमत्व म्हणजे हेच खरे देश प्रेम आहे. चंद्रशेखर आझाद हे युवा क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिली. आपली मातृभूमी परतंत्र्यातून मुक्त व्हावी, यासाठी चंद्रशेखर आझाद सतत प्रयत्न करीत राहिले.
चंद्रशेखर आझाद यांची संपूर्ण माहिती Chandrashekhar Azad’s Information In Marathi
त्यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये मुख्य भूमिका बजावली तसेच ते स्वतः भारत त्याच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी झाले तसेच त्यांनी अनेक लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम सुद्धा केले आहे. एवढेच नाही तर प्रत्येकाला त्यांनी आपल्या देशाचा अभिमान आणि देशभक्तीची जाणीव करून दिली. त्यांच्या मते, रक्त शरीरामध्ये सळसळत नसेल तर ते रक्त पाणी आहे. अशा विचाराचे चंद्रशेखर आझाद हे होते.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म व बालपण :
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य प्रदेश भाबरा या गावांमध्ये 23 जुलै 1906 रोजी झाला. त्यांचे कुटुंब हे मूळ उत्तर प्रदेशातील उन्नाव या जिल्ह्यातील बदरका गावातील होते. परंतु त्यांचे वडील सिताराम तिवारी यांची नोकरी गेल्यामुळे ते त्यांचे मूळ गाव सोडून मध्य प्रदेशातील भाबरा येथे राहायला आले. चंद्रशेखर आझाद यांचे आडनाव तिवारी होते. त्यांना लहानपणापासूनच खूप हट्ट करायची आणि दादागिरी करायची सवय होती.
चंद्रशेखर हे आदिवासी बहुल भागांमध्ये राहिले त्यांचे बालपण सुद्धा तिथेच गेले. तेथे त्यांनी तिरंदाजी आणि नेमबाजी शिकली त्यांना संधी मिळताच त्यांनी सरावाला सुद्धा तेथेच सुरुवात केली हळूहळू त्यांच्यामध्ये निपुणता तयार झाली. त्यांना बालपणामध्ये अभ्यासापेक्षा खेळ जास्त महत्त्वाचे वाटत होते. तसेच त्यांना इतर उपक्रमांमध्ये सुद्धा जास्त रस होता.
जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळी हे बनारस मध्ये सत्तेवर होते. चंद्रशेखरला लहानपणापासूनच या घटनेने हादरवून सोडवले होते. त्यावेळी त्यांनी बदल्याची भावना मनामध्ये ठेवून त्याचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र चळवळीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला व महात्मा गांधीजींच्या चळवळीत ते सामील झाले.
चंद्रशेखर तिवारी ते चंद्रशेखर आझाद हा प्रवास कसा गाठला :
चंद्रशेखर आझाद यांचे पूर्वीचे नाव चंद्रशेखर तिवारी होते; परंतु त्यांचा जन्म हा स्वतंत्र पूर्वीचा असल्यामुळे चंद्रशेखर आझाद त्यांना लहानपणापासूनच भारत मातेला स्वतंत्र मिळवून देण्याविषयीची इच्छा जागृत झाली. सन 1921 मध्ये त्यांनी महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलन मध्ये जेव्हा भाग घेतला त्यावेळेस चंद्रशेखर यांनी देशासाठी लढण्याची विशेष तयारी करण्याची ठरवले.
या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले आणि चंद्रशेखर यांना कैद करण्यात आले होते. चंद्रशेखर यांना न्यायालयात नेण्यात आले. तेव्हा न्यायालयातील न्यायाधीशाने चंद्रशेखर यांना त्यांचे नाव विचारलं, तेव्हा चंद्रशेखर यांनी त्यांचं नाव आझाद म्हणून सांगितलं. तेव्हापासून चंद्रशेखर हे तिवारी नसून चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उलट उत्तरे दिल्यामुळे त्यांना काठीचे फटके देण्यात आले होते. त्यावेळी प्रत्येक फटक्या मागे चंद्रशेखर आझाद यांनी खूप अभिमानाने भारत माता की जय..! भारत माता की जय..!असा नारा सुद्धा लावला होता. ही घटना घडली तेव्हा चंद्रशेखर यांचे वय केवळ पंधरा वर्षे होते.
भारत स्वातंत्र्य लढ्यातील योगदान :
चंद्रशेखर आझाद यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढता लढता आपल्या प्राणाची आहुती दिली. यापेक्षा मोठे बलिदान काय असू शकते. आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करावे.
हे त्यांचे स्वप्न होते तसेच हे स्वप्न त्यांनी त्यांच्या मनाशी लहानपणापासूनच बाळगले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकले. परंतु चंद्रशेखर आझाद यांना गांधीजींनी 1922 मध्ये असहकार चळवळी मधून काढून टाकले होते.
चंद्रशेखर यांना गांधीजींनी त्यांच्या चळवळीतून काढून टाकल्यानंतर देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी खूप लोकांना प्रेरित केले. त्यादरम्यान चंद्रशेखर यांची ओळख ही रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली होती. रामप्रसाद हिंदुस्तान रिपब्लिक रिपब्लिकन असोसिएशनचे एक संस्थापक होते तसेच ही एक क्रांतिकारी संस्था होती. या संस्थेमध्ये सगळ्यांना समान हक्क दिला जात होता.
सगळ्यांना निर्णय घेण्याचा समान अधिकार त्या संस्थेने दिले होते, त्यामुळे या संस्थेत सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी त्या संस्थेच्या मदतीने याच संस्थेमध्ये नेतृत्व करण्याची ठरवले. त्यांच्या या संस्थेमध्ये दहा सदस्यांचा ग्रुप होता तसेच चंद्रशेखर आझाद यांनी इंग्रजांची काकोरी ट्रेन सुद्धा दहा सदस्यांच्या मदतीने लुटली.
ही ट्रेन खजिनाने भरलेली होती. या मिशनमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा खूप मोठा वाटा होता. खरंतर त्यांच्या या नेतृत्वाखाली हे मिशन पार पडले होते. काही सदस्यांना या मिशनमुळे आपल्या प्राणाची सुद्धा आहुती द्यावी लागली होती.
या मिशनमध्ये प्रमुख क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुद्धा सोनवण्यात आली. त्यातीलच काही नावे म्हणजे रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लाहीडी, ठाकूर रोशन सिंह तसेच या प्रकरणानंतर चंद्रशेखर आजाद हे दिल्लीला पडून गेले व दिल्लीमध्ये गेल्यावर आझाद यांनी एक क्रांतिकारक बैठक सुद्धा घडवून आणली. त्या बैठकीमध्ये भगतसिंह सहभागी झाले होते.
चंद्रशेखर आजाद भगतसिंग यांचे गुरु होते. या बैठकीमध्ये त्यांनी सर्व क्रांतिकारकांना पुन्हा एक नवीन संस्था निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संस्था पुन्हा उभारली आणि या क्रांतिकारक संस्थेला हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नाव दिले गेले आणि याच संस्थेचे चिटणीस पद हे चंद्रशेखर आझाद यांनी सांभाळले. या संस्थेचे एक प्रोत्साहित करणारे वाक्य म्हणजे “अंतिम निर्णय होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील आणि तो निर्णय विजय किंवा मृत्यू असेल” असे होते.
चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू :
चंद्रशेखर आजाद हे एक महान क्रांतिकारी युवा होते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेले कष्ट व धडपड ही केवळ देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी होती. यावरूनच त्यांचे देश प्रेमी आपल्याला दिसते. बऱ्याच स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळींमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. ते एकदाही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. जीव गेला तरी चालेल परंतु ब्रिटिशांच्या हाती लागणार नाही असं चंद्रशेखर आजाद यांनी मनाशी ठरवलं होतं.
राजगुरू जेलमध्ये असताना त्यांच्या आईला आर्थिक मदतीची गरज होती म्हणून चंद्रशेखर आजाद 27 फेब्रुवारी 1931 मध्ये अलाहाबाद येथे अल्फ्रेड पार्कमध्ये एका क्रांतिकारकाला भेटण्यासाठी गेले होते परंतु काही अज्ञात खबऱ्यांनी ब्रिटिश पोलिसांना खबर पोचवली आणि पोलिसांनी पूर्ण पार्कला घेरा घातला व या घेरामध्ये चंद्रशेखर आझाद आणि ब्रिटिश पोलिसांमध्ये गोळीबार झाला.
या गोडीबारामध्ये चंद्रशेखर आजाद एकटे लढत होते आणि तीन ते चार ब्रिटिश पोलिसांचा खत्म केला परंतु शेवटी चंद्रशेखर आझाद यांच्या पिस्तूलमध्ये एकच शेवटचे बंदुकीची गोडी उरली होती. ब्रिटिशांच्या हातून जीव जाण्यापेक्षा मी स्वतः भारत मातेसाठी माझ्या प्राणाची बलिदान देईल. हे चंद्रशेखर आझादचे विचार होते. त्यामुळे शेवटी एक उरलेली गोळी त्यांनी ती स्वतःच्या डोक्यामध्ये मारून भारत मातेसाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. अशा प्रकारे त्यांचे मृत्यू झाला.
FAQ
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कधी झाला?
23 जुलै 1906.
चंद्रशेखर आझाद यांचे पूर्ण नाव काय आहे?
चंद्रशेखर सिताराम तिवारी.
चंद्रशेखर आझाद यांच्या आईचे नाव काय होते?
जगरानी देवी.
चंद्रशेखर आझाद यांचा नारा कोणता होता?
ऐसी जवानी किस काम की नही, जो अपनी मातृभूमी के काम ना आये.
चंद्रशेखर आझाद यांनी कोणती स्थापना स्थापन केली?
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन.